विसरा केमिकल ब्लिच! तजेलदार चेहऱ्यासाठी वापरा हे घरगुती ब्लीच

सामान्यतः पडणाऱ्या पुढील 👉 प्रश्नांची उत्तरे या लेखात सापडतील:  गोरे होण्यासाठी साबण | तेलकट चेहरा उपाय | चेहरा उजळण्यासाठी घरगुती उपाय | चेहरा उजळण्यासाठी काय करावे | चेहरा सुंदर दिसण्यासाठी | चेहरा काळा पडण्याची कारणे | चेहरा उजळण्यासाठी काय खावे | चेहरा गोरा कसा करायचा | घरगुती ब्लीच

मैत्रिणींनो खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत एक संपूर्ण नैसर्गिक ब्लीच.

हे बनवायला अगदी सोपं आहे. तुमच्या घरीच असलेल्या रोजच्या उपयोगाच्या वस्तू वापरून हे झटपट तयार करता येतं.

शिवाय पार्लर मध्ये जाऊन वेळ आणि पैसे खर्च करण्याची पण गरज नाही. आणि याचा ग्लो पाहून तर तुम्ही आश्चर्यचकित होऊन जाल!!!

पाहूया तर मग हे…

घरगुती ब्लीच बनवण्याची कृती आणि त्याचे फायदे

ब्लीचचे फायदे जाणून घेऊया

त्वचा उजळवण्याचे काम ब्लीच करते. जर त्वचा तजेलदार दिसत असेल तर सौंदर्याला सोनेरी झळाळी येते. तुमचा रंग गोरा असो की सावळा त्वचेवर नैसर्गिक तजेला असणे महत्त्वाचे !!!

ब्लीचमुळे त्वचेचा काळसर पडलेला भाग पुन्हा उजळतो. सूर्यप्रकाशामुळे टॅनिंग होते आणि आपला रंग काळवंडून जातो.

याशिवाय हाताची कोपरे, गुडघे, पावले, मान काळी पडली असतील तर ते दिसायला खराब दिसते. ब्लीचमुळे तिथला काळा रंग निघून जातो. तसेच वाढत्या वयानुसार सैल पडणारी त्वचा टाइट करण्यासाठी याचा उपयोग होतो.

केमिकल ब्लीचमुळे कोणता त्रास होऊ शकतो?

पार्लर मध्ये बहुतेक वेळा केमिकल ब्लीच वापरतात. याचा रिझल्ट लवकर मिळत असला तरीही तो दीर्घ काळ टिकत नाही.

याशिवाय त्वचा संवेदनशील असेल तर केमिकल ब्लीचची ऍलर्जी होण्याची शक्यता असते. त्वचा लालसर होणे, भाजल्या सारखे डाग पडणे, खाज किंवा पुरळ येणे अशाप्रकारचा त्रास होऊ शकतो. काही वेळा चेहऱ्यावर लावलेल्या केमिकल ब्लीचची रिऍक्शन म्हणून डोळे लाल होणे, जळजळ, डोळ्यातून पाणी येणे अशा समस्या निर्माण होतात.

नैसर्गिकरीत्या तयार केलेल्या प्रॉडक्ट्सचे दुष्परिणाम होत नाहीत. यांचा वापर दीर्घ काळ करता येतो. यांना स्कीन फ्रेंडली असे म्हटले जाते. लहान मुलांपासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत कोणीही हे सुरक्षितपणे वापरु शकतात.

आता पाहूया घरगुती ब्लीच बनवण्याची कृती

हे ब्लीच अगदी कमी खर्चात आणि झटकन तयार होते. त्यामुळे तुम्हाला कोणत्याही समारंभाला जायचं असेल तर पार्लर मध्ये जाऊन एवढा वेळ घालवण्यापेक्षा आरामात घरची कामं करता करता स्वतःचे ब्युटी थेरपिस्ट बना.

ब्युटी बरोबर बचत सुद्धा करा !!!

घरगुती ब्लीचसाठी लागणारे साहित्य

  • एक मध्यम आकाराचा बटाटा
  • एक मध्यम आकाराचा टोमॅटो
  • मुलतानी माती दोन चमचे
  • बेसन एक चमचा
  • लिंबू रस किंवा गुलाबजल

सर्वप्रथम टोमॅटो व बटाटा स्वच्छ धुवून घ्यावेत. बटाट्याची साल काढून किसणीवर बटाटा किसून घ्यावा.

एका स्वच्छ सुती कपड्यावर किंवा रुमालाचा वापर करून बटाट्याचा रस पिळून घ्यावा. एका वाटीत हा रस काढून ठेवावा.

साधारणपणे चार ते पाच चमचे रस निघतो. यानंतर टोमॅटो सुद्धा किसून घ्यावा. कपड्याचा वापर करून याचा रस काढावा.

हा रस बटाट्याच्या रसात मिसळून घ्यावा. यातील घटकांमध्ये रासायनिक क्रिया होऊन मिक्स करताच या मिश्रणावर थोडा फेस येतो. 

दोन‌ मिनिटे हे मिश्रण स्थिर ठेवावे. आणि नंतर यात दोन‌ चमचे मुलतानी माती व एक चमचा बेसन मिसळून व्यवस्थित मिक्स करावे.

जाडसर पेस्ट बनवावी व त्यात ताज्या लिंबाचा रस किंवा गुलाबपाणी घालावे. हे मिश्रण ब्रशच्या सहाय्याने त्वचेवर लावायचे आहे. त्यामुळे जास्त पातळ बनवू नये. थर देता येईल इतपत जाडसर असावे.

तीन ते चार थर देणे आवश्यक आहे. चेहरा, हात, पावले, मान व अंडर आर्म्स या ठिकाणचा काळपटपणा या नैसर्गिक ब्लीचमुळे निघून जातो.

यात कोणत्याही प्रकारचे केमिकल नाही. त्यामुळे हे ब्लीच लगेच धुवून न टाकता अर्धा तास लावून ठेवावे. तरच याचे इच्छित परिणाम दिसून येतात. ब्लीच वाळले की थंड पाण्याने धुवून टाकावे.

नैसर्गिक, घरगुती ब्लीचचे गुणधर्म

बटाट्याचा रस त्वचेचा रंग उजळण्याचे कार्य करतो. यात नैसर्गिक स्कीन लाइटनर्स म्हणजे त्वचेवर चमक आणणारी घटकद्रव्ये असतात.

यामुळे निस्तेज त्वचा सुंदर, निरोगी दिसते. बटाट्यामधे असलेले स्टार्च त्वचा तरुण ठेवण्यासाठी मदत करते. यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या, डाग कमी होतात. त्यामुळे वाढत्या वयाच्या खुणा मिटवण्यासाठी हा उपाय आवर्जून करावा.

टोमॅटो मधे लायकोपिन नावाचे घटकद्रव्य असते. हे बटाट्यामधील स्कीन लाइटनिंग एजंट्स सोबत मिळून नैसर्गिक ब्लीच निर्माण करते.

मुलतानी माती हजारो वर्षांपासून सौंदर्य उपचारासाठी वापरली जाते. पूर्वीच्या काळी स्त्रिया स्नानासाठी साबणाऐवजी मुलतानी माती वापरत असत. याने नैसर्गिकरीत्या स्क्रब केला जातो.

त्वचेवरील मृत पेशी काढून टाकण्यासाठी याचा उपयोग होतो. त्यामुळे त्वचा मुलायम व उजळ होते. स्कीन डिटॉक्स म्हणून याचा वापर केला जातो. शरीरावरील धूळ, प्रदूषण यांचा थर व त्यावर घाम चिकटल्यामुळे साचलेली त्वचेवरील अशुद्धी दूर होते. स्क्रब करताना होणारे हलके घर्षण रक्तप्रवाह सुरळीत करते. यामुळे त्वचेचे शुद्धीकरण होते व नैसर्गिक चमक येते.

बेसन मृत पेशींचा थर काढून कांती उजळ बनवते. शरीराची त्वचा कोरडी पडलेली असेल तर बेसन मुळे त्वचा मुलायम होते. म्हणूनच उटणे बनवताना बेसन वापरतात.

लिंबू रस यात व्हिटॅमिन सी असते. हे ब्लीचला अधिक कार्यक्षम व प्रभावी बनवते. पण चेहऱ्यावर जास्त प्रमाणात पिंपल्स असतील किंवा संवेदनशील त्वचा असेल तर लिंबाचा वापर करु नये. त्या ऐवजी गुलाबजल वापरावे.

गुलाबजल हे सुगंधी असून मन प्रसन्न करणारे आहे. गुलाबजल त्वचा मृदू राखण्यासाठी उपयुक्त आहे.

या नैसर्गिक ब्लीचमुळे सैल‌ पडलेली त्वचा घट्ट होते. डाग, सुरकुत्या नाहीशा होतात व त्वचेचे तारुण्य टिकून राहते.

नैसर्गिक ब्लीच बनवताना कोणती काळजी घ्यावी?

यासाठी वापरायची भांडी व कपडा स्वच्छ धुतलेले असावेत. ब्रश देखील दरवेळी धुवून व सुकवून ठेवावा. हे ब्लीच बनवून ठेवू नये. ज्यावेळी वापरायचे असेल तेव्हा फ्रेश बनवून वापरून टाकावे.

मैत्रिणींनो, हे ब्लीच बनवून नक्की वापरून पहा. केमिकल युक्त सौंदर्य प्रसाधने टाळा. आपल्या त्वचेची काळजी घेताना नैसर्गिक प्रॉडक्ट्सना प्राधान्य द्या.

हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करुन सांगा. आपल्या मैत्रिणींना टॅग करा. लाईक व शेअर करायला विसरू नका.

Image Credit : You Tube Channel – Indian Mom On Duty

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।