अक्षय्य तृतीया, साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी गणला जाणारा एक मुहूर्त. शुभ दिवस असल्याने नविन कामांची सुरूवात ह्यादिवशी करावी असं मानलं जातं. सणासुदीला, शुभ मुहूर्तांना सोने घेण्याचीही पद्धत आपल्याकडे आहे. अक्षय्य तृतीयेला तर सोन्याच्या दुकानांत लोकांची तोबा गर्दी बघायला मिळते. सोने खरेदीला अक्षय्य तृतीयेपेक्षा दुसरा चांगला मुहूर्त नाही असा समज लोकांच्यात दिसून येतो. पण ह्यामागचा त्यांचा खरा हेतू बघितला तर सोने खरेदी म्हणजे चांगला मोबदला मिळवून देणारी गुंतवणूक असा आढळतो. हे पुर्वीच्या काळी खरेही होते. थोडी बचत करून सोने घेतले की त्याचे वधारणारे भाव बघता अडीअडचणीच्यावेळी ते विकून बऱ्यापैकी मोबदला मिळायचा. पण तेव्हा गुंतवणुकीचे इतर पर्यायही उपलब्ध नव्ह्ते किंवा उपलब्ध असून लोकांना त्याविषयी फारशी माहिती नसल्याचं दिसून यायचं.
गेल्या काही वर्षात मात्र परिस्थिती बदलेली पहायला मिळते. सोन्याचे भाव वाढत तर आहेतच, परंतु Investment म्हणून सोनेखरेदीचा पर्याय फारसा उपयोगी पडताना दिसत नाही. शिवाय आता गुंतवणुकीचे इतरही पर्याय उपलब्ध आहेत, ज्याविषयी लोकांना बऱ्यापैकी माहिती असते.
ह्यासगळ्याचा नीट अभ्यास केला असता स्टॉक्स किंवा इक्विटीसारख्या पर्यायांमध्ये गुंतवणूक केल्याने सोन्यापेक्षा चांगला मोबदला मिळतो असे लक्षात येते. इकॉनॉमिक टाईम्स वेल्थचा पुढील तक्ता* पाहिल्यास हे सहज लक्षात येईल की आत्ताच्या परिस्थितीत सोनेखरेदी ही फायद्याची गुंतवणूक नाही.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.