आयुष्यात नेहमी ‘पहिल्या’ या शब्दाचं खूप अप्रूप वाटत असतं. मग तो शाळेतला पहिला नंबर असो वा नोकरीचा पहिला दिवस. प्रत्येकवेळी पहिला या शब्दाला खूप महत्व असत. कोणतीही गोष्ट पहिल्यांदाच करत असताना आपण जेवढे आनंदी असतो, तेवढेच काहीसे गोंधळलेलेही असतो. जसा जूनचा पहिला पाऊस- आनंदही देतो आणि तारांबळही उडवतो, तसंच. आणि ह्या पहिल्या पावसाच्या आनंदावर विरजण घालायला तत्पर असतो तो आय.टी.आर.(ITR), अर्थात इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करणे. एकीकडे मान्सून पिकनिक ठरत असतात, तर दुसरीकडे ITR फाईल करण्याची धावपळ सुरू असते. आणि जर कोणी पहिल्यांदाच ITR फाईल करत असेल, तर अचानक आलेला पाऊस जशी तारांबळ उडवतो तशीच तारांबळ ITR भरताना होत असते. खरतर गोंधळून जायची काहीच गरज नाही. फक्त थोडीशी माहिती जाणून घेतली की काम झालं.
आय.टी.आर. म्हणजेच आपलं आयकर विवरण पत्रक. हे फाईल करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै असते. ITR नेहमी एक आर्थिक वर्ष म्हणजेच ‘१ एप्रिल ते ३१ मार्च’ या कालावधीसाठीच भरला जातो.
ITR कसा भरायचा? (How to File ITR?)
सदर फॉर्म ऑनलाईन भरता येतो. त्यासाठी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या वेबसाईटवरुन लॉग-इन करावे लागते. त्यानंतर फॉर्म १६ डाउनलोड करावा लागतो. सदर फॉर्ममध्ये सगळी माहिती व्यवस्थित भरुन फॉर्म सबमिट करायचा.
ITR संदर्भातील काही महत्वाच्या गोष्टी:
१. इन्कम टॅक्स स्लॅब चार्ट :
व्यक्ती( Indivisual) HUF :
वय वर्ष ६० पेक्षा कमी.
उत्पन्न(Income) |
टॅक्स |
हेल्थ ॲण्ड एज्युकेशन सेस |
रु. २,५०,०००/- पर्यंत |
टॅक्स नाही(Nil) |
– |
रु.२,५०,०००/- ते रु.५,००,०००/- |
५% |
४% |
रु. ५,००,०००/- ते रु. १०,००,००० |
२०% |
४% |
रु.१०,००,०००/- पेक्षा अधिक |
३०% |
४% |
वय वर्ष ६० ते ८०
उत्पन्न(Income) |
टॅक्स |
हेल्थ ॲण्ड एज्युकेशन सेस |
रु. ३,००,०००/- पर्यंत |
टॅक्स नाही(Nil) |
– |
रु.३,००,०००/- ते रु.५,००,०००/- |
५% |
४% |
रु. ५,००,०००/- ते रु. १०,००,००० |
२०% |
४% |
रु.१०,००,०००/- पेक्षा अधिक |
३०% |
४% |
वय वर्ष ८०+
उत्पन्न(Income) |
टॅक्स |
हेल्थ ॲण्ड एज्युकेशन सेस |
रु.५,००,०००/- पर्यंत |
टॅक्स नाही(Nil) |
– |
रु.५,००,०००/- ते रु.१०,००,०००/- |
२०% |
४% |
रु.१०,००,०००/- पेक्षा अधिक |
३०% |
४% |
सरचार्ज :
एकूण उत्पन्न रु. ५० लाख ते रु. १ कोटी: १०%
एकूण उत्पन्न रु.१ कोटी पेक्षा जास्त : १५%
२. उत्पन्नाचे वर्गीकरण:
विविध स्त्रोतांद्वारे(मार्गांमधून) मिळणाऱ्या उत्पन्नाचे वर्गीकरण हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. उत्पन्नाचे वर्गीकरण पुढील ५ प्रकारात केले जाते-
- पगार
- घरापासून मिळणारे उत्पन्न (Income from house property)
- व्यवसाय/ धंद्यामधून मिळणारे उत्पन्न(Income from business)
- भांडवली नफा (Capital gain)
- इतर मार्गाने मिळणारे उत्पन्न.
वरील सर्व उत्पन्न विचारात घेणे आवश्यक आहे.
३. फॉर्म 16 व फॉर्म 12BA:
एम्प्लॉयरने कर्मचाऱ्याला अवांतर प्राप्ती, इतर पुरवठे आणि पगाराशिवाय इतर फायदे पुरवले असल्यास त्याची माहिती फॉर्म १२BA मध्ये भरुन देणे आवश्यक आहे.
४. फॉर्म 26AS:
तुम्ही भरलेल्या टॅक्सची आणि तुमच्या टॅक्समधून डिडक्ट(कपात) केलेल्या टॅक्स संदर्भातील संपूर्ण माहिती असणारे हे एक दस्तऐवज (डॉक्युमेंट) आहे. सदर फॉर्म तुम्ही इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या वेबसाईटवरुन डाउनलोड करता येतो. ITR फाईल करताना हा फॉर्म विचारात घेणे खूप आवश्यक आहे. यामध्ये TDS कपातीपासून टॅक्स रिफंड , ॲडव्हान्स टॅक्स पर्यंतची सगळी माहिती उपलब्ध असते.
गुंतवणूकीवरील वजावटींच्या सवलती:
१. गृहकर्जाचा हप्ता (Interest on housing loan) रु. २,००,०००/- पर्यंतच्या व्याजावर कर-सवलत मिळते.
२. पीपीएफ(PPF), एनएससी(NSC), युलिप(ULIPS), ईएलएसएस (ELSS) यावरील गुंतवणुकीवर रु.१,५०,०००/- पर्यंत कर-सवलत मिळते. वरील सर्व माहिती तुम्ही एम्प्लॉयरला देणे गरजेचे आहे. फॉर्म 16 भरताना EPF सोबतच वरील गुंतवणूकींची माहिती भरणेही आवश्यक आहे.
५. ITR फॉर्म्स
ITR1: हा फॉर्म पगार घेणाऱ्या स्वतंत्र व्यक्तीला ( Individual salaried) लागू होतो.
ITR2: हा फॉर्म HUF किंवा स्वतंत्र व्यक्ती ज्यांचा व्यवसाय किंवा उद्योग नसणाऱ्यांना लागू होतो.
ITR2A: हा फॉर्म HUF किंवा स्वतंत्र व्यक्ती ज्यांची एकापेक्षा जास्त प्रॉपर्टी (House property) आहे, परंतू ज्यांचा व्यवसाय किंवा उद्योग नाही, किंवा कुठलाही भांडवली नफा(Capital gain) अथवा परदेशी गुंतवणूक नाही अश्या व्यक्तींना लागू होतो.
६. ITRV:
आयकर कायदा १९६१ नुसार ज्यांचं वार्षिक उत्पन्न रु.५,००,०००/- पेक्षा जास्त आहे, अशा व्यक्तींनी ई-रिटर्न फाईल करणे बंधनकारक आहे. डिजिटल सही (DSC) नसली तरीही ITRV फॉर्म भरणे बंधनकारक आहे. सदर फॉर्म इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या वेबसाईट वरुन डाउनलोड करुन व्यवस्थित भरुन त्याची प्रिंट काढून त्यावर सही करुन पोस्टाने अथवा स्पीड-पोस्टने इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडे पाठवून द्यावा लागतो. ITRV- यामधील V चा अर्थ व्हेरीफिकेशन म्हणजेच पडताळणी. सदर फॉर्म रिटर्न्स फाईल केल्यापासून 120 दिवसांच्या आत इन्कम टॅक्स डिपार्टमेन्टकडे पाठवणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास तुमचे ई रिटर्न अपात्र(invalid) ठरते व नव्याने रिटर्न फाईल करावे लागतील. ITR च्या इलेक्ट्रॉनिक व्हेरिफिकेशनसाठी इंटरनेट बॅंकिंग, आधारकार्ड, ई. असे काही मार्ग उपलब्ध आहेत.
सौजन्य
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
Sir i m a college student and i have demat account,mi 2017-2018 mde trading keli ahe tyat intraday positional derivative trading kele ahe,mazyakde fkt 10000 rs ahet demat accountvr,jo profit zalela to loss mde gela,
Maza family annual income 70000 ahe,my father was not under any itr, and mi student ahe
Maza que asa ahe ki mla itr bharava lagel ka just because ki maz demat account ahe ani mi tyavr trade kelet,
यात कोणतीही करदेयता येत नाही आणि व्यवहार कर बसत नाही अशा मर्यादेत असल्याने विवरणपत्र भरण्याची जरुरी नाही काही चौकशी झालीच तर व्यवहाराचा तपशील जपून ठेवावा.