घरात सोफासेट असो, डिनरसेट असो किंवा मेकअप सेट असो पण तुम्हाला नीट ‘सेट’ व्हायचे असेल तर ‘माइण्ड सेट’ असल्याशिवाय पर्याय नाही. आणि हे ‘माईंड’ सेट कसे ठेवायचे म्हणजे ‘चित्तवृत्ती उत्तम कशा ठेवायच्या’ ते वाचा या लेखात.
शाळेत शिकताना कधी एकदा मोठे होतो असे सगळ्यांनाच कधी ना कधी वाटून गेलेले असते..
मात्र मोठे झाल्यावर एक वेगळीच शाळा सुरू होते.. ‘आयुष्याची शाळा’.. जी आपल्याला अखंड शिकवत राहते.. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत..
फक्त प्रत्येकाचा अभ्यासक्रम वेगळा असतो.. आपापल्या हुशारी प्रमाणे..!!!
कोणी स्वतःच्या अनुभवातून शिकतो.. तर कोणी दुसऱ्यांच्या अनुभवातून शिकतो.. कोणी खूप कष्टाणे शिकतो तर कोणी एकाच झटक्यात ज्ञानी होतो..
तर कोणी सतत हारत, पडत, रांगत आयुष्याचे धडे घेत जातो.. पण हे आयुष्याचे धडे घेत राहणे आणि त्याची परिक्षा देत रहाणे हे कोणालाच चुकत नाही.. ह्यातून आपण दरवेळी तावून सुलाखून निघत असतो..
ह्या प्रोसेस मधून जाताना कित्ती वेळा आपल्या मनाची चलबिचल होत असेल..??!! नक्कीच..
कोणी हताश होतो तर कोणी आनंदी.. हे अगदी स्वाभाविक आहे.. कारण सगळ्यांनाच दुनियादारीची शिकवण नसते..
पण जो ह्या जीवनाच्या शाळेत आपले मनःस्वास्थ्य सुदृढ ठेवू शकला, जो स्वतःला उत्तोरोत्तर प्रगतीपथावर घेऊन गेला तो खरोखर जिंकला..
फार अवघड नसते हे चित्त शांत ठेवणे, यासाठी स्वतःला सतत अपग्रेड करत राहायचे.. कसे ते आज ऎका..
१. स्वतःचे आयुष्य स्वतःसाठी आणि स्वतःच्या तत्वांवर जगा
मनाचेTalks चे सगळेच लेख तुम्हाला ही गोष्ट अगदी मनापासून सांगत असतात.. की स्वतःच्या स्वप्नांना भरारी द्या..
मोठी मोठी स्वप्न बघा आणि त्यांना सत्यात नक्की आणा.. कारण आयुष्य सार्थकी लावायचे असेल तर आपल्या ‘मनाचे’ Talks ऐकणे गरजेचे असते..
जीवन अत्यंत क्षणभंगुर आहे.. ह्याची जाणीव आपल्याला आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर होत असते.. त्यामुळे करते सवरते झाल्यावर स्वतःच्या आयुष्याला स्वतः आकार द्यायला सुरुवात करा..
मृत्यू शय्येवर पोचल्यावर मी असे जगायला हवे होते, किंवा जर मी हे करू शकलो असतो तर आज आनंदाने डोळे मिटले असते.. अशा ‘जर-तर’ च्या वाक्यांना काही अर्थ रहात नाही.. त्यापेक्षा हातात वेळ असतानाच आपले आयुष्य आपल्या हातात ठेवा..
चांगले सल्ले, चांगले मार्गदर्शन जरूर घ्या पण शेवटचा निर्णय तुमचा असू द्या.. यामुळे ठेचकाळलो तरी त्याचा अभिमानच वाटेल.. मोठी स्वप्नं त्याशिवाय पूर्णत्वास येत नसतात..!!
२. वेळोवेळी व्यक्त व्हा:
पुरुष असो वा स्त्री.. भावभावना सगळ्यांनाच असतात आणि त्या वेळोवेळी व्यक्त करणे हे माणूस असण्याचे लक्षण आहे..
‘मर्द को दर्द नही होता’ किंवा ‘असली मर्द रोते नही’ हे धादांत खोटे समज आहेत.. जर असे खरंच होत असेल तर तो पुरुष माणूस नाही..
दगडाचे हृदय असणे हे काही फार चांगले लक्षण नाही.. आणि रडणे हे कमजोरीचे लक्षण अजिबात नाही.. त्यामुळे खळखळून हसणे, वाईट वाटल्यावर रडणे हे हेल्दी आहे.. 🤗
राग, प्रेम, दुःख हे दाखवणे जमले पाहिजे.. कोणाला काही सांगायचे असल्यास दिलखुलासपणे सांगता आले पाहिजे.. आपली चूक मान्य करता आली पाहिजे.. कोणाच्या कर्तुत्वाला सलाम करता आला पाहिजे.. हे सगळे करणे आपल्या मनासाठी, आपल्या चित्तासाठी खूप उपयुक्त आहे.. स्वतःच्या मॅच्युरिटी मध्ये होणारे चांगले बदल तुम्हाला स्वतःलाच जाणवतील..
३. काम नेटास नेणे महत्वाचे परफेक्शनिस्ट होणे हे लोकांना ठरवू द्यात
एखादे काम करण्याची संधी मिळाली तर सोडू नका. अवघड असेल तरी प्रयत्न करा.. ते काम व्यवस्थित पूर्ण करा..
काम न करताच रडणे अयोग्य असते.. असे रडण्याची सवय लागली तर आयुष्याच्या असंख्य अवघड परीक्षांमध्ये तुम्ही पास कसे होणार..??
हे लहान मुलांसारखे असते.. स्पर्धेत भाग घेणे महत्वाचे असते.. त्याने मुलांना आत्मविश्वास मिळतो.. जिंकणे न जिंकणे हा एक खेळाचा भाग..
तसेच आयुष्यात समोर येणाऱ्या सगळ्या टास्क्स पूर्ण करण्याकडे कल ठेवा.. तुम्ही परफेक्शनिस्ट आहात की नाही ते लोक ठरवतील..
You give your best shot.. And be a better human.!!
४. मोठे ध्येय ठेवा
मोठे ध्येय ठेवणे आणि त्या दिशेने काम करणे हे फक्त स्वतःसाठीच आदर्शवत नसते तर आपल्याला फॉलो करणारेही ह्यातून खूप काही शिकत असतात. आदर्श घेत असतात.
आपण स्वतःला उत्तम बनवतो आणि आपल्याबरोबर अजून २-४ जणांना घेऊन जात असतो.. उच्च ध्येय ठेवणे आणि ते गाठणे आयुष्याला सतत नवीन दिशा देत असते..
५. आयुष्यातले अवघड प्रश्न सोडवा
‘संकट’ ही आयुष्याच्या शाळेतली परीक्षाच जणू.. कितीही संकटे आली तरी धीर खचू देऊ नका.. अवघड प्रश्न सोडवले तर आपल्याला जास्ती मार्क मिळतात आणि आनंदी वाढतो हे आपण शाळेत असताना अनुभवलेच..
आयुष्याचे असेच असते. मोठे संकट पार केले की आनंदाला पारावार उरत नाही…
६. मनाच्या हिमतीचा आलेख चढता बनवा
आपल्याकडे काही नसेल, कशाची कमी असेल तर त्याचे खापर इतरांवर फोडण्यापेक्षा आपण कुठे कमी पडतोय का ते पहा..
कष्ट करून आयुष्यात सगळ्या गोष्टी मिळवा. नसलेल्या गोष्टींसाठी मनाची तयारी करा…आपल्या यशाचा, समूतदारीचा आलेख चढता ठेवा..
असे करणारे कधीच ‘ब्लेम गेम’ खेळत बसत नाहीत.. जे काही कमवायचे असेल ते स्वतःच्या हिमतीवर कमवतात..
७. आयुष्याला सवयींपेक्षा शिस्त जास्ती लावा
शिस्त अंगी असणारी माणसे आयुष्यात खूप यशस्वी होताना आपण बघतो. आपल्या आयुष्यातले धडे आपण शिस्त असल्याशिवाय पूर्ण करू शकत नाही..
काही चांगल्या सवयी ज्याप्रमाणे आपले आयुष्य सुकर करतात त्याचप्रमाणे जर आपल्याला शिस्तीची सवय असेल तर कित्येक परीक्षा आपल्या नकळत आपण अलगद सोडवून मोकळेही होतो..
म्हणजे हे जे यश आहे ना ते फार काही अवघड नसते.. फक्त काही उत्तम सवयी आणि अंगातली शिस्त तुम्हाला ती यशाची रेस पूर्ण करून देऊ शकतात..
तर आजपासूनच काही तत्व ठरवा.. त्याची शिस्त स्वतःला लावायला थोडा वेळ लागेल पण पाठलाग सोडू नका.. बघा तर शिस्त अंगीकारून..!!
८. प्रत्येक कामात एकाग्रता आणि सातत्य ठेवा
हाती घ्याल ते तडीस न्याल हे ऐकलेच असेल तुम्ही.. पण ते तडीस नेणे त्यालाच जमते जो आपला संपूर्ण वेळ त्या कामाला देतो.. आपले पूर्ण लक्ष त्यात गुंतवतो..
घरात मुलांशी खेळताना फक्त तेच काम करा.. एकीकडे ऑफिसचा कॉल आणि दुसरीकडे मुलांशी खेळणे ह्यात कोणतेच काम पूर्ण होत नाही. एखाद्या कामात एकाग्रता ठेवणे आपल्या व्यक्तिमत्वाला अपग्रेड करायला उपयोगी पडते..
म्हणून कामात सातत्य ठेवा.. धरपकड अजिबात नको.. जो सातत्याने कार्यरत असतो तो यशाचे शिखर सर करतो..
९. संभाषणावर प्रभुत्व मिळवा
कोणताही बिझनेस कोर्स केला तर आपल्याला त्यात कम्युनिकेशन शिकवतात.. उत्तम संभाषण कौशल्य तुमच्याकडे असेल तर तुम्ही खूप आघाड्यांवर पुढे राहू शकता.
संभाषण कौशल्य हे फक्त नोकरी धंद्यासाठीच नाही तर नातेसंबंधांसाठीही जादूची छडी फिरवायचे काम करते.. नवरा बायकोतले संभाषण जर उत्तम असेल तर त्यांचे कौटुंबिक स्वास्थ्य सुद्धा उत्तम असते..
मुले त्यातूनच शिकतात आणि उत्तम नागरिक बनतात..
आपल्या मुलांशी, आई वडिलांशी, नातेवाईकांशी आणि मित्रमंडळींशी असलेले प्रेमाचे धागे बळकट करण्यासाठी आपल्या जिव्हेवर आपला लगाम असला पाहिजे..
१०. रोज वाचन, व्यायाम करा आणि सकारात्मकता वाढवा
रोज उत्तम वाचन करा.. वाचन आपल्याला प्रगल्भ बनवते.. नवीन माहिती देते.. जगाशी अपडेटेड ठेवते..
त्याचबरोबर व्यायाम करणे मेडिटेशन करणे आपल्या शरीराला, मनाला मजबूत करते.. दिवसातले काही क्षण आपण स्वतःला प्रसन्न करण्यासाठी घालवले पाहिजेत..
थोडक्यात काय तर स्वतःला अपग्रेड करण्यासाठी स्वतःला वेळही द्या.. त्याने तुमच्या प्रत्येक विचारात, तुमच्या प्रत्त्येक कार्यात सकारात्मकता येईल..
आपल्या मोबाईल मधले ऍप करत राहता ना वेळोवेळी अपडेट, एक्सपीरियन्स चांगला मिळण्यासाठी….
आयुष्याच्या प्रत्येक धड्यामध्ये आपल्याला एक शिकवण असते.. ती समजून घेऊ लागलो तर आपणही एक व्यक्ती म्हणून हळू हळू प्रगती करतो.. हळू हळू प्रगल्भ होतो..
येणारी मोठी संकटेही लहान वाटायला लागतात.. शेवटी चित्त शांत असेल तर आपण कोणत्याही वादळापुढे उभे राहण्यास समर्थ ठरतो.. हो ना?!
मनाचेTalks वाचत राहा. सकारात्मकतेने डोस जितके रिपीट कराल तितकी ती तुमच्यात भिनत जाईल.
आपल्या मित्र परिवाराची ‘एनर्जी लेव्हल मेंटेन’ ठेवण्यासाठी हा लेख शेअर करा. पण कृपया कॉपी-पेस्ट कोणी करू नका. यात वेबसाईट, फेसबुक सगळीकडे शेअर करण्याचे पर्याय दिलेले आहेत. तुमच्यासाठी लिहिणाऱ्यांच्या भावनांचा आदर करा.
धन्यवाद.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
हा अमृतमेवा वाचताना स्वताला त्यात पाहतो. तुमचं लेखन किती परिणामी आहे माहित नाही तुम्हाला. जेवण चुकेल पण हा लेख नाही.
मनस्वी धन्यवाद🌹
फार चांगला लेख आहे वाचुन मनाला उभारी मिळाली
मनस्वी धन्यवाद🌹
खुप छान लेख
खूप छान माहिती मिळाली. धन्यवाद
खुप सुंदर लेख आपले लेख वाचल्यानंतर मन एकदम पॉजिटिव होते असेच सुंदर लेख पेजवर पाठवा.. धन्यवाद🙏💕
अतिशय सुरेख लेख मनाला उभारी देणारा, हिम्मत देणारा, मनाला कस सावरावे हे शिकविणारा लेख.
मनाचे talks टीम चे मनापासून आभार, धन्यवाद आणि अशीच हया स्कारात्मता पसरविण्याचा उपक्रमाला खुप खुप शुभेच्छा.
I never seen this type of blog in my life nice blog 👍👍👍
Thanks & keep reading…. 👍
मनाचेTalks च्या लेखांचे अपडेट्स मोफत मिळवण्यासाठी 👇खाली दिलेल्या ग्रुप लिंकवर क्लिक करून त्यामध्ये जॉईन व्हा. या ग्रुपमध्ये फक्त ऍडमिन पोस्ट करू शकणार असल्याने ग्रुपमध्ये अपडेट्स शिवाय काही इतर असणार नाही.
तसेच सबस्क्रिप्शन थांबवायचे असल्यास, जॉईन केलेला ग्रुप ‘लिव्ह’ करून द्यावा.
त्याचबरोबर मनाचेTalks च्या सर्व पोस्ट न चुकता फेसबुकच्या न्यूज फीड मध्ये दिसण्यासाठी पोस्टच्या वरच्या उजव्या कोपऱ्यावर असलेले तीन डॉट्स वर दाबून ‘Add मनाचेTalks to Favourites’ यावर क्लिक करा…
https://chat.whatsapp.com/JLjIBVTJdWJCr3SXLk38KE
Very useful tips thank you
It’s very excellent writing skill and this emotions directly enter to bottom of heart…..thanks team manache talks… excellent subject and it’s explanation…
Thanks 🌹 Keep up reading 👍