घरामध्ये लहान मुलांपासून वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत केळी प्रत्येकाला आवडतात.
डझनावारी घेतलेली केळी पटकन पिकतात आणि खराब होतात.
तपकिरी होऊन सडून जातात. एक तर ती पटकन खाऊन संपवणे हा पर्याय आहे.
पण आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे ही केळी जास्त दिवस टिकू शकतील.
1) केळी टांगून ठेवा
केळी जास्त दिवस टिकावी असे वाटत असेल तर टेबलावरती न ठेवता त्यांचे देठ बांधून टांगून ठेवा.
केळीचा घड झाडावरून उतरवला की लगेलच केळी पिकायला सुरुवात होते.
केळीचा घड झाडापासून अलग झाला की त्याचं खोड इथीलीन वायू सोडतं. त्यामुळं पिकण्याची प्रक्रिया सुरू होते.
पण जेव्हा तुम्ही केळी टांगून ठेवता, तेव्हा पिकण्याचा भर जरा ओसरतो.
घरात कुठेही तुम्ही केळी टांगू शकता किंवा खास केळी हँगर्स ही मागवू शकता.
2) कच्ची केळी खरेदी करा
केळयांची खरेदी करताना तुम्ही पिकलेली केळी खरेदी करता त्यामुळं दोन-तीन दिवसातच सगळी केळी एकदम पिकतात, आणि खराब होतात.
हे टाळण्यासाठी केळ्यांची खरेदी करतानाच कच्ची, हिरवी केळी खरेदी करा, म्हणजे तुमची केळी वाया जाणार नाहीत.
समजा त्यातूनही केळी पिकली तर पाकातल्या पुऱ्यांमध्ये ही केळी घालून किंवा अशा काही सुंदर रेसिपी ट्राय करून तुम्ही पिकलेल्या केळ्यांपासून स्वादिष्ट पदार्थ ही तयार करू शकता.
3) प्लास्टिक फॉईलमध्ये देठं गुंडाळा.
इथिलिनची प्रक्रिया मंदावण्यासाठी, केळांच्या पिकण्याचा वेग कमी होण्यासाठी केळीचे देठ प्लास्टिक फॉईल मध्ये गुंडाळा.
प्रत्येक केळं स्वतंत्र फॉईलमध्ये गुंडाळायचा उत्साह तुमच्याकडे असेल तर उत्तमच. त्यामुळे केळी जास्त दिवस टिकतील.
4) पिकलेली केळी फ्रिजमध्ये ठेवा
तुम्ही म्हणाल “काय तुम्ही एकदा सांगताय केळी फ्रीजमध्ये ठेवू नका एकदा सांगता केळी फ्रीजमध्ये ठेवा”
‘हे’ चार खाद्य पदार्थ चुकून सुद्धा फ्रीजमध्ये ठेऊ नका
तर मित्रांनो विकत आणलेली केळी लगेचच फ्रीजमध्ये ठेवू नका.
पण समजा एखादा केळं पिकलं तर ते जास्त पिकून त्याचा लगदा होण्यापेक्षा त्याला लगेचच फ्रीजमध्ये ठेवा म्हणजे त्याची पिकण्याची प्रक्रिया संथ होईल.
5) केळी गोठवा
केळ्यांना गोठण्याची प्रक्रिया किंवा फ्रिज करा, आणि त्यांचं आयुष्य वाढवा.
जर केळी एकदम पिकायला लागली आणि ती सगळी संपणार नसतील तर त्यांना फ्रिज करा किंवा गोठवा.
सालं काढून तुम्ही केळ्यांना फ्रिज करू शकता.
नंतर एखाद्या पदार्थांमध्ये घालण्यासाठी म्हणूनसुद्धा केळी गोठवून साठवू शकता.
आणि त्यासाठी त्याचे तुकडे करूनही तुम्हाला साठवता येईल.
6) केळ्यांचा बॉक्स विकत घ्या
केळी बँगेत घेऊन जाणं एक दिव्यंच असतं.
ऑफिसमध्ये किंवा मुलांना शाळेत टिफिन बरोबर केळं द्यायचं असेल तर ती नेतानाच चिरडून जातात.
त्यासाठी बाजारात उपलब्ध असणारे केळ्याचे स्पेशल बॉक्स घ्या आणि निर्धास्तपणे केळी ऑफिसमध्ये किंवा शाळेत पाठवा.
अन्नाचा पुरेपूर वापर करा. ते फेकून देण्यापेक्षा नीट नियोजन करून वापरा.
आज दिलेल्या टिप्स मुळे तुम्ही तुमच्या घरातील केळी व्यवस्थित टिकवून, पुरवून पुरवून खाऊ शकाल याची आम्हाला खात्री आहे.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.