नियमित योगसाधना केल्यामुळे मानसिक आरोग्य सुधारते. योगाभ्यास आणि मानसिक स्थिती यांचा जवळचा संबंध आहे.
काही आसने तर मनाचे स्वास्थ्य जपणारी आहेत. रोजच्या साधनेत जर या योगासनांचा समावेश केला तर नेहमीच शांत आणि प्रसन्न रहाणे शक्य आहे.
आपल्या दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणी, ताणतणाव यामुळे मनावर नक्कीच नकारात्मक प्रभाव पडतो. या समस्यांशी लढताना मनाची शक्ती कमी होत असते.
साधं मोबाईलचं उदाहरण पाहूया. सतत वापरल्याने मोबाईलच्या बॅटरी मधलं चार्जिंग कमी कमी होत जातं.
मग आपण पुन्हा बॅटरी चार्जिंगला लावतो. तसंच मनाचं चार्जिंग करण्यासाठी मेडिटेशन आणि काही योगासने उपयुक्त आहेत.
या लेखातून जाणून घेऊया अशीच मनाचे आरोग्य राखणारी काही योगासने.
१. उत्तानासन
या आसनामुळे खांदे, मान या भागातील ताण कमी होतो. नर्व्हस सिस्टिम अधिक कार्यक्षम होते.
तणाव कमी होतो व मेंदू शांत होतो. उत्तानासनात कमरेपासून वरचा भाग खाली वाकवला जातो त्यामुळे मेंदूला होणारा रक्तपुरवठा सुरळीत होतो.
पाठीचा कणा पूर्ण ताणला जातो त्यामुळे सर्व नर्व्हज कार्यक्षम होतात.
कृती
प्रथम ताडासनात उभे रहावे. दोन्ही हात कमरेवर ठेवावेत. खोलवर श्वास भरून घ्यावा. व श्वास सोडत हळूहळू कमरेतून पुढे झुकावे.
शरीराचा वरचा भाग व पाय यांचा काटकोन बनवावा.
हळूहळू अजून खालच्या दिशेने वाकत जाऊन दोन्ही हात जमिनीवर टेकवावे.
दोन्ही हात पायांच्या बाजूला स्थिर ठेवावेत.
जर हात जमिनीवर टेकणे शक्य नसेल तर आपल्याला जेवढे जमेल तेवढे खाली वाकावे.
उत्तानासन नियमितपणे केल्यास पोटऱ्यांचे स्नायू मजबूत होतात. तसेच शरीर लवचिक होते.
हे आसन करताना गुडघे वाकवू नयेत.
उत्तानासनाच्या अंतिम अवस्थेत कपाळ गुडघ्यांना टेकवणे तसेच हाताने घोट्याच्या सांध्यांना स्पर्श करणे शक्य होते. पण यासाठी भरपूर सराव करणे आवश्यक आहे.
उत्तानासनात सहजपणे शक्य होईल तेवढा वेळ रहावे.
पाठ, कंबर किंवा मांड्यांमध्ये वेदना जाणवत असतील तर आसन सोडावे.
हळूहळू श्वास घेत खालून वरच्या दिशेने यावे व पुन्हा सरळ उभे रहावे. दोन्ही हात कमरेवर ठेवावेत.
उत्तानासन हे पुढे झुकण्याचे आसन आहे. त्यामुळे हे आसन केल्यानंतर भुजंगासन किंवा धनुरासन यांसारख्या मागे झुकण्याच्या आसनांचा अभ्यास करून बॅलन्सिंग साधावे.
२. शवासन
संपूर्ण शरीर व मनाला रिलॅक्स करणारे हे आसन निगेटिव्ह एनर्जी काढून सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करते.
शव म्हणजे प्रेत. शरीराची जरासुद्धा हालचाल न करता शवासारखे विश्रांती अवस्थेत रहाणे म्हणजे शवासन.
कृती
जमिनीवर पाठ टेकवून झोपावे.
दोन्ही पायांमध्ये थोडे अंतर ठेवावे व पावले सैल सोडावीत.
दोन्ही तळहात आकाशाच्या दिशेने ठेवून हात शरीराच्या बाजूला सैल ठेवावेत.
डोळे शांतपणे मिटून शरीराचा एकेक अवयव जाणीवपूर्वक शिथील करावा. डोक्यापासून पायापर्यंत सर्व अवयव सैल सोडावे.
डोळे मिटून दीर्घ श्वास घ्यावेत व या अवस्थेत शरीर आणि मनाला विश्रांती द्यावी.
३. मकरासन
मूड सुधारणे व आत्मविश्वास निर्माण करणे हे मकरासनामुळे शक्य होते.
या आसनात शरीराचा वरचा भाग उचलला जातो त्यामुळे एनर्जी लेव्हल चांगली रहाते.
संस्कृत भाषेत मकर म्हणजे मगर. मगर जशी शांतपणे पाण्यात तरंगत असते त्याप्रमाणे शरीर मकरासनात शांत, स्थिर असते.
कृती
मकरासन करण्यासाठी योगा मॅटवर उताणे म्हणजे पोटावर झोपावे.
दोन्ही हातांची घडी घालून त्यावर डोके टेकवून ठेवावे.
असे करताना कपाळ मनगटांवर असले पाहिजे.
डोळे मिटून संपूर्ण शरीर सैल सोडावे.
शरीरात साचलेला स्ट्रेस कमी होत असल्याची भावना मनात जागृत ठेवावी.
दोन्ही पायांमध्ये थोडे अंतर ठेवावे व पायांच्या टाचा आतल्या बाजूला व पावले बाहेर अशा अवस्थेत शरीर रिलॅक्स करावे.
खोलवर श्वास घेऊन पोटाचा भाग जमिनीवर प्रेस करावा.
सहा ते आठ श्वास मकरासनात रहावे.
मकरासनातून बाहेर पडण्यासाठी प्रथम पाय जवळ आणावे तसेच हातही खांद्यांच्या जवळ आणावे. यानंतर बालासन करावे किंवा वळून पाठीवर झोपून शवासन करावे.
वरील तीनही आसने मानसिक शक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त आहेत.
शवासन करताना तर शरीराला एवढा हलकेपणा येतो की चक्क झोप येते. पण झोपून न जाता सजगपणे श्वासावर लक्ष केंद्रित करावे. आपल्या शरीरातील व मनातील ताणतणावांचे ओझे हलके होत आहे ही भावना ठेवून आसने करावीत.
म्हणजे अधिक लाभ मिळतो. योगाभ्यास सुरू करताना तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवात करावी.
हळूहळू शरीराचा लवचिकपणा वाढत जातो त्याचप्रमाणे मानसिक शांती, प्रसन्नता अनुभवता येते.
नियमित साधना करणारी व्यक्ती धैर्यवान, चांगली निर्णयक्षमता असणारी असते. सकारात्मक विचार करणारी असल्याने कठीण प्रसंगात डगमगून जात नाही.
योगाभ्यास करण्याचा अजून एक फायदा म्हणजे यासाठी जिमप्रमाणे कोणतीही उपकरणे लागत नाहीत.
जास्त पैसे खर्च करण्याची गरज नसते आणि आपल्या सोयीनुसार व क्षमतेनुसार अभ्यास करता येतो. फक्त सातत्य हा घटक अतिशय महत्त्वाचा आहे.
या लेखातील आसनांची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स करुन सांगा.
लेख आवडला तर लाईक व शेअर करा.
रहस्य जगण्याचे : समाधानी आयुष्याचे पुस्तक अमेझॉनवर खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.
रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.
रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे या पुस्तकाची अनुक्रमणिका खाली दिलेली आहे.
- अस्थिर मनाला शांत करणारी ही आहेत १५ जादूई वाक्यं!!!
- तणावाखाली असतानाही मानसिक ताकद टिकवून ठेवणाऱ्या पाच सवयी.
- निराशेतच दडलाय ध्येय गाठण्याचा मार्ग!!!
- अडचणीतून मार्ग काढून आयुष्य रुळावर कसं आणावं?
- मनातून विचारांचे वादळ काढून टाकून जगण्याची कला शिकवणारे आठ सोपे मार्ग.
- वाईट विचारांच्या भुताला कसे पळवून लावावे, यासाठीचे तीन नियम!!
- आयुष्यातील चार कटू सत्य, ‘जी’ स्वीकारली तर तुम्ही एक ‘कणखर व्यक्ती’ बनू शकाल
- हे तेरा प्रश्नं स्वतःला विचारून स्वतः मधले उत्तम व्हर्जन विकसित करा!
- तुम्ही भरभरून का जगू शकत नाही? जाणून घ्या कारणे.
- नीरस आयुष्य सप्तरंगी करण्याचे दहा उपाय.
- आपला अंतरात्मा काय सांगतो ते ऐका.. या पाच कारणांसाठी.
- आयुष्याचा आढावा घ्यायचाय? हे चोवीस प्रश्न स्वतः ला विचारा.
- स्वतःसाठी या दहा गोष्टी करायला कधीच घाबरु नका
- पॉझिटिव्ह एनर्जी साठी करा हे पाच उपाय!!!
- मनाशी दोस्ती करण्याचे ५ उपाय.
- स्वतः वर प्रेम करा, आयुष्य सुंदर भासेल!!!
- स्वप्नं वास्तवात आणण्यासाठी हे करा…!!!
- जीवन मूल्य म्हणजे काय? आणि ती जपायची कशी?
- समाधानी आयुष्याची त्रिसूत्री!!!
- एक मुक्तपत्र… तुमच्या मनाचे मैत्र!!!
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.