कानात पाणी गेले तर ते काढण्यासाठी नेमके कोणते उपाय करावेत?

कानात पाणी गेल्यामुळे हैराण झाले आहात? उपाय जाणून घेण्यासाठी वाचा हा लेख.

आंघोळ करताना किंवा पोहताना कानात पाणी जाणे, ही एक अगदी कॉमन समस्या आहे.

कानात पाणी गेले की ती व्यक्ती अगदी हैराण होऊन जाते. कानातले पाणी निघून जाईपर्यंत चैन पडत नाही अशी अवस्था होते.

मग ते पाणी काढून टाकण्यासाठी निरनिराळे उपाय केले जातात. परंतु असे उपाय करताना योग्य ती खबरदारी घेतली नाही तर कानाला इजा होऊ शकते.

कानाला, कानाच्या आतील पडद्याला किंवा इतर नाजुक भागाला इजा होऊ नये म्हणून, आज आपण कानात पाणी गेले असता ते नेमके कोणते उपाय करून काढावे हे जाणून घेणार आहोत.

त्याचबरोबर कानाला इजा होऊ नये म्हणून काय करू नये, हे सुद्धा सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

आपल्या कानांची योग्य काळजी घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा. आणि इतरांसाठी शेअर करा.

डोक्यावरून आंघोळ करताना, पोहताना किंवा इतर कोणत्याही कारणाने कानात पाणी गेल्यास ते काढण्यासाठी खालील उपाय करावेत. 

१. कानात पाणी गेल्यावर सर्वप्रथम कानाचा बाहेरील भाग एखादा टॉवेल किंवा कोरड्या फडक्याने पुसून घ्यावा.

परंतु तो टॉवेल किंवा कोरडे फडके कानाच्या आत खूपसण्याचा प्रयत्न करू नये.

तसे केल्यास कानाच्या आतील भागाला आणि पडद्याला इजा होऊ शकते. ज्या कानात पाणी गेले असेल त्या बाजूला डोके वाकवून किंवा त्या बाजू वर झोपून कानाचा बाहेरील भाग ओढून आतील ईयर कॅनॉल सरळ करावा.

तसे करण्यामुळे आत गेलेले पाणी बाहेर येऊ शकेल.

२. ब्लो ड्रायरचा वापर करून कानातील पाणी काढता येऊ शकते. परंतु ब्लो ड्रायरचा वेग सर्वात कमी (लोएस्ट सेटिंग) करून मगच त्याचा वापर करावा.

कानापासून किमान एक फूट अंतरावर ब्लो ड्रायर धरावा. कानाची पाळी ओढून धरून हळूहळू ड्रायरने कानात हवा सोडावी. शक्यतो थंड हवेचा वापर करावा.

कान कोरडा झाल्याचे जाणवल्यावर ड्रायर बंद करावा. हा उपाय वापरताना कानाला इजा होणार नाही याची खूप खबरदारी घेणे आवश्यक आहे. लहान मुलांच्या बाबतीत हा उपाय करू नये.

३. ज्या कानात पाणी गेले असेल त्या बाजूला डोके वाकवून कानावर तळहात दाबून धरावा.

तळहाताने कानाची पाळी दाबून आत मध्ये व्हॅक्युम क्रिएट करण्याचा प्रयत्न करावा. हातामुळे कानात अशा प्रकारची पोकळी निर्माण झाल्यावर आतील पाणी ताबडतोब बाहेर येईल.

४. कानात  गेलेले पाणी बाहेर काढण्याचा आणखी एक उपाय म्हणजे नाक दाबून धरणे.

काही सेकंदासाठी तोंड बंद करून दोन्ही नाकपुड्या दाबून धरा.

त्यानंतर हलकेच उच्छवास बाहेर टाका. असे करण्यामुळे एक प्रकारचा आवाज होईल आणि कानातील पाणी बाहेर येईल.

हा उपाय करताना नाकपुड्याना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. लहान मुलांच्या बाबतीत हा उपाय करू नये.

कानात गेलेले पाणी बाहेर काढण्यासाठी कोणते उपाय करू नयेत?

आम्ही आधी सांगितल्याप्रमाणे कान हा एक महत्त्वाचा आणि नाजूक अवयव आहे.

कानाच्या आतील भागाला इजा झाल्यास त्याचा थेट परिणाम ऐकण्याच्या क्षमतेवर होऊ शकतो.

त्यामुळे कानात गेलेले पाणी बाहेर काढताना, अतिशय खबरदारी घेणे आवश्यक असते.

पूर्वापार चालत आलेले काही उपाय करत करताना कानाला इजा होऊ शकते. म्हणून आपण कानात गेलेले पाणी बाहेर काढण्यासाठी काय करू नये हे आज जाणून घेणार आहोत.

१. कानात गेलेले पाणी बाहेर काढण्यासाठी कानात कोणतीही वस्तू घालू नका.

इयर बड्स, पेन्सिल, पेन,  रुमाल, कोणतीही टोकदार वस्तू  इत्यादी गोष्टी कानात घालू नयेत.

एक तर तसे करण्यामुळे कानात गेलेले पाणी बाहेर येण्याऐवजी आणखी आत जाऊ शकते.

तसेच अशा वस्तूंमुळे कानाला इन्फेक्शन होऊ शकते किंवा इयर ड्रम आणि कानाच्या आतील भागाला इजा पोहोचल्यास ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो.

२. कानात बोटे घालून कानातील पाणी बाहेर काढणे किंवा कान खाजवणे हे देखील धोकादायक असते.

असे करण्यामुळे इयर कॅनॉल, इयर ड्रम इत्यादी भागाला इजा पोहोचून ईन्फेक्‍शन होऊ शकते.

३. तज्ञ डॉक्टरांच्या परवानगीशिवाय कानात कोणत्याही प्रकारचे इयर ड्रॉप्स घालू नयेत.

तर अशाप्रकारे योग्य उपाय करून आणि योग्य ती खबरदारी घेऊन आपण कानात गेलेले पाणी सहजपणे काढू शकतो.

वरील उपायांनी देखील जर कानातील पाणी बाहेर येत नसेल तरीदेखील एक दोन दिवस वाट पाहणे शक्य आहे. बहुतांश केसेस मध्ये एक दोन दिवसात कानात गेलेले पाणी आपोआप बाहेर येते.

परंतु कानातील पाणी बाहेर येत नसेल आणि त्याच बरोबर ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम झाल्याचे जाणवत असेल किंवा कानदुखी, कानात खाज येणे, कानाचा भाग लाल होणे किंवा कानातून पू येणे अशासारख्या गोष्टी होत असतील तर मात्र तज्ञ डॉक्टरांचा ताबडतोब सल्ला घ्यावा आणि कानावर योग्य ते उपाय करून घ्यावेत.

तर मित्र मैत्रिणींनो,  अशाप्रकारे अगदी सहज सोप्या पद्धतीने आपण आपल्या कानाची काळजी घेऊ शकतो.

हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून हा लेख शेयर करायला विसरू नका.

कर्णनाद/कानात आवाज येण्याची कारणे व उपाय

कानात सतत खाज येण्याची कारणे व उपाय

कानातील मळ काढण्याचे उपाय

Manachetalks

लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।