विसराळुपणा वाढलाय? आजच्या आज आहारात या व्हिटॅमिनचा समावेश करा

विसराळुपणा वाढलाय? आजच्या आज आहारात या व्हिटॅमिनचा समावेश करा, लगेच फरक जाणवेल

कामाच्या गडबडीत बऱ्याच वेळा आपण एखादी गोष्ट विसरून जातो. एखाद्या वेळेला असं होणं नॉर्मल आहे.

मात्र बऱ्याच वेळा, बऱ्याच गोष्टी तुम्ही विसरत असाल तर हा विसराळूपणा झाला.

आता याची लक्षणं जर तुम्हाला जाणवत असतील तर चेक करा की तुमच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन B 12 ची कमतरता आहे का?

व्हिटॅमिन B12 च्या कमतरतेमुळे काय नुकसान होतं आणि कशा पद्धतीने आपण ही कमतरता भरून काढू शकतो चला जाणून घेऊया.

आजच्या व्यस्त जीवनशैलीमध्ये आपल्या डोक्यात अनेक गोष्टी एकाच वेळेला चालू असतात.

पण त्यामुळं होतं काय की आपल्या डोक्यावर प्रचंड ओझं निर्माण होतं. या ओझ्याखाली दबून जाऊन आपण ब-याच महत्वाच्या गोष्टी विसरायला लागतो. यातल्या एका प्रकाराला वैद्यकीय भाषेत ‘मल्टिटास्किंग डिसऑर्डर’ असेही म्हणतात.

पण तुम्हाला माहिती आहे का की आहारामध्ये काही गोष्टींचा समावेश करून तुम्ही या विसराळूपणाला बाय-बाय म्हणू शकता.

विसराळूपणा कमी करण्यासाठी व्हिटॅमिन बी-12 चा आपल्या आहारात समावेश करा.

हे व्हिटॅमिन इतर व्हिटॅमिनप्रमाणेच आपल्या शरीराला आजारांपासून दूर ठेवण्यासाठी मदत करतं.

तज्ञांचं असं म्हणणं आहे की ज्यांना विसरण्याचा विकार जडला आहे त्यांच्यामध्ये व्हिटॅमिन B12 ची कमतरता असते.

तज्ञ सांगतात की एच. आय. व्ही. सारख्या काही आजारांमुळे सुध्दा तुमचं शरीर विटामिन बी -12 शोषून घेऊ शकत नाही.

व्हिटॅमिन B-12 हे शरीरामध्ये लाल रक्त पेशी तयार करण्यासाठी मदत करतं.

काही पदार्थातून ते नैसर्गिक रित्या ही आपल्या शरीराला मिळतं.

मात्र काही वेळेला सप्लीमेंट द्वारे याचा शरीराला पुरवठा करावा लागतो.

व्हिटॅमिन B – 12 चं शरीरातील प्रमाण कमी झालेलं आहे हे या लक्षणावरुन लगेच लक्षात येतं

1) वजन झपाट्यानं कमी होतं

2) स्नायूंमध्ये पेटके येतात किंवा स्नायू कमकुवत होतात.

3) भूक लागत नाही

4) जास्त ताण येतो.

5) लवकर थकवा जाणवतो

6) हृदयाचे ठोके वाढतात.

व्हिटॅमिन B – 12 ची आपल्या शरीराला गरज का असते?

व्हिटॅमिन B – 12 जर कमी असेल तर आपल्या शरीरातील मज्जासंस्थेवर खूप वाईट परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे व्यक्ती नैराश्याची शिकार ही होऊ शकते.

तसेच मानसिक ताण वाढल्यामुळे तुमच्या जीवनातल्या काही महत्त्वाच्या आघाडीवर तुम्ही मागं पडू शकता .

या विटामिनच्या कमतरतेमुळे तुमच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो.

हाडांचे दुखणे किंवा सांधेदुखी यामुळे ही व्हिटॅमिन B-12 ची कमतरता निर्माण होऊ शकते.

व्हिटॅमिन B -12 आपल्या शरीरामध्ये लाल रक्तपेशी तयार करायला मदत करतं, हे आपण पाहिलं आणि म्हणूनच त्याच्या कमतरतेमुळे ॲनिमियाचा धोका वाढतो हे लक्षात ठेवा.

व्हिटॅमिन B- 12 च्या कमतरतेला अशा पद्धतीने दूर करा.

व्हिटॅमिन B 12 च्या कमतरतेमुळे कोणती लक्षणे जाणवतात ते आपण बघितलं.

त्यापैकी एखादं लक्षण तुम्हांला जाणवत असेल तर आजच्या आज आहारामध्ये काही गोष्टींचा आवर्जून समावेश करा.

अंडी, सोयाबीन, दही ,मशरूम, पनीर, आणि मासे यांचा आहारात समावेश करून तुम्ही व्हिटॅमिन B 12 ची कमतरता दूर करू शकता.

विसरभोळेपणा आणि व्हिटॅमिन B-12 च्या कमतरतेमुळे जाणवणारी लक्षणं ओळखून मित्रांनो, जर तुम्ही वेळीच आहारात सोपे बदल केलेत तर पुढच्या गंभीर समस्यांना नक्कीच टाळू शकता.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

1 thought on “विसराळुपणा वाढलाय? आजच्या आज आहारात या व्हिटॅमिनचा समावेश करा”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।