कोणी तुमचा अपमान केला तर काय करता तुम्ही? (प्रेरणादायी लेख)

नियतीला, ब्रम्हांडाला किंवा हवं तर देवाला म्हणा, जेव्हा तुमच्या आयुष्यात एखादा मोठा बदल घडवायचा असतो तेव्हा तो काही दूत पाठवतो….

का माहितीये??

तुमचा अपमान करायला, इन्सल्ट करायला….

ऐकायला काहीतरीच वाटतं ना!! तुम्ही म्हणाल काय काहीतरीच बोलता….

पण थांबा. हे कसं ते पुढे मी तुम्हाला सांगते. हे नुसतंच मोटिव्हेशन डोस पाजण्यापूरतं नाही.  पण पूर्ण लेख वाचल्यावर तुम्हाला पण माझं म्हणणं नक्कीच पटेल.

काल आपल्या मनाचेTalks च्या फेसबुक पेजवर आपण #LetUsTalk मध्ये एक प्रश्न विचारला होता कि “एखाद्याने तुमचा अपमान केला तर तुम्ही काय करता?”

यावर उस्फुर्तपणे बरीच वेगवेगळी उत्तरं मिळाली कोणी सांगितले रडतो/रडते, कोणी सांगितले चीड-संताप येतो, कोणी सांगितले दुःख होते, कोणी सांगितले समोरच्याला त्याची जागा दाखवून देतो. कोणी सांगितले “मान सांगावा जगाला, अपमान सांगावा मनाला” तर कोणी सांगितले चक्क घोडे लावतो 😄

एखाद्याने आपला अपमान केला आपल्याला तुच्छ लेखलं तर तुम्ही काय करता?

राग येतो, चीड येते….. रागात आपणही समोरच्या माणसाला खडे बोल सूनावतो. आणि समोरच्या माणसाला त्याची जागा दाखवून द्यायचा प्रयत्न करतो. बरोबर ना!!

पण असामान्य उंची गाठणारा माणूस काय करतो हे तर बघू आपण!!

टाटांच्या कम्पनीचं पॅसेंजर व्हेहिकल डिव्हिजन तोट्यात चाललेलं असताना रतन टाटा एकदा फोर्डचे हेड बिल फोर्ड यांच्याकडे गेले होते.

आणि त्यांनी बिल फोर्डला request करून टाटाचं पॅसेंजर व्हेहिकल डिव्हिजन खरेदी करायची ऑफर दिली.

बिल फोर्ड टाटांच्या पॅसेंजर व्हेहिकल डिव्हिजनला खरेदी करण्यासाठी तयार तर झाले. पण त्यांनी रतन टाटांचा अपमान पण केला. बिल फोर्ट यांचा रतन टाटांना बोलण्याचा रोख असा होता की, “जर कार विकता येत नाही तर कार बनवता कशाला?

जे काम येत नाही ते सुरूच कशाला करायचं” आणि याच बोलण्याने रतन टाटा आतून पेटून उठले. त्या वेळी त्यांनी बिल फोर्ड यांना उत्तर देऊन राग काढला नाही की बचावात्मक पवित्रा सुद्धा घेतला नाही.

भारतात आल्यानंतर त्यांनी आपल्या इंजिनिअर्स ना बोलवून सांगितलं की टाटा पॅसेंजर्स वर लक्ष द्या आपल्याला एक वल्ड क्लास कम्पनी म्हणून पुढे यायचं आहे.

आणि त्यांच्या पूर्ण टीमने हे स्वप्न लवकरच प्रत्यक्षात आणलं. आणि टाटा चं पॅसेंजर डिव्हिजन दिवसेंदिवस प्रगती करत गेलं. आणि योगायोग असा की फोर्ड कम्पनी काही कारणांमुळे विक्रीत कमी आल्याने आणि भारतातली टाटा कम्पनीची ताकत ओळखल्यामुळे बिल फोर्ट स्वतः टाटांकडे आले आणि त्यांनी टाटांना ऑफर दिली लँड रोव्हर आणि जॅग्वार खरेदी करण्याची.

आणि महत्त्वाचे म्हणजे यावेळी टाटांनी बिल फोर्ड यांचा अपमानही केला नाही.

अपमान झाल्यावर आपल्याला राग येतो, चीड येते.

आणि आपण कम्प्लेन्ट करायला किंवा वाद घालायला सुरू करतो. नाहीतर समोरच्याला क्रीटीसाईझ करायला सुरू करतो. प्रत्येक सामान्य माणूस हेच करतो.

पण असामान्य यशस्वी माणूस जर कोणी त्याचा अपमान केला तर कम्प्लेन्ट नाही करत, क्रीटीसाईझ नाही करत ते स्वतः मध्ये बदल घडवून आणतात.

अमिताभ बच्चन जेव्हा पहिल्यांदा रेडिओ वर इंटरव्ह्यू द्यायला गेले होते तेव्हा त्यांची ताडा-माडा सारखी उंची आणि जड आवाज यामुळे त्यांना रिजेक्ट केलं गेलं.

त्यांच्या आवाजाचे आणि उंचीचे कारण दाखवून त्यांचा अपमान केला गेला. या गोष्टीचं त्यांना वाईट वाटलं पण वाईट वाटलं म्हणून त्यांनी आपल्याला संधी न देणाऱ्यांना क्रिटिसाईझ नाही केलं, पण स्वतःमध्ये बदल केले आणि तीच उंची, तोच आवाज त्यांचा यु.एस.पी. बनला.

जेव्हा कोणी आपला अपमान करतं तेव्हा समोरच्या माणसाशी भांडणं, त्याचा अपमान करणं किंवा त्याला घोडे लावणं हि तर खूप कॉमन गोष्ट आहे.

पण जेव्हा आपण त्या अपमानाला आपल्या आयुष्याचा उद्देश्य बनवू, आपली ताकत बनवू तेव्हा इतिहास घडेल हे लक्षात ठेवा. जर कोणी तुमच्या असफलतेचा अपमान केला, तुमच्या दुःखावर मीठ चोळलं तर सक्सेसफुल होऊन बदल घ्या. म्हणजे अपमान करणाऱ्याला पण एक दिवस तुमच्याकडे मान झुकवून बोलावं लागेल.

लक्षात ठेवा ‘Massive success is the biggest revenge ‘ जर सर्वात मोठा बदला काही असेल तर तो यश…..

https://manachetalks.com/9450/aakrmk-lokanna-samor-ks-jaych-manachetalks/

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

10 thoughts on “कोणी तुमचा अपमान केला तर काय करता तुम्ही? (प्रेरणादायी लेख)”

  1. हे सगळे पैसे वाल्याचे खेळ आहेत.. जगात हे असे नाहि घङत..

    Reply
  2. lekh chan aahe yat dumat nahi .. pan bhasha shaily jara japun waparli pahije .. त्याचा अपमान करणं किंवा त्याला घोडे लावणं हि तर खूप कॉमन गोष्ट आहे. what is this ?

    Reply
  3. Hi मला खूप गरज आहे हा लेख मी माझ्या motivation YouTube channel वर व्हॉईस रेकॉर्ड करून टाकला तर चालेल का?

    Reply
    • मनाचेTalks च्या लेखांवर कॉपीराईट असल्याचे लेखाच्या शेवटी लिहिलेले आहे, या लेखातील कन्टेन्ट यु ट्यूब किंवा इतर कुठल्याही डिजिटल माध्यमात वापरता येणार नाही, तरीही अधिक माहितीसाठी team@sh051.global.temp.domains या इ मेल ID वर लिहा

      Reply
    • #मनाचेTalks च्या लेखांचे अपडेट्स मोफत मिळवण्यासाठी 👇व्हाट्सएप तसेच टेलिग्राम चॅनलला जॉईन होता येईल.

      सर्व लेख नियमितपणे पोहोचण्यासाठी मनाचेTalks चा व्हाट्सएप नंबर, 8308247480 तुमच्या डिव्हाईस मध्ये सेव्ह असू द्या.

      तसेच सबस्क्रिप्शन थांबवायचे असल्यास, जॉईन केलेला ग्रुप अथवा चॅनल ‘लिव्ह’ करून द्यावा.

      त्याचबरोबर मनाचेTalks च्या सर्व पोस्ट न चुकता फेसबुकच्या न्यूज फीड मध्ये दिसण्यासाठी पोस्टच्या वरच्या उजव्या कोपऱ्यावर असलेल्या तीन डॉट्स वर दाबून ‘Add मनाचेTalks to Favourites’ यावर क्लिक करा…

      व्हाट्स ऍप इन्व्हाईट लिंक.👇

      https://chat.whatsapp.com/LTv393KE2TSL0Yu4usFmpZ

      टेलिग्राम चॅनल👇

      https://t.me/manachetalksdotcom

      Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।