नाही मोडता आली, अडचणींची चौकट,
तर फ्रेम करुन सजवायला,….
काय हरकत आहे?…..
साचलाय मनात, खुप दुःखाचा कचरा,.
त्यावर नव्या स्वप्नांचं झाड, रुजवायला,….
काय हरकत आहे?….
आला प्रॉब्लेम, आलेत दुःखं, येऊ द्या की अजुन अपयशं,…
त्यांच्यावर मनसोक्त हसुन, त्यांना खिजवायला,
काय हरकत आहे?…….
कधी झालेच अश्रु अनावर,अन् फोडला, बांध पापण्यांचा तरी,
त्या अनमोल थेंबानी, उमेदीच्या झाडाला, भिजवायला,….
काय हरकत आहे?……
सुखादुःखाचे हिंदोळ्यांनी, आयुष्याचा प्रवास पुढं पुढं, सरकत आहे…….
मग ह्या ‘वन वे’ प्रवासाची, मौज घ्यायला,
कुणाची काय हरकत आहे?…..
वाचण्यासारखे आणखी…
तु नेहमीच म्हणायचा, आपल्या प्रेमाचा गूलकंद कसा गं चाखायचा?
महीला दिन ना आज…
पेढे घ्या पेढे…..
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.