लवकरच नवीन मेड इन इंडिया लस येणार आहे ‘ZYCOV-D’ तिची उपयुक्तता आणि आपल्यापर्यंत ती केव्हा पोहोचणार ते वाचा या लेखात.
सध्या करोना लसीकरणाचे महत्व सर्वांनाच लक्षात आले आहे. त्यामुळे सर्वत्र वेगाने लसीकरण सुरु करण्याची गरज असताना लसींचा मात्र तुटवडा होत आहे.
असे असताना भारतासाठी मात्र एक आनंदाची बातमी आहे.
काही दिवसांपूर्वी अनुपम मनाचेTalks च्या पेजवर, ‘शाळा सुरु व्हाव्यात का?’ याबद्दल पालकांचे मत जाणून घेतले होते. या प्रश्नाला १ हजार पेक्षा जास्त जणांनी वेगवेगळी उत्तरे दिली. त्यातल्या बऱ्याच जणांचे म्हणणे असे होते कि, मुलांना लवकरात लवकर लस दिली जाऊन शाळा सुरु झाल्या पाहिजे’
आणि सर्वांची हि इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे
संपूर्ण भारतीय बनावटीची दुसरी लस ZyCoV-D आता लवकरच आपल्यासाठी उपलब्ध होणार आहे. आणि महत्त्वाचे म्हणजे ती १२ वर्षावरील मुलासाठी सुद्धा वापरली जाणार आहे.
अहमदाबादच्या झायडस कॅडीला ह्या औषध निर्माण करणाऱ्या कंपनीने ZyCoV-D ही करोना व्हायरस विरुद्धची लस बनवली आहे. आणि या लसीला इमर्जन्सी वापरासाठी परवानगी सुद्धा मिळालेली आहे.
ह्याआधी कोवॅक्सिन ही लस भारतात बनवली गेली आहे.
तसेच भारतात मान्यता मिळालेल्या लसींपैकी ही चौथी लस आहे.
ह्याआधी भारतात कोविशिल्ड, कोवॅक्सिन आणि स्पुटनिक ह्या लसींना मान्यता मिळालेली आहे.
आज आपण जाणून घेऊया की ZyCoV-D ही लस कशा प्रकारे काम करते आणि इतर लसींपेक्षा कशा प्रकारे वेगळी आहे.
नक्की कशा प्रकारे काम करते ZyCoV-D लस?
कोविड १९ ची लस बनवताना ती ४ पैकी एक कॅटेगरीप्रमाणे बनवली जाते. त्या ४ कॅटेगरी आहेत…👇
1) व्हायरस
2) प्रोटीन सबयुनिट
3) व्हायरल व्हेक्टर
4) न्युक्लिक ऍसिड (डीएनए )
हयापैकी न्युक्लिक ऍसिड (डीएनए ) ह्या पद्धतीने ZyCoV-D ही लस बनवली जाते.
म्हणजेच ह्या लसीत विषाणूचे प्लास्मिडस् वापरले जातात जे आकाराने अत्यंत लहान असे डीएनए मॉलिक्यूल असतात.
हे प्लास्मिडस् डीएनए सिक्वेन्स मॅच करून आपल्या शरीरातील सेल वापरून अनेक अँटिबॉडीज तयार करू शकतात.
तसेच रोगाचे बदलणारे स्वरूप (mutation ) ओळखून त्याप्रमाणे बदल करून आवश्यक अँटिबॉडीज तयार करू शकतात.
तसेच ही लस तयार करण्यासाठी लागणारी सामग्री सहज उपलब्ध होणारी असल्यामुळे लसनिर्मिती मोठ्या प्रमाणात होऊ शकते.
शिवाय ही लस फार जास्त थंड तापमानात ठेवण्याची गरज नसल्यामुळे लसीचे वितरण भारतभर करणे सोपे होणार आहे.
सामान्य तापमानाला देखील ह्या लसीचा साठा करणे शक्य असल्यामुळे भारतातील दुरदूरच्या जागांपर्यंत ही लस पोचवणे शक्य होणार आहे.
कशी आहे ZyCoV-D इतर लसींपेक्षा वेगळी?
आधी बनवलेल्या लसी ह्या एकतर व्हायरस किंवा व्हायरल व्हेक्टर ह्या पद्धतीने बनवल्या गेल्या आहेत.
म्हणजेच त्या लसी देताना अगदी कमी प्रमाणात जिवंत अथवा मृत व्हायरस लसीच्या स्वरूपात शरीरात सोडले जातात.
त्यामुळे त्या व्हायरसशी मुकाबला करायला शरीरात अँटिबॉडीज तयार होतात. पण हया प्रकारात काही प्रमाणात साइड इफेक्टसचा धोका असतो.
तसेच लस घेतल्यावर ताप येणे, सर्दी खोकला होणे असे होऊ शकते.
त्यातुलनेत ZyCoV-D ही लस प्रत्यक्ष अँटिजेन नसलेली लस आहे.
ही लस आपल्याच शरीरातील सेल वापरून अँटिबॉडीज बनवते त्यामुळे ती तुलेनेने अधिक सुरक्षित आणि जलद काम करणारी आहे.
ह्या लसीचे कोणतेही साइड इफेक्टस् असल्याची नोंद झालेली नाही.
तसेच तयार होणाऱ्या अँटिबॉडीज ह्या वर्षभर शरीरात राहू शकतात. त्यामुळे ह्या लसीमुळे वर्षभर करोनापासून सुरक्षा मिळु शकते.
तर अशी ही संपूर्ण भारतीय बनावटीची लस ZyCoV-D. लवकरच सर्व लहान मुलांसहित पूर्ण भारतात लसीकरण पूर्ण होईल अशी आशा ठेऊ..
आणि हो लहान मुलांचे लसीकरण लवकरच सुरु व्हावे यासाठी कमेंट मध्ये तुमच्या शुभेच्छा लिहा.. आणि तुमचे लसीकरण झाले का तेही सांगा!!
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.