का_मजीवनाबद्दल आपल्या समाजात मोकळेपणाने बोलले जात नाही.
खरेतर आपल्या देशाला वात्सायन ह्यांच्यासारखे ऋषि, खजुराहो सारखी मंदिरे ह्यांचा उत्तम वारसा लाभलेला आहे.
तरीही का_मजीवनाबद्दल बोलायचे झाले की आजही भुवया उंचावल्या जातात आणि कुजबूज करतच बोलणे होते.
परंतु ज्याप्रमाणे शरीर सुदृढ आणि निरोगी असणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे निरोगी आणि निरामय का_मजीवन देखील असणे जरुरीचे आहे.
निरोगी शरीर राखण्यात ज्याप्रमाणे आहाराचा महत्वाचा सहभाग असतो त्याचप्रमाणे का_मजीवनावर देखील घेतल्या जाणाऱ्या आहाराचा परिणाम होत असतो. त्यामुळे का_मजीवन सुधारण्यासाठी इतर उपायांबरोबरच सुयोग्य आहार असणे आवश्यक आहे.
अशा पौष्टिक आहारामुळे शरीराचा थकवा दूर होतो, मरगळ कमी होते, उत्साह वाढतो तसेच सेक्स हॉर्मोन्सना चालना मिळाल्यामुळे सेक्स ड्राइवही वाढतो. ज्या पुरुषांना इरेक्टाईल डीसफंक्शनचा त्रास असतो ते आपल्या आहारात योग्य बदल करून त्या समस्येवर सहजपणे मात करू शकतात.
आज आपण रंजक आणि निरोगी कामजीवन असण्यासाठी आहारात कशाकशाचा समावेश असावा ते पाहणार आहोत.
१. सुका मेवा आणि बिया
सर्व प्रकारचा सुका मेवा जसे की काजू, बदाम, अक्रोड, सुके अंजीर, बेदाणे, मनुका, जर्दाळू आणि अळशीच्या, कलिंगडाच्या बिया ह्यांचे नियमित सेवन करण्यामुळे शरीर तंदुरुस्त होण्यास मदत होते. तसेच शरीराला आवश्यक ते पोषण मिळते. शारीरिक आजार होण्याचे प्रमाण कमी होते. से_क्स हॉर्मोन्सना चालना मिळते. से_क्स पॉवर वाढते.
२. मांसाहार
उत्तम से_क्स लाइफसाठी सर्व प्रकारचा मांसाहार जसे की चिकन, मटण आणि मासे अतिशय उपयुक्त आहे. जे लोक मांसाहार करतात त्यांनी हा उपाय अवश्य करावा. मांसाहारामुळे शरीराला भरपूर प्रमाणात प्रोटीन मिळते. प्रोटीनमुळे शरीर सशक्त राहण्यास मदत होते. तसेच मांसाहारामुळे से_क्स हॉर्मोन्सना चालना मिळून हेल्दी से_क्स लाइफचा अनुभव घेता येतो.
३. बीट
शाकाहारी लोकांसाठी देखील तितकेच प्रभावी पदार्थ आहेत जे से_क्स लाइफ वाढवू शकतात. बीट हे त्यापैकीच एक आहे. बीट खाल्ल्यामुळे उत्साही आणि एनर्जेटिक वाटते. बीट खाल्ल्यामुळे शरीरात नायट्रीक ऍसिड सोडले जाते. त्यामुळे शरीरातील रक्तवाहिन्या थोड्याशा प्रसरण पावतात आणि शरीरातील रक्ताभिसरण वाढते. तसेच बीटमध्ये असणाऱ्या बोरॉनमुळे से_क्स ड्राइव वाढतो. इ_रेक्टा_ईल डीस_फंक्शनच्या त्रासावर देखील बीट विशेष उपयोगी आहे.
४. सफरचंद
दररोज एक सफरचंद खाल्ल्यामुळे से_क्स ड्राइवमध्ये वाढ झालेली दिसून येते. तसेच एकूणच शरीर निरोगी आणि सशक्त होते. थकवा नाहीसा होतो. त्यामुळे उत्तम से_क्स लाइफ साठी दररोज एक सफरचंद जरूर खावे.
तर हे आहेत असे पदार्थ ज्यांच्या सेवनामुळे कामजीवन सुधारण्यास मदत होऊ शकते.
तसेच ते अधिक रंजक आणि निरोगी होऊ शकते.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.