चांगलं लेखन करता येणं हे सवयीने जमू शकतं का??…. हो नक्कीच जमू शकतं!!
‘ऍक्सीडेंटल जिनियस’ या पुस्तकात लेखक बनण्याच्या मार्गाची सुरुवात कशी करायची ते सांगितले आहे. चांगले लेखन करून सुद्धा तुम्ही पैसे कमवू शकता!! म्हणूनच शिकून घ्या लेखनाची सुरुवात कशी करता येईल.
‘ऍक्सीडेंटल जिनियस’ म्हणून मार्क लेवी यांचं एक पुस्तक आहे. हे पुस्तक आपल्याला शिकवतं, विचार कसा करायचा, तो विचार शब्दात कसा उतरवायचा…
एक्स्पर्ट्स च्या अभ्यासानुसार दिवसभरात माणसाच्या मनात ६० ते ८० हजार विचार येऊन जातात.
विचार करणं ही काही शकण्याची गोष्ट नाही. विचार हे आपोआप आपल्या मेंदूत तयार होत असतात. हाच आपला नेहमीचा समज असतो.
त्यामुळे त्या विचारांचा नुसताच गुंता होऊन जातो. विचार करायला आणि ते विचार नीट रचायला आपल्याला कोणी शिकवलेलंच नसतं.
हा गुंता सोडवण्यासाठी लेखक मार्क लेवी यांनी ‘फ्री रायटिंग’ ही संकल्पना पुढे आणली आहे.
‘फ्री रायटिंग’ हे फक्त एखाद्या लेखकाचंच काम आहे आणि ते त्यालाच शक्य आहे असं मात्र समजू नका!!
ज्याला विचार करता येतो असा प्रत्येकजण फ्री रायटिंग करू शकतो….
फ्री रायटिंग म्हणजे नुसता तुम्ही जो विचार करता तो लिहीत जायचा. पण तरीही शेवटी यातूनच ‘ऍक्सीडेंटल जिनियस’ कसा तयार होतो ते लेखात पुढे वाचा.
पुढे वाचा फ्री रायटिंग करण्याचे चार नियम
१) न थांबता लिहा: न थांबता वागाने लिहिले की आपला मेंदू भरकटत नाही.
म्हणजे बघा काही विचार आला, तो तुम्ही लिहायला घेतला पण तेवढ्यात व्हॅट्स ऍप चे काही नोटिफिकेशन आले आणि तिकडे जर तुम्ही मोर्चा वळवला तर लिहिण्याचा फ्लो तिथेच थांबेल आणि तो विचार सुद्धा पुन्हा तुम्हाला मांडता येणार नाही.
आपल्या विचारांचा स्पीड हा आपल्या हातापेक्षा कैक पटींनी जास्त असतो. म्हणून फ्री रायटिंग करण्याचा पहिला नियम म्हणजे ‘न थांबता लिहीत जायचं’
तुम्ही वेगाने लिहीत जाल तेव्हा व्याकरणाच्या चूक होतील. पण ‘फ्री रायटिंग’ करताना तिकडे लक्ष देऊ नका.
एकदा लिहून झालं की मग तुम्हाला झालेल्या चुका सुधारण्याचा वेळ मिळेलच. आता या पहिल्या टप्प्यात तुम्ही फक्त लिहीत जा.
फ्री रायटिंग मध्ये तुमचा कल हा फक्त आणि फक्त डोक्यात आलेल्या कल्पना, विचार लिहिण्याकडे असला पाहिजे.
२) लिहिण्यासाठी एक वेळेचं बंधन घालून घ्या: कुठल्याही कामला वेळेचं बंधन असेल तर तुमचा फोकस हा फ़क्त कामावरच राहील.
लेखनाची डेडलाईन ठरवून ठेवली तर तुम्हाला कामात क्लियारीटी येईल. लेखनच नाही कुठल्याही कामाला डेडलाईन हि असलीच पाहिजे.
३) आपल्या विचारात बदल करू नका: तुम्ही जेव्हा पण लिहायला बसला तेव्हा आपल्या विचारावर लिहा.
तुमचं लिहिलेलं इतरांना पण सहज समजलंच पाहिजे असा अट्टहास या ‘फ्री रायटिंग’ च्या पहिल्या टप्प्यावर करू नका.
एकदा तुम्ही तुमच्या विचारांना कागदावर उतरवलं की मग पुढे तुम्ही त्याला चांगलं रूप देऊ शकता.
व्याकरण किंवा इतर गोष्टींचा विचार केला तर तुम्ही एका ठिकाणी स्टक व्हाल…
आता बघा इथे मी सरळ ‘स्टक’ लिहून मोकळी झालेय!! त्यासाठी दुसरा मराठी शब्द आहे पण फ्री रायटिंग करताना असेच लिहिण्याचा ओघ राहावा म्हणून भाषा, व्याकरण यांचे बंधन ठेऊ नका. त्या चुका पुढच्या टप्प्यात सुधारायचा आहेतच….
एक विचार तुम्ही लिहिला पण पुन्हा तुम्हालाच वाटलं की नाही हा विचार असा नाही तसा लिहिला गेला पाहिजे तर तसे न करता. आपले विचारच लिहा.
त्याला पक्के रूप देताना एका कल्पनेपासून अनेक कल्पना तुमच्यासमोर उलगडत जातील.
४) सरळ लिहीत चला: लिहिताना सरळ लिहीत चला. मागच्या एखाद्या ओळीवर पुन्हा विचार करून ते सुधारायला पुन्हा मागे जाऊ नका.
नाहीतर विचारांचा गुंता होऊन लिखाणाला तिथेच ब्रेक लागेल.
५) मुद्दे: फ्री रायटिंगच्या आधी हवे तर तुम्ही काही मुद्दे लिहू शकता. ही मुद्दे लिहिण्याची सवय एरवी सुद्धा असलेली चांगलीच.
दिवसभरातल माणसाच्या डोक्यात बऱ्याच भन्नाट कल्पना येत असतात. नेहमीच काही कल्पना आली आणि तुम्ही लिहायला बसलात असे होत नाही…
आशा वेळी मुद्दे लिहायची सवय लावून घ्या. आणि मग वेळ मिळाला की हे मुद्दे गुंफून ठेवणं हा सुद्धा फ्री रायटिंगचा एक चांगला प्रकार होऊ शकतो.
अशी सवय लावून घेतली तर तुम्ही ‘स्टोरी टेलर’ किंवा कथाकार चांगले होऊ शकता.
मुद्दे लिहिले तर माणसाला खूप छान कल्पना सुचायला लागतात. आपले मुद्दे सोप्या शब्दात लिहा. त्यावर जास्त विचार करू नका.
हे तर झाले फ्री रायटिंग चे काही नियम. पण आता प्रश्न येतो आपल्या विचारांना वाढवायचं कसं?
आता विचारांना वाढवायचं म्हणजे काय?
आता बघा, आज जेवण काय बनवायचं, हे लॉक डाऊन कधी संपणार वगैरे वगैरे अशा विचारांनी काही ‘फ्री रायटिंग’ करता येणार नाही.
लिखाणाचा विषय मनोरंजक किंवा माहिती देणारा असण्यासाठी तुमचे विचार हे कल्पक असले पाहिजेत.
आणि म्हणून फ्री रायटिंग करताना स्वतःशी खरंच बोललं पाहिजे असं नाही…
हे खोटं बोलणं म्हणजे स्वतःला कुठेतरी लांब स्वप्नांच्या जगात घेऊन जाणं!!
तुम्ही तुमचे इमॅजिनेशन सुद्धा ‘फ्री रायटिंग’ मध्ये लिहू शकता.
लिहिताना तुम्ही फक्त खऱ्या जगातच राहिलात तर आपली विचार करण्याची क्षमता तुमच्याकडून पूर्ण वापरली जाणार नाही.
आपली विचारांची क्षमता वाढवण्यासाठी आपल्याबरोबर कोणीतरी आहे जो आपल्याला काही प्रश्न विचारतो अशी कल्पना करा?
म्हणजे हे संभाव्य प्रश्न स्वतःच स्वतःला विचारा…
यातून कित्येक नवनवीन कल्पना समोर येतील.
आता पुढचा टप्पा येतो की तुमच्या कल्पना खरंच चांगल्या आहेत की नाहीत हे समजून घेणं!!
इतरांना आपल्या लिहिलेल्या गोष्टी दाखवा ज्याने त्यांना तुमचे लिहिलेले विचार आवडलेत की नाही, हे तुम्हाला समजेल.
आपल्या विचारांच्या कक्षा रुंदावण्यासाठी वाचन करत राहा. आपल्या लिहिलेल्या गोष्टींना सांभाळून ठेवा. हेच लेहीलेले नंतर कधी पाहण्यात, वाचण्यात आले तर त्यात पुन्हा काही सुधारणा तुम्हाला मिळू शकते.
बघा लेखक बनण्याच्या मार्गातल्या या अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत. पण असेच हळूहळू खूप चांगले लेखक बनणे सुद्धा तुम्हाला शक्य आहे.
आजच्या या जगात आपल्यातले गुण ओळखून काम करायला जो शिकतो तोच पुढे जाऊ शकतो.
जमीन- जुमला यासारखीच लेखन ही सुद्धा ‘रियल इस्टेट’ असू शकते यावर एकदा विचार करून बघा आणि आपल्यातला लेखक जागा करून बघा.
आणि हि अशी सुरुवात करून कोणाला जर छान लिहायला जमलेच तर आमच्याबरोबर लिहायला सुरुवात सुद्धा करून टाका!!!
वाचण्यासारखे आणखी काही:
‘अफिलीएट मार्केटिंग’ म्हणजे काय? ती कशी करावी? (व्यवसाय मार्गदर्शन)
ऍमेझॉन सेलर बनण्यासाठी काय करावे लागते? (व्यवसाय मार्गदर्शन)
आयुष्यभर तुम्हाला भरपूर कमाई करून देतील ही १० कौशल्ये
Image Credit: highonfilms
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
I have written few things during this period and before too. If I want share with you what would be the correct platform.
You can send your writeups at articles@sh051.global.temp.domains
I am interesting for writing .plz contact .
You can send your writeups at articles@sh051.global.temp.domains
I Am Interested
Please send CV and sample article of 800 to 900 words at articles@sh051.global.temp.domains
छान आहे कल्पना विचार तर रोज होत असतात पण कधी मांडत नव्हतो आज तुमच्या कडून भरपूर शिकायला मिळालं.
I write on YourQuote platform..can I share my writeups with you..?
Yes you can contact on team@sh051.global.temp.domains