किडनी फेल्युअर म्हणजे नक्की काय? काय आहेत त्याची लक्षणे? किडनी फेल्युअर नक्की कोणत्या कारणांमुळे होते? त्यावर काही घरगुती उपाय शक्य आहेत का? सविस्तर माहिती वाचा या लेखात.
माहिती समजण्यात काहीही चूक होऊ नये म्हणून लेख शेवटपर्यंत वाचा. आमच्या वाचकांसाठी आम्ही नेहमी खूप उपयुक्त माहिती घेऊन येत असतो, त्यामुळे तुमचे अभिप्राय कमेंट्स सेक्शन मध्ये जरूर द्या.
किडनी फेल्युअर म्हणजे काय
किडनी म्हणजेच मूत्रपिंड हा माणसाच्या शरीरातील एक महत्त्वाचा अवयव आहे.
हा अवयव शरीरात मणक्याच्या दोन्ही बाजूंना कमरेच्या थोड्या वरच्या बाजूला असतो.
घेवड्याच्या आकाराचा आणि माणसाच्या मुठीएवढा असलेला हा अवयव शरीराच्या स्वच्छतेचा एक महत्त्वाचा भाग आहे.
ज्याप्रकारे एखादे गाळणे पाण्यातील कचरा, अशुध्दी गाळून शुध्द पाणी देते त्याचप्रकारे मूत्रपिंड शरीरातील टाकाऊ पदार्थ बाजूला करते.
मूत्रपिंड दररोज जवळपास १८० लिटर इतके रक्त शुद्ध करते.
त्यातून दोन लिटर मूत्र दररोज तयार होते. रक्तशुद्धीकरणाबरोबर मूत्रपिंड शरीरातील क्षारांचे प्रमाण संतुलित ठेवण्याचेही काम करते.
मूत्रपिंडातून स्रवणाऱ्या हार्मोन्समुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो.
हाडे निरोगी राहतात आणि लाल रक्तपेशींच्या (आरबीसी) निर्मितीलाही मदत होते. अशी महत्त्वपूर्ण कार्य करणारे मूत्रपिंड निरोगी राहणे अतिशय महत्त्वाचे आहे.
तर अशा या मूत्रपिंडांची शरीराची शुद्धी करण्याची क्षमता कमी झाली अथवा पूर्णपणे बंद झाली, की या आजारास किडनी फेल्यूअर असे म्हटले जाते. किडनी फेल्युअरचे दोन प्रकार आहेत.
१. ॲक्युट म्हणजे तात्पुरते किडनी फेल्युअर – या आजारात किडनीचे कार्य अचानक बंद पडते. सहसा हा आजार बरा केला जाऊ शकतो.
२. क्रोनिक म्हणजे बराच काळापासून हळूहळू होत असलेले किडनी फेल्यूअर – या आजारात किडनीच्या क्षमतेवर हळूहळू परिणाम होत तिचे कार्य बंद पडते. हा आजार जास्त गंभीर स्वरूपाचा असून किडनीची क्षमता पूर्ववत करणे शक्य होत नाही.
जेव्हा किडनीची काम करण्याची क्षमता कमी होते अथवा पूर्णपणे नष्ट होते, तेव्हा शरीरात टाकाऊ पदार्थ तसेच साठून राहू लागतात.
परंतु तरीही सुरुवातीला त्याची थेट लक्षणे दिसून येत नाहीत.
आजार सलग काही दिवस तसाच राहिला आणि त्यामुळे किडनीचे कार्य कमी झाले की काही लक्षणे दिसून येतात ती खालील प्रमाणे…
१. शरीरात कमी प्रमाणात मूत्र निर्मिती होणे.
२. मनाची गोंधळलेली अवस्था होणे (कन्फ्युजन)
३. थकवा
४. अंगाला खाज सुटणे
५. भूक न लागणे, उलट्या होणे, मळमळणे
६. तोंडात एखाद्या धातूची चव लागणे
७. एकाग्रता साधता न येणे
८. फिट्स येणे
९. शरीरावर विशेषत: पावलांवर सूज येणे
१०. छातीत पाणी भरल्यामुळे श्वास घेण्यास त्रास होणे
यापैकी एखादे अथवा काही लक्षणे आढळून आल्यास किडनीचे कार्य तपासून घेणे आवश्यक आहे.
किडनी फेल्युअर होण्याची कारणे
A) ॲक्युट म्हणजे अचानक होणारे किडनी फेल्युअर खालील कारणांमुळे होऊ शकते.
१. किडनीला होणारा संसर्ग
२. डीहायड्रेशन (शरीरातील पाण्याची कमतरता)
३. जास्त प्रमाणात रक्तस्त्राव (अपघात किंवा शस्त्रक्रियेदरम्यान)
४. रक्तदाब खूप कमी असणे लो ब्लड प्रेशर वरील उपाय वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
५. सिटी स्कॅन किंवा MRI दरम्यान वापरल्या जाणाऱ्या डाय मुळे
६. काही औषधांचा साईड इफेक्ट म्हणून.
७. किडनी स्टोन किंवा प्रॉस्टेट ग्रंथीची वाढ किडनी स्टोनच्या त्रासावरील घरगुती उपाय जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
८. ड्रगचा ओव्हरडोस
B) क्रोनिक म्हणजे हळूहळू होणारे किडनी फेल्युअर खालील कारणांमुळे होऊ शकते.
१. दीर्घकाळ असणारा मधुमेह
२. उच्च रक्तदाब रक्तदाब नियंत्रणात ठेवण्याचे उपाय वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
३. काही ऑटो इम्युन आजार
४. काही जनुकीय दोष
५. वारंवार किडनी इन्फेक्शन होणे
किडनी फेल्युअरचे शरीरावर होणारे परिणाम
किडनी आपल्या शरीरातील रक्तशुद्धीचे कार्य तर करतातच पण त्याव्यतिरिक्त देखील काही महत्त्वाचे कार्य करतात. त्यामुळे किडनी फेल्युअरचा आपल्या शरीरावर मोठा परिणाम होताना दिसतो.
१. ॲनिमिया
२. हृदयरोग
३. संधिवात
४. उच्च रक्तदाब उच्च रक्तदाब असल्यास आहारात हे बदल करून बघा… पूर्ण वाचण्यासाठी येथे क्लिक करावे लागेल 🙋
५. प्रतिकारशक्ती कमी होणे
६. पायातील नसांपर्यंत रक्त पुरवठा न झाल्यामुळे पावलांचे सेन्सेशन कमी होणे.
७. कुपोषण
८. शरीरातील पोटॅशियमचे प्रमाण वाढणे
असे परिणाम किडनी फेल्युअरमुळे शरीरावर होताना दिसतात.
किडनी फेल्युअरवरील उपचार
जास्त गंभीर प्रमाणात झालेल्या किडनी फेल्युअरवर तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार करणे अतिशय आवश्यक आहे.
किडनीचे कार्य पूर्णपणे थांबल्यास डायलिसिस करण्याची वेळ येऊ शकते. तसे होऊ नये म्हणून योग्य वेळी औषधोपचार घेणे आवश्यक आहे.
मुळात आपल्या किडनीचे कार्य चांगले राहावे आणि किडनी फेल्युअर होण्याची वेळच आपल्यावर येऊ नये यासाठी आज आम्ही तुम्हाला अकरा सोप्या टीप्स देणार आहोत.
१. रक्तातील साखर नियंत्रणात ठेवा
मधुमेहाचा दूरगामी परिणाम किडनीच्या कार्यक्षमतेवर होत असतो. त्यामुळे जरी तुम्हाला मधुमेह झालेला असेल तरी रक्तातील साखर नियमितपणे नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करा.
२. रक्तदाब नियंत्रणात ठेवा
उच्चरक्तदाबाचा सुद्धा थेट परिणाम किडनीच्या कार्यक्षमतेवर होतो. त्यामुळे योग्य औषधोपचारांनी आपला रक्तदाब नेहमी नियंत्रणात ठेवा. रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी उपयुक्त माहिती देणारे लेख मनाचेTalks वर दिलेले आहेत. या लेखाच्या शेवटी त्याच्या लिंक्स दिल्या आहेत.
३. वजन आटोक्यात ठेवा
स्थूलतेमुळे किडनीच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. त्यामुळे आपले वजन कायम आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न करा.
४. संतुलित आहार घ्या
वजन आटोक्यात ठेवणारा आणि योग्य ते पोषण पुरवणारा आहार घ्या.
५. आहारातील मिठाचे प्रमाण कमी ठेवा
आहारात मिठाचे प्रमाण जास्त असेल तर उच्चरक्तदाबाची शक्यता वाढते आणि पर्यायाने किडनीचे कार्य कमी होते. त्यामुळे आहारातील मिठाचे प्रमाण कमीत कमी ठेवा.
६. भरपूर पाणी प्या
डिहायड्रेशन म्हणजे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाले तर किडनीला होणारा रक्तपुरवठा कमी होतो आणि त्यामुळे त्यांची कार्य करण्याची क्षमता नष्ट होऊ लागते.
असे होऊ नये म्हणून योग्य प्रमाणात पाणी पिण्याची सवय लावून घ्या. भरपूर पाणी पिण्यामुळे शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर जाण्यास देखील मदत होते.
७. मद्यपान करू नका
मद्यपानाचा थेट परिणाम रक्तदाब, वजन वाढणे आणि किडनीचे कार्य यांच्यावर होतो. त्यामुळे मद्यपान करणे टाळा.
८. धूम्रपान करू नका
धूम्रपानामुळे किडनीला होणाऱ्या रक्तपुरवठ्यावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे किडनीचे आजार बळावतात.
९. पेन किलर घेणे टाळा
काही पेन किलरचा किडनीच्या कार्यक्षमतेवर थेट परिणाम होतो. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणत्याही पेन किलर घेणे टाळा.
१०. ताण तणाव कमी करा
ताण-तणावाचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो हे आता सिद्ध झाले आहे. त्यामुळे किडनीचे कार्य सुरळीत सुरू राहण्यासाठी ताण-तणाव कमी करा.
११. नियमित व्यायाम करा
चालणे, पळणे, पोहणे, योगासने यापैकी कोणताही व्यायाम नियमितपणे करा. तसे करण्यामुळे तुमचा मधुमेह, उच्च रक्तदाब तर आटोक्यात राहिलच शिवाय वजन देखील वाढणार नाही. त्यामुळे अर्थातच किडनीचे कार्य सुरळीत सुरू राहील.
नियमितपणे हि आसने केली तर किडनीचे विकार जोडणार नाहीत… आसने व्हिडीओ सहित बघण्यासाठी येथे क्लिक करा.
किडनी फेल्युअर टाळण्याचे ११ सोपे उपाय… पूर्ण वाचण्यासाठी येथे क्लिक करावे लागेल 🙋
डायलिसिस म्हणजे काय आणि त्यासाठी आरोग्य विमा कसा निवडावा… पूर्ण वाचण्यासाठी येथे क्लिक करावे लागेल 🙋
तर मित्र मैत्रिणींनो, या आहेत अगदी सोप्या ११ टिप्स ज्या वापरून आपण आपल्या किडनीचे आरोग्य चांगल्या प्रकारे राखू शकतो.
या टीप्सचा जरूर वापर करा. आज आपण किडनीचे कार्य कमी होण्याची कारणे, लक्षणे पाहिली. त्यासंबंधीची ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून हा लेख शेयर करायला विसरू नका.
लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.