आपल्या बाईकची क्षमता वाढवण्याचे ७ सोपे उपाय

आपल्या स्वप्नातली आपली आवडती मोटरसायकल/बाईक घेण्यासारखं दुसरं सुख नाही.

अनेक जणांच नोकरी मिळल्याबरोबरचं ते पहिलं स्वप्न असतं. तर अशी ही आपल्या स्वप्नातली मोटरसायकल आपल्या घरी आली की आपण तिची सर्वतोपरी काळजी घेतो, रोज पुसून बाईक स्वच्छ ठेवणे, रंग आणि गाडीचे इतर पार्ट खराब होऊ नयेत म्हणून ती सावलीत लावणे हे सगळं तर आपण नीट पाळतोच.

शिवाय आपल्या आवश्यकतेनुसार गाडीत काही बदलही करता येतात ज्यामुळे गाडीचा स्पीड वाढतो किंवा गाडीचा लुक ही बदलता येतो.

हे सगळं आपण आपल्या आवडीप्रमाणे करत असतोच. म्हणून आज आपण गाडीची क्षमता वाढवण्याचे ७ सोपे मार्ग पाहणार आहोत, ज्यामुळे गाडीचा स्पीड वाढेल, एकूण परफॉर्मन्स सुधारेल आणि गाडीचं आयुष्य देखील वाढेल.

गाडीची क्षमता वाढवण्यामागे सहसा दोन कारणे असतात, एक म्हणजे रायडर्सना गाडीचा स्पीड वाढवून हवा असतो, म्हणजे भन्नाट स्पीडनी गाडी चालवता येते किंवा प्रोफेशनल रेस मध्ये देखील भाग घेता येतो.

आणि दुसरं कारण म्हणजे जर खराब रस्त्यांवर बाईक वारंवार चालवली जात असेल तर तिचे टायर खराब होऊ नयेत तसेच शॉक-अप्स देखील खराब होऊ नयेत.

तर मग पाहुयात कोणते सोपे मार्ग आहेत ज्याने आपल्या बाईक चा परफॉर्मन्स वाढेल.

१. बाईकच्या ईग्निशन मध्ये सुधारणा करणे 

ईग्निशन मुळे स्पार्क पडून पेट्रोल वापरले जाऊन गाडीचे इंजिन सुरु होते. ईग्निशन मध्ये प्रामुख्याने कॉईल, स्पार्क प्लग आणि वायर्स असतात. लहान ईग्निशन ऐवजी मोठे सुधारित ईग्निशन वापरले तर बाईक चा परफॉर्मन्स सुधारतो.

२. बाईकचा सायलेंसर बदलणे 

बाईकचा सायलेंसर बदलून नवा सुधारित सायलेंसर घेतला तर बाईक चा परफॉर्मन्स तर सुधारतोच पण बाईकमधून येणारा आवाज कमी होतो आणि बाईक दिसायलाही छान दिसते.

तसेच नवीन सायलेंसर हा कार्बन फायबर किंवा टायटेनियम धातूचा असल्यामुळे वजनाने हलका असतो.

त्यामुळे बाईकचा स्पीड वाढतो. परंतु सायलेंसर बदलताना तो आपल्या बाईकला योग्य आहे ना हे तज्ञांकडून माहीत करून घेणे आवश्यक आहे.

३. एअर फिल्टर मधून येणारा हवेचा झोत वाढवणे 

हि बाईकचा परफॉर्मन्स सुधारण्याची ही सर्वात सोपी आणि स्वस्त असणारी युक्ति आहे.

बाईक मध्ये इंजिन जवळ एक एअर फिल्टर असतो ज्यामधून हवा शुद्ध होऊन इंजिन पर्यंत जाते आणि पेट्रोलचे ज्वलन चांगल्या प्रकारे होऊन बाईकला जास्त मायलेज मिळते.

एअर फिल्टर स्वच्छ ठेवणे हे तर उपयुक्त आहेच पण आधीचा फिल्टर बदलून “मश्रूम हेड एअर फिल्टर“ ह्या प्रकारचा फिल्टर बसवला तर इंजिन कडे जाणारा हवेचा झोत वाढतो आणि शुद्ध हवा जास्त प्रमाणात पेट्रोलच्या ज्वलनासाठी उपलब्ध होते.

त्यामुळे बाईक चा परफॉर्मन्स सुधारतो.

४. बाईक ची नियमित तपासणी आणि सर्विसिंग करणे 

बाईक चा परफॉर्मन्स सुधारण्याचा हा सर्वोत्तम उपाय आहे. तुमच्या बाईक ची मान्यताप्राप्त गॅरेज मधून तज्ञ मेकॅनिक कडून नियमित तपासणी करून घेणे आवश्यक आहे.

तसेच वेळोवेळी बाईक ची सर्विसिंग करणे आणि खराब झालेले पार्ट बदलून तिथे चांगले ओरिजिनल पार्ट बसवणे हे बाईक च्या चांगल्या परफॉर्मन्स साठी आवश्यक आहे.

५. कार्बोरेटर ट्यून करणे 

कार्बोरेटर हे इंजिनला योग्य प्रमाणात हवा आणि पेट्रोल ह्यांच्या मिश्रणाचा योग्य प्रमाणात पुरवठा करते.

योग्य प्रमाण शोधून काढून त्या पॉइंट ला स्क्रू च्या मदतीने कार्बोरेटर ट्यून केला असता कायम ते प्रमाण मिळवणे शक्य होते.

आणि त्यामुळे बाईकचा परफॉर्मन्स कायमस्वरूपी सुधारतो.

६. गियर रेशो बदलणे 

बाईकच्या गियर चे एकमेकांशी असणारे प्रमाण बदलणे हे बाईकच्या परफॉर्मन्स साठी चांगले असते. लहान व मोठ्या गियरचा रेशो अड्जस्ट केला तर बाईकची चाके वेगाने फिरून बाईकला चांगला स्पीड मिळू शकतो.

७. बाईकचे अनावश्यक वजन कमी करणे 

काही वेळा आधुनिक बाईक ह्या नवीन डिझाईनच्या बनवलेल्या असतात तेव्हा काही छान दिसणारे पॅनल बाईकला बसवलेले असतात.

त्यामुळे बाईक छान तर दिसते परंतु बाईक चे वजन मात्र वाढते आणि त्यामुळे बाईक च्या मायलेज वर, परफॉर्मन्सवर परिणाम होतो.

असे अनावश्यक पॅनल जर काढून टाकले तर बाईकचे वजन बरेच कमी होते आणि त्यामुळे परफॉर्मन्स मध्ये बराच फरक पडतो.

तर अशा प्रकारे आपल्या बाईक मध्ये काही बदल करून आपण तिचा परफॉर्मन्स सुधारू शकतो. परंतु हे सर्व तज्ञांच्या सल्ल्याने करणे आवश्यक आहे.

शिवाय गाडीबद्दल सर्व माहिती जेव्हा आपल्याला असेल तेव्हा आपण मेकॅनिक कडून गाडीची योग्य ती सर्व्हिसिंग करून घेऊ शकतो.

तसेच आपण हेही लक्षात घेतले पाहिजे की एकदा का आपण बाईक मध्ये काही बदल केलेकी बाईकच्या कंपनीची बाईकच्या बाबतीतली वॉरंटी संपते.

त्यामुळे बदल करण्याचा निर्णय आपण विचारपूर्वक घेतला पाहिजे. तर मग लेखात दिलेल्या माहितीचा वापर करा आणि तुमच्या बाईकच्या सुधारलेल्या परफॉर्मन्सचा आनंद घ्या.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।