एका मनाचे गुढ…

दिवस खुप जड वाटत होता. काही केल्या सरत नव्हता. आकाशात बघून बघून केरबाचे डोळे थकले होते. सुर्य उगवून बरीच वर्षे झाली आहेत की काय असे वाटत होते. एक एक क्षण हा एका एका वर्षागत भासत होता. सकाळी उठल्यापासून तो स्वतःला विसरल्यागत वावरत होता.

आपल्या कामात नेहमी व्यस्त व मग्न असणारा केरबा तुसड्यासारखा वाटत होता. केरबा आंब्याच्या झाडाखाली झाडाच्या शेंड्याकडे बघत झोपला होता. डोक्याखाली दगडाची उशी होती. सुर्य झाडाच्या पाणातून डोळ्यावर तीरपत होता. डोळे गरगरत होते. डोळ्यांपुढे अंधारी येऊन झाड गरगर फिरल्यासारखे वाटत होते.

‘उभ्या आयुष्यात कधीही असे झाले नव्हते’, असे तो मनाशी पुटपुटला. कित्येक वेळा या झाडाखाली बसून राहिला व झोपला ही होता. असे कधी त्यास भासले नव्हते. तो एकदम चपापला, गांगरला व ताडकन उठून उभा राहिला.
थोडा वेळ विचार करत केरबा आंब्याच्या झाडाखाली ऊशी केलेल्या दगडावर तसाच बसून राहिला. तो भूतकाळ आठवून बघीतला एक एक क्षण उजळणी केली.

झाडाखाली असलेल्या बापाच्या समाधीच्या वठट्यावर जाऊन बसला. समाधीवर असलेला कचरा उपरण्याने झाडून घेतला. पक्षाची सीट काटकाने उकरून काढली. समाधीवर डोकं ठेउन नतमस्तक झाला. त्याचे डोळे भरून आले होते. बधीर अंतःकरणाने ऊठला. शेतीचा कोपरा न कोपरा फिरून बघितला. झाड न् झाड व फांदी न् फांदी तो डोळे भरून पाहून घेतली. पाणी टाकून वाढवलेली झाडं त्यावरील पशू पक्षी त्याच्या जीवनातले अविभाज्य अंग होते. अन् तो तडक घराकडे निघाला.

दोन ते तीन वर्षांत एकदा ही चांगलं पीक आलं नव्हतं. अंगावर कर्जाचे डोंगर वाढले होते. आयुष्यात आता पुढे खोलच खोल न भरणारी दरी. असं त्याला नेहमी वाटत असे. तो तसे घरी बोलून ही दाखवत असे.

मुलीच्या लग्नाचे स्थळ निश्चित झालेले. तिचं कन्यादान देणं. मुलाच्या शिक्षणाचे राहीलेले काही वर्षे व त्याची फि भरनं. हे अशक्य असलं तरी ते मला टाळता येत नाही असं त्यास वाटायचं. दोन्हीही काळजाचे तुकडे. त्यांचं भलं कोण करणार? मी त्यांचा विचार नाही केला तर पुरा जन्म माझा नाकर्तेपणा उगाळण्यात घालतील?

दुसर्‍याबाजूस माझ्या आजोबा पणजोबा पासून चालत आलेली परंपरागत शेती. ते ही माझं काळीज की? ज्यामध्ये माझ्या पिढ्यान् पिढ्याचा जीव अडकलेला. कायमचा त्यांचं सानिध्य त्या शेतात असलेलं? मी कसं त्यांना विसरावे? अशा अनेक विचारांची शिदोरी मनात कालवत व अडखळत, ठेचकाळत केरबा घरी येऊन पोहोचला.

पाय धुतले. बायको जवळ जाऊन बसला. एक तास बायको बरोबर चर्चा करून खिन्न मनाने बाहेर येऊन बसला.
दोन काळीज एक लेकरांच्या भल्यासाठी समर्थन करणारं. दुसरं काळीज जे पिढ्यानपिढ्याचा वारसा सांगणारे पूर्वजांच्या भावनांचं प्रतिक शेत एक काळजाचा तुकडा असं अस्तित्व जाणार! दोन्ही प्राणप्रिय एकिकडे रक्तमासाच्या गोळ्यांचे भले व दुसरी कडे पिढीजात चालत आलेले व पुर्वज वास्तव्याची काळी आई! अशा अनैक प्रश्न व प्रश्नाचा गलका केरबाच्या मनात थैमान घालत होता. विचार व वैचारिक वादळ काही थांबत नव्हते. तहान भुक विसरून तसाच तो दाराजवळ बसून होता.

आज पोरगं शिक्षणाच्या गावाहून येणार होतं. त्याच्यासाठी अधूनमधून तो रस्त्यावर दुर दूर नजर फिरवत होता. पोरगं आलेलं पाहून केरबा भानावर आला. ते दोघे घरात आले. जेवन वैगरे झाले. मुलगा, मुलगी व आई वडील एकत्र बसले.गप्पा टप्पा झाल्यावर केरबाने हळूच विषय काढला. मी उद्या सकाळी जो निर्णय घेणार आहे. त्यासाठी कुणास हु ना चु करू देता तो त्यांच वचन घेऊन गोठ्याकडे झोपण्यासाठी निघून गेला. ईकडे बायको व लेकरांच्या बोलण्याचा गलका मध्यरात्रीपर्यंत तसाच चालू होता. सकाळी तो लवकर उठला सर्व काम धंदा उरकून बैलांना वैरण पाणि घालून व अंघोळ न्याहरी करून बसला.

बैठकीसाठी येणाऱ्या गावातल्या लोकांची वाट बघत. बैठक झाली व त्या बैठकीत काळजाचा टुकडा असलेल्या शेताचा सौदा झाला. जाता जाता बैठकीतल्या लोकांनी प्रश्न केला की आता बैलाचं काय? खरंच बैलाचं काही काम नाही. त्या बैठकीत बैलाचा ही सौदा झाला. खऱ्या अर्थाने केरबा आता शेतमजूर झाला. शेत व बैल सौद्याचे अर्धे पैसे मिळाले. व सहा महिन्यात ऊरले पैसे देऊन विक्रीखत करण्याचे ठरले व करार पत्र बनवल्या गेले.
केरबाने सर्व सोपस्कार व कन्यादान यातील देणं व्यवस्थित आठोपले. धुम धडाक्यात मुलीचे लग्न पार पाडले. मुलीला निरोप देताना केरबाचं अंतःकरण भरून आलं. तो मुलीला म्हणाला, ‘तुझ्या व घरच्या भल्यासाठी एक काळजाचा टुकडा विकून टाकलाय, तुझा बाप आता पोरका झालाय. सासरंच सर्व सहन कर पण माहेराकडून कसलीच अपेक्षा ठेवू नकोस’.

सर्व आवराआवर करुन थकला होता. चार घास खाऊन रिकाम्या मंडपात तसाच झोपी गेला. ठरल्याप्रमाणे विक्रीखत केल्या गेले. जवळपास सर्वच पैसे केरबाकडे पोहचले होते. एवढी सुगी केरबान घ्यावी असं अगोदरच ठरलं होतं. मुलाच्या शिक्षणाचं जोतकी लावलं. दोन वर्षाचे फि व राहण्याखाण्याची व्यवस्था करुन ठेवली. तो मुलाला म्हणाला, ‘सोण्याचा तुकडा तुझ्यासाठी घहान ठेवला. तुझं कर्तव्य तु पार पाडावस ही माझी तळमळ व त्यातील त्याग तुला कळावा हीच माझी शेवटची इच्छा समज म्हणजे झाले. मी माझ्या कर्तव्यातून मुक्त झालो.’
बापदाद्यापासून चालत आलेला परंपरागत जमिनीचा तुकडा विकल्याची बोच मना कायमची घर करून बसली. तो या विचाराने खंगत चालला होता.

विचाराची जागा आता मानसिक विकाराने घेतली. सुगी संपली. जेमतेम खायापुरतं पिकल. बँकेचे कर्ज व पुर्वीचे हात ऊसनेकाही अधाप फिटले नाही. कर्जाचा डोंगर दुःखाची दरी घेऊन तसेच पुढे ऊभा. ईकडे आड व तिकडे विहीर अशा द्विधा मनस्थितीत तो विफल झाला.

मुलगा सुट्टी म्हणून गावाकडे आला होता. केरबाने त्यास काही हिताच्या गोष्टी सांगितल्या, “आता सर्वस्व तुझ जीवन तुला जगायचं आहे. शेत हातातून जाईल. तुझी आई व मला मजुरी करावी लागेल. तुझ्यासाठी मी पाहिलेलं शिक्षणाचे ध्येय सोडायचं नाही. मला माझा बा जरी बोलावला तरी माझ्या मरणाचं भांडवल करून त्यांचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नकोस. तसं झालं तर मी मेल्यावर ही मला सुख मिळणार नाही. व तुला काही अनुदान मिळेल ते काही जन्मभर पुरणार नाही. मी जन्म घेतला व तुमच्या रुपाने येवढा पसारा मी निर्माण केला. मी तो पेलू शकलो नाही याच खापर अनुदानासाठी कोणत्याही व्यवस्थेवर फोडू नकोस. तीथे तुझ्या बापाचा नाकर्तेपणा दिसेल. मी गेल्यावर मी विकलेल्या शेतात माझ्या आजोबाच्या शेजारी माझी समांधी बाध. शेती घेणारा तसं करु देत नसेल तर त्याच्या अपेक्षा पुर्ण कर. त्यासाठीच कर्ज घेतले तरी चालेल. दोघांच्याही डोळ्यातून असव वाहू लागली. मुलांच्या मनात शंकेची विज कडाडली. मनात चर् केल तो अतून भाजून निघाला.

दिवस ऊगवला केरबा सकाळी सकाळी शेतीकडे गेला. घराकडे आलाच नाही. शेत घेणार्‍यास सोडून देण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. तो आजोबाच्या समाधी शेजारी निपचीत पडला होता. न हलता न डुलता कायममचां व कायमच्या वास्तव्यासाठी आंब्याच्या झाडाखाली झाडाच्या शेंड्याकडे बघत झोपला…….. न ऊठण्यासाठी. कर्ज कोन्हीतरी फेडेल व माफ ही होईल. केरबा मात्र कर्जाच्या कचाट्यातून सुटला कायमचा…. कोणते विचार त्यास जीवनाच्या शेवटाकडे घेऊन गेले. त्याच्या मनाचे गुढ मला काही केल्या सुटत नाही.


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी किंवा तुमचे स्वतःचे लेखन मनाचेTalks वर प्रकाशित करण्याची इच्छा असल्यास येथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।