मी पाहीलीत पत्त्यांच्या बंगल्यासारखी
कोसळणारी अहंकारी माणसं
अगदी बालपणी वाचलेल्या
बेंडकोळीची गोष्ट खरी करणारी
निसर्गानं काहीच कमी केलं नव्हतं
सगळं काही होतं त्यांच्याजवळ
‘मी’पणानं घात केला होता
नि कोणीच नव्हतं त्यांच्याजवळ
आयुष्य सोन्यासारखं होतं नक्कीच
पण बोलणं नव्हतं सौजन्याचं
असमाधानाच्या आकाशात त्यांचं
उत्तरायुष्य विना चांदण्याचं
कोणीच नव्हतं तेव्हा बोलायला
कधी ते नव्हते तयार ऐकायला
त्यांना लोकांची माया नव्हती
लोकांना त्यांची दया नव्हती
पदासोबत गेली होती प्रतिष्ठा
कोणालाच नव्हती त्यांची निष्ठा
पैसा होता लय बक्कळ अमाप
पण रितं होतं त्यांचं खरं माप
‘मी’पणाचा नाद सोडा
माणसाला माणूस जोडा
दिव्याने दिवा लावा
लोकांना माणसासारखं वागवा
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी किंवा तुमचे स्वतःचे लेखन मनाचेTalks वर प्रकाशित करण्याची इच्छा असल्यास येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
सरजी खुपच सुंदर कविता..! खरोखरच प्रत्येकाने ‘मी’पणा सोडला तर जगण्याचा ‘आनंद’ घेता येईल व देताही येईल..! आपुलकी वाढेल, जग अधिक जवळ येईल.!