लघवीला जास्त जावे लागत असल्यास, आवळा आणि केळी वापरून करा हा रामबाण उपाय

सामान्यतः पडणाऱ्या पुढील 👉 प्रश्नांची उत्तरे या लेखात सापडतील: लघवी कंट्रोल न होणे उपाय । लघवीला वारंवार जावे लागणे घरगुती उपाय। वारंवार लघवीला येण्याच्या समस्येवर रामबाण उपाय । लहान मुलं झोपेतच अंथरूण ओलं करतात? यावरील उपाय

आयुर्वेदानुसार आवळा ही महान औषधी आहे. बहुगुणी आवळ्याचे अनेक उपयोग आहेत.

प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी तर आवळा जगप्रसिद्ध आहे. म्हणूनच च्यवनप्राशचा मुख्य घटक आहे आवळा!!! अनेक रोगांवर रामबाण उपाय असणारे औषध म्हणजे त्रिफळा. याचाही आवळा हा महत्त्वाचा घटक आहे.

या लेखातून आमच्या वाचकांसाठी एक खास घरगुती उपाय आम्ही सांगणार आहोत. यात आवळा, केळं यांचा वापर केला जातो. सतत लघवीला होत असेल तर त्यावर हे पारंपारिक औषध खूपच प्रभावी आहे.

अगदी एक मिनिटात तुम्ही हे औषध बनवू शकता. आणि तुमच्या घरात नेहमी उपलब्ध असलेल्या पदार्थांचा यात वापर केला जातो.

सतत लघविला जावे लागत असल्यास, आवळ्यापासून ही औषधी घरच्या घरी बनवून वापरा

साहित्य

  • एक केळं
  • एक आवळा
  • अर्धा ते एक चमचा खडी

आवळा स्वच्छ धुवून त्यातील बी काढून टाकावी. आवळ्याच्या गरापासून रस काढावा.
खडीसाखर बारीक करून घ्यावी. किंवा गूळ वापरला तरी चालेल.

ही बारीक केलेली साखर किंवा गूळ आवळ्याच्या रसात मिसळून घ्यावे.
हे मिश्रण एक केळं आणि एक चमचा मधासोबत सेवन करावे.

हा घरगुती उपाय खालील ल‌क्षणे असताना लाभदायक आहे

पाच वर्षांवरील मुले ज्यांना झोपेत बिछाना ओला करण्याची सवय आहे. याला वैद्यकीय भाषेत शय्यामूत्रता म्हणजे बेड वेटिंग म्हणतात.

वारंवार मूत्रप्रवृत्ती होते असे सर्व प्रकारचे आजार. याला अपवाद फक्त डायबिटीस.

मूत्राशयाच्या स्नायू व मुखाला बळकटी येण्यासाठी. यामुळे सतत लघवीला होत असेल तर त्यावर नियंत्रण येते.

या औषधाचा डोस किती प्रमाणात घ्यावा?

एका आवळ्याचा रस, एक केळं, एक चमचा खडीसाखर/ गूळ आणि मध एकत्र करून घेतलेला एक डोस.
याच प्रमाणात एका दिवसात चार वेळा हे औषध घेण्यास हरकत नाही.

औषध किती वेळ पर्यंत घ्यावे?

यातील सर्व घटक हे आपल्या रोजच्या आहारातीलच आहेत त्यामुळे हे औषध जास्त दिवस घेऊ शकता. नियमितपणे काही महिने हे घरगुती औषध सुरु ठेवता येते.

या औषधाला एक्सपायरी असते का?

हे औषध बनवून लगेच वापरणे सर्वात चांगले. आवळ्याचा रस जास्तीत जास्त एक दिवस साठवून ठेवू शकता. त्यामुळे बनवल्यानंतर ताबडतोब हे सेवन करणे फायदेशीर ठरते.

हे औषध कसे काम करते?

आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात ऍण्टिऑक्सिडंट्स आहेत.

मूत्राशयाच्या ठिकाणची अशुद्धी दूर करुन तिथले स्नायू मजबूत बनवण्यासाठी आवळा उपयुक्त आहे.

केळ्याचे गुणधर्म देखील यासारखेच असून ते आपल्या आहाराचा प्रमुख घटक आहे. अनेक मूत्रविकारांमधे केळे गुणकारी आहे.

हे औषध सुरक्षित आहे का?

लहान मुलांना हे औषध देण्यात कोणताही धोका नाही.

जर आवळा व मध उत्कृष्ट प्रतीचे असतील तर गर्भवती व स्तनपान देणाऱ्या माता सुद्धा हे औषध सेवन करु शकतात.

या औषधाचे काही साईड इफेक्ट्स आहेत का?

खूप जास्त प्रमाणात हे औषध घेऊ नये. तसेच डायबिटीस असलेल्या व्यक्तींनी हे औषध सेवन करु नये.

आवळ्याच्या रसाऐवजी आवळा पावडर वापरु शकतो का?

हो. ताजा आवळा सिझनमधे उपलब्ध असतो. पण त्यानंतर ताजा आवळा मिळत नसेल तर आवळा पावडर वापरली तरी चालेल. पावडर वापरायची असेल तर अर्धा चमचा एवढ्या प्रमाणात घ्यावी. पण ताजा आवळा वापरणे जास्त चांगले आहे. त्याचा उपयोग अधिक चांगल्या प्रकारे होतो.

तर असे आहे हे पारंपारिक, घरगुती औषध. झटपट तयार होणारे आणि कोणतेही साईड इफेक्ट्स सुद्धा नाहीत.

हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करुन सांगा.

लाईक व शेअर करून उपयुक्त माहिती सर्वांपर्यंत पोहोचवा.

असेच मनाचेTalks चे विविध लेख तुम्ही ऍमेझॉन किंडल वर जाहिरातींविना वाचू शकाल.

रहस्य जगण्याचे : समाधानी आयुष्याचे पुस्तक अमेझॉनवर खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

Manachetalks

लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।