कविता: बाप

बाप तुझ्या जाण्याचं

फारसं मला खुपत नाही

पण पांढरं सारं कपाळ तिचं

मनी माझ्या खुपत राही

बाप विना पोर मी

याचं फार दु:ख नाही

न पाहिलेलं कुंकू तिचं

मनी माझ्या सलत राही

बाप तुझ्या जाण्यानं

कपाळ तिचं पांढरं होणं

अन्  माझं अनाथ होणं

सगळं व्यर्थ उरलं जगणं

बाप तुझ्या वाटेवरती

येण्याची खूप इच्छा आहे

पण एका अनाथ मुलाचं हे

दु:ख तिला देणं नको आहे

बाप तुझी भूमिका

आजही ती रंगवत आहे

व्यर्थ साऱ्या जगण्याला

अर्थ थोडा देत आहे

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी किंवा तुमचे स्वतःचे लेखन मनाचेTalks वर प्रकाशित करण्याची इच्छा असल्यास येथे क्लिक करून व्हाट्स ऍप ग्रुप वर जॉईन व्हा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

30 Days Challenge For Financial Independence – दिवस पहिला मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।