मित्रांनो, आपल्या सर्वांनाच आनंदी रहायचं असतं, तरीही नेहमी चोवीस तास आनंदी राहणं, आपल्यातल्या बऱ्याच जणांना का जमत नाही?
आणि जोपर्यंत आपण सतत उत्साही आनंदी राहणार नाही तोपर्यंत ‘आकर्षणाचा नियम’ आपल्यासाठी म्हणावा तसा काम करणार नाही.
पण मग आपलं मन दुःखी का होतो, आपल्या दुःखाची कारणे तरी काय आहेत?
मी पाच कारणे शोधली आहे, जर आपण ह्या दोषांप्रति जागरुक राहीलो, स्वतःच्या मनाला शक्तिशाली, व्यापक आणि शिस्तबद्ध एकाग्र बनवलं तर आपण विकारांचे गुलाम राहणार नाही, तर आपल्या आयुष्याचे मालक होवु!
काय आहेत ही पाच कारणे?
१) तुलना – मित्रांनो, आपल्याला एकमेकांजवळ आणण्यासाठी सोशल मिडीया आस्तित्वात आला होता, पण सोशल मिडीयामुळे खरचं माणसं एकमेकांच्या अधिकाधिक जवळ आली का?
माझा कोर्स व्हॉट्सएप वरच आहे पण तरीही मी म्हणेन, व्हॉट्सएप टाईम किलर आहे, उगाच चाळा म्हणुन यंत्रवत हात मोबाईल कडे जातो आणि बोटे व्होटसएप वर!
व्हाट्स ऍप जेव्हा सुरुवातीला इन्स्टॉल करतो, तेव्हा बाय डिफॉल्ट स्टेटस यायचं, “I am using WhatsApp”
पण आज मात्र “WhatsApp is using me” अशी परिस्थिती आहे.
फेसबुक, व्हाट्स ऍप स्टेटसमुळे कोण कुठे काय काय एंज्यॉय करतयं, हे काही क्षणात कळतंय.
कोण कुठे जातयं, काय खातयं, ‘काढ सेल्फ्या आणि कर अपलोड’ हा सगळ्यांचाच एककलमी कार्यक्रम सुरु असतो.
सोशल मिडीया वापरु नका असे मला अजिबात म्हणायचे नाही, पण ह्याचा आपल्या मनावर परिणाम होवु द्यायचा नाही, एवढंच माझं म्हणणं आहे.
“हे किती एंजॉय करतात ना, रोज वेगवेगळ्या ठिकाणी जातात, आणि आपण सडत पडलोय इथेच!”
असा एक विचार मनाच्या जहाजाला छिद्र बनवुन मुडला निराशेच्या पाण्यात बुडवायला पुरेसा असतो.
बरोबरीचे लोक खुप पुढे गेले की त्रास होतोच, पण त्याला हाताळायची कला आपण शिकली पाहीजे.
एखादी सुंदर, आकर्षक व्यक्ती, चांगलं घर, अलिशान गाडी पाहुन त्याची ईर्ष्या करु नका, त्याला मनःपुर्वक आशिर्वाद द्या, आणि मनातल्या मनात हे वाक्य म्हणा,
“मला प्रेरणा दिल्याबद्द्ल, धन्यवाद! हे करु शकतात, तर मीही करु शकतो.”
संकुचित वृत्तीचे लोक लवकर निराश होतात, त्यांची उर्जा अनावश्यक विचारांवर खर्च होते.
तेव्हा मित्रांनो, तुलना करायचीच तर स्वतःची स्वतःसोबत करा, कालच्यापेक्षा आज आपण किती सुधारलो, मागच्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी आपण कोणत्या कला, स्किल्स शिकली? स्वतःचं शरीर मेंटेन करण्यासाठी आपण कोणता व्यायाम केला? मन प्रसन्न ठेवण्यासाठी आपण नियमित ध्यान केलं का नाही?
फालतु हेवेदावे सोडुन स्वतःवर काम करा, मनाची जळमटे साफ स्वच्छ होतील.
२) आळस (लिथर्जी) – जेव्हा आपल्या शारिरीक हालचाली कमी असतात, तेव्हा बोनस म्हणुन आपोआप आळस आपल्या शरीरात कधी घर करतो तेही कळत नाही, आपल्या शरीरात दोन प्रकारचे हार्मोन्स असतात,
काही हार्मोन्स आनंद प्रदान करतात, जसं की सिरॅटोनिन, निसर्गरम्य ठिकाणी गेलं की सिरॅटोनिन संप्रेरीत होते, खुप व्यायाम, स्विमींग किंवा डान्स केला की एंडॉर्फीन रिलीज होतं, ज्यामुळे आनंदाची अनुभुती होते.
नुसतं लोळत पडलं, तणाव आला, भिती वाटली की कॉर्टीसॉल नावाचा हार्मोन सिक्रीट होतो, जो शरीराला अजुनच कडक बनवतो, त्याने विनाकारण चिडचिड वाढते, ज्यामुळे आगीतुन फुफाट्यात अशी गत होते.
हे चक्र आपण सहज तोडु शकतो, आळसाने आपल्या आयुष्यात घुसण्याआधी त्याला हद्द्पार करा, व्यायाम करा, योगासने करा, वॉकिंगला जा.
३) ध्येयहीन जीवन – समजा, तुम्हाला एका प्रवासाला पाठवलं पण कुठे जायचं तेच सांगितलं नाही तर तुम्हाला त्या प्रवासात मजा येईल का? नाही!
जिथे कामाचे टारगेट दिले जाते, तिथे झोकुन देऊन काम करण्याची मजा असते. हा अनुभव तुम्ही कधी ना कधी घेतला असेल. बरोब्बर ना!
ध्येय नसलेल्या लोकांचं जीवन अळणी, बेचव असतं, अशा लोकांसमोर, फक्त आजचा दिवस कसा ढकलावा हा प्रश्न आवासुन उभा राहतो. म्हणुन अशा माणसांना मनोरंजनाच्या साधनाची गरज पडते.
ध्येयाने झपाटलेले लोक, रिकाम्या वेळात मनातल्या मनात स्वतःच्या कल्पनांशी खेळण्यात दंग असतात, आनंदी राहण्यासाठी त्यांना दुसऱ्या पासटाईम ची गरज नसते.
४) दुर्लक्ष – “एखाद्याला समजतयं, की आपलं वजन प्रमाणाबाहेर वाढतयं, पण जाऊ दे, बघु पुन्हा!”
“आयुष्य बदलायचं असेल तर वाईट सवयी बदलाव्या लागतील, करु बदल हळुहळु!”
“कमाई वाढवायच्या कित्येक नव्या कल्पना डोक्यात घोळतायत, पण करु लवकरचं!”
“कळतयं पण वळत नाही!”
टाळाटाळ, चालढकल आणि दुर्लक्ष हे सख्खे भाऊ आपल्या प्रगतीमध्ये पुन्हा पुन्हा अडथळे बनुन येतील, तेव्हा अंतरमनाच्या अफाट शक्तिचा वापर करुन आणि आकर्षणाच्या सिद्धांताच्या बळावर आपण त्यांना सहज हरवु शकतो, त्यांना बाजुला सारुन आपल्या स्वप्नांपर्यंत पोहचु शकतो.
५) Sharing is caring – तुम्ही ह्रषिकेश मुखर्जी दिग्दर्शित ‘बावरची’ सिनेमा पाहीलाय का?
त्यातला राजेश खन्नाचा रोल अप्रतिम आहे. एका अशांत घरात स्वयंपाकी बनुन तो घुसतो, सर्वांवर खुप खुप प्रेम करतो, प्रेमानं जगणं विसरलेल्या लोकांमधली माणुसकी आपल्या स्वभावाने पुन्हा जागी करतो.
कडकडुन भांडणारे दोन भाऊ, पुन्हा एकदा जवळ येतात, एकमेकांवर कामं ढकलणाऱ्या दोन जावा पुन्हा एकदा एकमेकांवर आई मुलींसारखी माया करु लागतात.
आपल्या सुखवस्तु, ऐशआरामी जीवनाचा त्याग करुन लोकांमध्ये प्रेमाची भावना रुजावी म्हणुन नौकर बनुन त्यांची सेवा करणारा राजेश खन्ना ‘इतरांवर निस्वार्थपणे प्रेम करणं हेच खरं जगणं आहे’ हा संदेश देतो.
आजही मी जेव्हा जेव्हा तो चित्रपट पाहतो, माझ्या डोळ्यात पुन्हा पुन्हा अश्रु येतात.
‘एकमेकांवर प्रेम करणं’ हा आपला मुळ स्वभाव आहे, काळाच्या ओघात आपण ह्या जगातल्या काही स्वार्थी लोकांना पाहतो, आणि सगळं जगच स्वार्थी आहे असा गैरसमज करुन बसतो, ऍक्च्युअली तसं नसतं.
जे आपण ह्या जगाला देतो, तेच आपल्याला शंभर पटीने वापस मिळत असतं, इतकचं!
स्माईल द्या, मैत्री मिळेल,
प्रेम द्या, मदत मिळेल,
आदर द्या, सन्मान मिळेल,
दान द्या, समाधान मिळेल,
आनंद द्या, उत्साह मिळेल,
सेवा द्या, शांती मिळेल,
शुभेच्छा द्या, नशीब खुलेल!
आणि सर्वात महत्वाचं,
आभार द्या, जे पाहीजे ते सर्व मिळेल.
तेव्हा उद्यापासुन तुम्ही ह्या जगाला काय देणार आहात?
तुमच्या उत्तरांच्या प्रतिक्षेत,
तुमचाच ‘पंकज’
मनःपुर्वक आभार!
अमेझॉनवर उपलब्ध असलेली अशीच काही मराठी पुस्तके
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
Khup chan.. yatun brch kahi shikayla milale
Very nice and I am agree with your point of view but I really miss my smile somewhere that I want to gain again .