मित्रांनो, भगवान बुद्धांनी त्यांच्या अनुयायांना जीवनाचे सार सांगितले. पण त्यांची शिकवण नेहमीच गोष्टींच्या आधारे असायची. या कथा अगदी छोट्या, सुटसुटीत आहेत पण गूढ अर्थ यात भरलेला आहे.
जर का या गोष्टींमधून दिलेला संदेश आपण समजून घेतला आणि आचरणात आणला तर जीवनात आमूलाग्र परिवर्तन होईल.
शेवटी अध्यात्म म्हणजे तरी काय?
सत्याचा शोध घेणे. या कथा आपल्याला जीवनातील सत्य उलगडून दाखवतात.
पाहूया अशीच एक सुंदर बोधकथा.
एका गावात एक जोडपे रहात होते. एके दिवशी पती काही कामानिमित्त बाहेर गेला होता.
पत्नी घरातच काम करत होती. तिने पाहिले की घराच्या अंगणात तीन साधू उभे आहेत. ते तिघेही अगदी तेजस्वी दिसत होते.
त्यांनी शुभ्र वस्त्रे परिधान केली होती. ती लगबगीने बाहेर आली. साधूंना मनोभावे नमस्कार केला. आणि त्यांच्या येण्याचे प्रयोजन विचारले.
साधूंनी तिला सांगितले की त्यांना भोजन करायचे आहे. त्यावर तिने तिन्ही साधूंना आपल्या घरात येण्याचे निमंत्रण दिले.
पण साधूंनी अंगणातच उभे राहून तिला तिचा पती कुठे आहे असे विचारले.
तिने आपला पती कामानिमित्त बाहेर गेला असून थोड्याच वेळात तो परत येणार असल्याचे सांगितले.
परंतु साधू म्हणाले की जर तो घरात नसेल तर आम्ही आतमध्ये येऊ शकत नाही. असे म्हणून तिचा निरोप घेऊन ते पुढे निघाले.
थोड्याच वेळात तिचा पती घरी आला. लगेच तिने त्याला साधुंविषयी माहिती दिली.
ते ऐकून तो म्हणाला की ते फार दूर गेले नसतील. तू लगेच जाऊन त्यांना भोजनाकरिता आपल्या घरी घेऊन ये.
ती घाईघाईने निघाली. थोड्या अंतरावर एका वटवृक्षाच्या सावलीत ते तिघेही बसलेले तिने पाहिले.
ती त्यांच्यासमोर जाऊन उभी राहिली. त्यांना नमस्कार केला.
व आपला पती घरी परत आला असून आपण कृपया आता भोजनासाठी चलावे अशी साधूंना विनवणी केली.
तेव्हा ते साधू तिला म्हणाले की आम्ही तिघेही एकत्रितपणे कोणत्याही घरात जात नाही.
तिला या गोष्टीचे आश्चर्य वाटले. तिने त्यांना याचे कारण विचारले.
त्या तिघांपैकी मधला साधू म्हणाला की माझ्या उजव्या बाजूला असलेले साधू म्हणजे धन आणि डाव्या बाजूला असलेले साधू महाराज म्हणजे यश!!!!
आणि माझे नाव आहे प्रेम !!!
आमच्यापैकी कोणीतरी एकच एकावेळी तुमच्या घरी येईल.
ती स्त्री गोंधळून गेली. तेव्हा साधू तिला म्हणाले की तू घरी जाऊन पतीला हे सर्व सांग.
आमच्यापैकी कोणाला घरी आमंत्रण द्यायचे याची तुम्ही चर्चा करा.
आणि त्याप्रमाणे आम्हाला येऊन सांग. तोवर आम्ही याच झाडाखाली विश्रांती घेतो.
ती घरी गेली. घडलेला सर्व वृत्तांत पतीला सांगितला.
तो म्हणाला की आपण धन महाराजांना बोलावू. एकदा का संपत्ती मिळाली की कसलाही त्रास आपल्याला होऊच शकत नाही.
पण पत्नीचे मत मात्र वेगळे होते. ती म्हणाली की आपण यश महाराजांना आमंत्रित केले तर आपली कीर्ती सर्वत्र पसरेल.
आणि यश मिळाले की आपोआपच आपण श्रीमंत होऊ. लोक आपल्याला मान देतील.
त्यांनी एकमेकांशी बरीच चर्चा केली. पण त्यांचे काही एकमत होईना.
यात बराच वेळ निघून गेला. शेवटी त्यांनी असे ठरवले की धन आणि यश या दोघांना आपण असे सांगूया की त्यांच्यापैकी ज्या कोणाला आपल्या घरी यायचे आहे त्यांनी यावे.
हा निरोप घेऊन पत्नी साधूंकडे गेली. जेव्हा तिने त्यांना ठरल्याप्रमाणे सांगितले तेव्हा साधूंनी फक्त एकमेकांकडे पाहिले आणि ते तिथून निघून जाऊ लागले.
तिने त्यांना अडवले. व ते निघून का जात आहेत हे विचारले.
तेव्हा साधू म्हणाले की आम्ही तिघेही असेच घरोघरी जाऊन लोकांची परीक्षा घेत असतो.
आम्ही खरंच त्यांच्या घरात प्रवेश करण्यासाठी उत्सुक असतो. पण जे लोक स्वार्थीपणे धन आणि यश यांची इच्छा धरतात त्यांच्या घरात न जाता आम्ही मागे फिरतो.
मात्र जे मनापासून प्रेमाला आपल्या घरात स्थान देऊ इच्छितात त्यांच्या घरात आम्ही तिघेही आळीपाळीने जातो.
म्हणूनच एक गोष्ट लक्षात ठेव की जिथे प्रेम असते त्याठिकाणी धन व यश असतातच.
सारांश
मित्रांनो, या गोष्टीचा अर्थ तुम्हाला समजला का?
संपत्ती आणि सफलता या गोष्टी येतात आणि जातात. पण जर का तुम्ही निरपेक्ष भावनेने प्रेम केले तर मात्र तुमच्या आयुष्यात शांती, समाधान, सुख सर्वकाही असेल.
आजकालच्या आधुनिक काळात या गोष्टीचा अर्थ नीट समजून घ्यायची गरज आहे.
पूर्वी कमी पैशात, लहान घरात, एकत्र कुटुंबात माणसे गुण्यागोविंदाने नांदत होती.
पण आता मात्र न्यूक्लीअर फॅमिलीचा जमाना आहे. घरात माणसे कमी आणि प्रशस्त मोठी घरे!!!
मानमरातब, धन यांची कमी नाही पण आयुष्यात एकटेपणाची भावना वाढत चाललीय.
याचं कारण म्हणजे पैसा आणि यश यांच्यामागे लागल्याने एकमेकांमधला स्नेहभाव कमी होत चालला आहे.
घरात प्रत्येकाचा स्वतंत्र विचार. कारण एका बंधनात सर्व कुटुंबाला बांधून ठेवणारा प्रेमभाव कमी झालाय. म्हणूनच घरं मोठी झाली आणि मनं मात्र संकुचित झाली!!!
जर आपण प्रेम, स्नेह, आपुलकी यांना महत्त्व दिले तर मनं एकत्र येतात. आणि मग साहजिकच एकमेकांच्या आधाराने यश व पैसा मिळवणे सोपे जाते.
खरंतर पैसा आणि सफलता किती मिळवावी याला काही प्रमाण नाही.
ते आपल्या मानण्यावर अवलंबून आहे. एखादा माणूस कमी पैशात व लहान घरातही समाधानी रहातो कारण त्याची प्रेमाची माणसे सोबतीला असतात.
याउलट राजमहालात राहूनही एखादी व्यक्ती एकाकी असते कारण आयुष्यात प्रेम करणारं कुणीच नसतं.
म्हणून कोणत्या गोष्टीला किती महत्त्वं द्यायचं हे आपणच ठरवायचं. शेवटी निवड करण्याचं स्वातंत्र्य आपल्याच हातात असतं!!!
कशी वाटली ही गोष्ट? आवडली असेल तर लाईक व शेअर करा.
धन, मान-मरातब आणि प्रेम मिळवण्याबद्दल तुमचं मत तुमचं मत वेगळं असेल तर कमेंट करून सांगायला विसरू नका.
रहस्य जगण्याचे : समाधानी आयुष्याचे पुस्तक अमेझॉनवर खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.
रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.
रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे या पुस्तकाची अनुक्रमणिका खाली दिलेली आहे.
- अस्थिर मनाला शांत करणारी ही आहेत १५ जादूई वाक्यं!!!
- तणावाखाली असतानाही मानसिक ताकद टिकवून ठेवणाऱ्या पाच सवयी.
- निराशेतच दडलाय ध्येय गाठण्याचा मार्ग!!!
- अडचणीतून मार्ग काढून आयुष्य रुळावर कसं आणावं?
- मनातून विचारांचे वादळ काढून टाकून जगण्याची कला शिकवणारे आठ सोपे मार्ग.
- वाईट विचारांच्या भुताला कसे पळवून लावावे, यासाठीचे तीन नियम!!
- आयुष्यातील चार कटू सत्य, ‘जी’ स्वीकारली तर तुम्ही एक ‘कणखर व्यक्ती’ बनू शकाल
- हे तेरा प्रश्नं स्वतःला विचारून स्वतः मधले उत्तम व्हर्जन विकसित करा!
- तुम्ही भरभरून का जगू शकत नाही? जाणून घ्या कारणे.
- नीरस आयुष्य सप्तरंगी करण्याचे दहा उपाय.
- आपला अंतरात्मा काय सांगतो ते ऐका.. या पाच कारणांसाठी.
- आयुष्याचा आढावा घ्यायचाय? हे चोवीस प्रश्न स्वतः ला विचारा.
- स्वतःसाठी या दहा गोष्टी करायला कधीच घाबरु नका
- पॉझिटिव्ह एनर्जी साठी करा हे पाच उपाय!!!
- मनाशी दोस्ती करण्याचे ५ उपाय.
- स्वतः वर प्रेम करा, आयुष्य सुंदर भासेल!!!
- स्वप्नं वास्तवात आणण्यासाठी हे करा…!!!
- जीवन मूल्य म्हणजे काय? आणि ती जपायची कशी?
- समाधानी आयुष्याची त्रिसूत्री!!!
- एक मुक्तपत्र… तुमच्या मनाचे मैत्र!!!
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.