जागतिक अवकाश क्षेत्रात इसरोचे नाव

जागतिक बाजारात काही ब्रँड असे आहेत कि ज्यांची गुणवत्ता, उपयोगिता आणि निर्मिती कौशल्य इतक्या उच्च दर्जाचं असतं की बस नाम ही काफी है… आजवर मोबाईल फोन, वाहन क्षेत्र, इलेक्ट्रॉनिक वस्तू, घड्याळ ते अगदी साध्या कपड्या पर्यंत देशात विदेशात असे अनेक ब्रँड आहेत ज्यावरून ग्राहकाला फक्त त्या ब्रँडच्या नावाने आपण घेतलेली वस्तू अथवा दिलेले पैसे योग्य परतावा देतील ह्याची खात्री असते. ही खात्री कोणत्याही ग्राहकाच्या मनात मग तो भारतीय असो वा विदेशातील, निर्माण करायला प्रचंड मेहनत लागते, आपला दर्जा टिकवावा लागतो, विक्री पश्चात सेवा द्यावी लागते तसेच निर्माण होणाऱ्या अडचणी मधून ग्राहकाचं समाधान करावं लागतं. ह्या सगळ्यातून जे ब्रँड तावून सुलाखून निघतात त्यांचं नाव जगभरात आदराने तर घेतलं जातंच पण गुणवत्तेचं प्रतीक म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं.

भारत ह्या ब्रँड निर्मिती मध्ये जगात खूप कमी क्षेत्रात नावाजलेला असला तरी एका क्षेत्रात भारताची ब्रँड व्हॅल्यू ही खूप मोठी होत आहे. हे क्षेत्र आहे ‘अवकाश क्षेत्र.’ गेल्या काही वर्षात तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे अवघ्या काही देशांपुरतं मर्यादित असलेलं अवकाश क्षेत्र आता जगातील सर्व देशांना खुणावते आहे. पण त्याचवेळी सगळ्या देशांकडे इतके पैसे मोजण्याची तयारी नाही. उपग्रह निर्मिती केल्यावर त्याला अवकाशात प्रक्षेपण करण्यासाठी लागणाऱ्या रॉकेट तंत्रज्ञानावर पैसे खर्च करणं परवडणारं नाही. त्यामुळे स्वस्त आणि किफायतशीर पण त्याच वेळी गुणवत्ता आणि दर्जा राखवणाऱ्या जगातील मोजक्या देशांच्या रॉकेटकडे हे ग्राहक आकर्षित होत आहेत. २०१८-१९ ला १३ बिलियन अमेरिकन डॉलर असणारा उपग्रहांचा बाजार २०२८ पर्यंत ५० बिलियन इतका प्रचंड वाढणार आहे. पुढल्या चार वर्षात प्रत्येक वर्षात ८०० पेक्षा जास्त उपग्रह अवकाशात सोडण्यासाठी रांगेत उभे आहेत. तर पुढल्या दशकात हीच संख्या ८००० पेक्षा जास्त होणार आहे.

ह्या सगळ्या वाढणाऱ्या बाजारात आपलं स्थान भारताने आपल्या भरवशाच्या पी.एस.एल.व्ही. रॉकेट ने आधीच निर्माण केलेलं आहे. पी.एस.एल.व्ही. चा यशाचा आलेख जगातील रॉकेट बाजारात सर्वोत्तमपैकी एक मानला जातो. आजवर ४८ उड्डाणात त्याने ४५ वेळा यशस्वी उड्डाण केलं आहे. आजवर ३०० पेक्षा जास्त उपग्रह अवकाशात नेताना एकाच वेळी १०४ उपग्रह प्रक्षेपित करण्याचा जागतिक विक्रमही भारताच्या नावावर आहे. पी.एस.एल.व्ही. च्या एका उड्डाणाचा खर्च साधारण १३०-२०० कोटी रुपयांच्या घरात येतो. लो अर्थ ऑर्बिट मध्ये ३८४० किलोग्रॅम तर सन सिंक्रोनाईज ऑर्बिट मध्ये १७५० किलोग्रॅम ह्याची क्षमता आहे. जगातील मोठे देश मोठ्या वजनाच्या उपग्रहांच्या प्रक्षेपणांकडे लक्ष केंद्रित करत असताना इसरोने एका छोट्या रॉकेटच्या निर्मितीवर काम सुरु केलं.

लो अर्थ ऑर्बिट मध्ये ५०० किलोग्रॅम तर सन सिंक्रोनाईज ऑर्बिट मध्ये ३०० किलोग्रॅम इतके छोटे उपग्रह स्वस्तात नेणाऱ्या स्मॉल सॅटेलाईट लॉन्च व्हेहिकल रॉकेटची निर्मिती इसरो करत आहे. ह्या रॉकेटच्या प्रत्येक उड्डाणाचा खर्च अवघा ३० कोटी रुपये असणार असून एका आठवड्यात हे रॉकेट तयार होऊन उड्डाण भरण्यास सक्षम असणार आहे. इसरोचं हे रॉकेट अजून निर्माण झालेलं नाही किंवा निर्मितीनंतर ह्याची चाचणी झालेली नाही. अश्या स्थितीत सुद्धा इसरोची रॉकेट निर्मिती मधील गुणवत्ता, कौशल्य ह्यावर जगाने शिक्कामोर्तब केलं आहे. जी अमेरिका आपल्या परताव्याची खात्री असल्याशिवाय कुठेच पैसे लावत नाही. त्याच अमेरिकास्थित स्पेसफ्लाईट कंपनी ने इसरोच्या स्मॉल सॅटेलाईट लॉन्च व्हेहिकल रॉकेटचं बुकिंग फुल करत हाऊसफुलचा बोर्ड लावला आहे.

उपग्रह निर्मिती आणि त्यांचं प्रक्षेपण हा दोन पैशाचा खेळ नाही. कोट्यवधी रुपये प्रत्येक उपग्रह निर्मितीत लागलेले असतात. त्यामुळे रॉकेट प्रक्षेपणात झालेली चूक करोडो रुपयांचा चुराडा करू शकते. ज्या रॉकेटची निर्मिती झालेली नाही ज्याचं प्रक्षेपण झालेलं नाही अशा वेळेस एक दोन नाही तर चार उपग्रहांचं प्रक्षेपण करण्याची जबाबदारी देणं इसरोची अवकाश क्षेत्रातील ब्रँड व्हॅल्यू किती मोठी आहे हे अधोरेखित करते आहे. इसरोचं स्मॉल सॅटेलाईट लॉन्च व्हेहिकल रॉकेट आपल्या पहिल्या चाचणी उड्डाणात भारतीय डिफेन्सचे दोन उपग्रह ‘लो अर्थ ऑर्बिट’मध्ये प्रक्षेपित करेल तर आपल्या दुसऱ्या चाचणी उड्डाणात स्पेसफ्लाईट ह्या अमेरिकन कंपनी चे ४ उपग्रह प्रक्षेपित करणार आहे. चाचणी घेताना ती यशस्वी असणार ह्याची खात्री असल्याशिवाय कोणतीही कंपनी इतकी मोठी रिस्क घेणार नाही हे सर्वज्ञात आहे. ह्यामुळे इसरो अवकाश क्षेत्रात एक ब्रँड म्हणून स्थापन झाला आहे ज्याचं स्थान आता “बस नाम ही काफी है” इतकं उंच आहे.


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी किंवा तुमचे स्वतःचे लेखन मनाचेTalks वर प्रकाशित करण्याची इच्छा असल्यास येथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।