ससा, हत्ती आणि मेजवानी!

एका जंगलामध्ये एक ससा रहात होता, त्याच्या आजुबाजुचे सगळे प्राणी येताना जाताना त्याला त्रास देत असत, भित्र्या सशाला अजुनच जास्त घाबरवत असत, ससा बिचारा खुप खुप परेशान झाला होता, सगळेजण त्याची चेष्टा उडवायचे, टर उडवायचे, टपल्या मारायचे.

Sasa Hatti Aani Mejvani

असचं ससा एका झाडाखाली उदास बसला होता, तेव्हा रस्त्यावरुन जाणार्‍या हत्तीने त्याला पाहिले, त्याने सशाला दुःखी होण्याचे कारण विचारले, तेव्हा हत्तीला त्याची दया आली, आणि चक्क हत्तीने सशाशी, त्यादिवशी मैत्री केली, त्याने सशाला आपल्या पाठीवर बसवुन जंगलाची फेरी घडवुन आणली, बाकीचे सगळे प्राणी त्या दोघांकडे, थक्क होवुन बघतच राहीले.

आता सशाच्या वाटेला कोणी चुकुनही जाईनासे झाले, तो सगळीकडे मुक्त संचार करु लागला, आनंदाने बागडु लागला, हत्तीचा मित्र असल्याने त्याची ‘वट’ वाढली. टेंशन फ्री झाल्याने, तो दिवसेंदिवस मस्त गुटगुटीत आणि टुणटुणीत दिसु लागला. आपला नवरा आजकाल खुप आनंदात असतो, हे सशाच्या चलाख बायकोच्या नजरेतुन सुटले नाही.

एके दिवशी तिने सशाला त्याच्या आनंदाचे कारण विचारले, “जंगलाचा गजराज असलेल्या महाकाय आणि गलेलठ्ठ हत्तीने माझ्याशी मैत्री केली आहे, आता मला कोणाचीच कसलीच भिती वाटत नाही”, सशाने आपल्या आनंदाचे रहस्य, आपल्या लाडक्या पत्नीला सांगितले.

ते ऐकुन तिचाही आनंद गगनात मावेनासा झाला, “ऐका ना, आपण हत्तीदादाला आपल्या घरी जेवायला बोलवुया ना!” सशालाही ही कल्पना आवडली, पण त्यासाठी जय्यत तयारी करावी लागणार होती,

तो उड्या मारत हत्तीकडे पोहोचला, उत्साहाच्या भरात त्याने हत्तीला आमंत्रण दिले, “हत्तीदादा, हत्तीदादा, अजुन एक महिन्याने तु आमच्या घरी जेवायला यायचे हं!”

हत्तीने गालातल्या गालात, हसत, मान डोलावुन, आमंत्रणाचा स्वीकार केला.

Sasa Hatti Aani Mejvaniससा आणि त्याची पत्नी कामाला लागले, रोज सकाळी लवकर उठायचे, चिमुकल्या हातांनी हत्तीला बसण्यासाठी जमीन साफ करायचे, त्याला खाण्यासाठी दिवसभर, न थकता, चवदार गवत जमा करायचे, हत्तीला पिण्यासाठी पाणी साठवायचे.

महिनाभर ससा आपल्या मित्रासाठी जेवणाची व्यवस्था करण्यात बिझी होता, आपला जिवलग मित्र आपल्याला आजकाल भेटत नाही म्हणुन हत्तीला सुद्धा करमत नव्हते, आणि शेवटी एकदाचा मेजवानीचा दिवस उजाडला.

प्राण कंठाशी आणुन, ससा आणि त्याची पत्नी, घराबाहेर येवुन, हत्तीची वाट बघु लागले, डूलत डुलत रुबाबात हत्ती त्यांच्या घरी येताना त्यांना दिसला. त्यांनी झाडुन साफ केलेल्या अंगणात बसला. सशाने त्याचे स्वागत केले.

आणि एक महिना मेहनत करुन जमवलेले पाणी आणि गवत त्याच्यासमोर ठेवले. पाणी पिण्यासाठी, भांड्याला हत्तीने आपली सोंड लावली आणि अर्ध्या-एक घोटातच पाणी संपले.

मग हत्तीने गवतावर ताव मारायला सुरुवात केली पण त्याचा एक घासही पुर्ण झाला नाही तोवर सगळे गवतही संपुन गेले,

सशाने चिमुकल्या हातांनी कितीही प्रचंड काम केले, तरी त्याने हत्तीची भुक भागेल एवढे अन्न-पाणी कसे जमा होईल, बरे!?

आपण आपल्या मित्राला पुरेसे जेवण देऊ शकलो नाही म्हणुन ससा आणि त्याची पत्नी दोघेही रडु लागले, “आम्हाला माफ कर, हत्तीदादा! आम्ही तुला पोटभर खाऊ नाही घालो शकलो.” त्या दोघांचे डोळे भरुन आले आणि तरीही डोळ्यातुन धारा वाहतच होत्या.

Sasa Hatti Aani Mejvaniआपल्या मित्राचे आपल्यावरील प्रेम पाहुन हत्तीही भारावुन गेला. त्याच्याही डोळ्यात पाणी आले. त्याने मुद्दाम जोराने एक ढेकर दिला, आणि तो सशाला म्हणाला,

“अरे वेड्या, रडु नको,” “दोस्त, खरं सांगतो, आयुष्यात पहिल्यांदाच, मी आज हे जेवण जेऊन, इतका तृप्त झालो आहे.”

“कारण याआधी इतक्या प्रेमाने मला कोणीही खाऊ घातले नव्हते.”

मग हत्तीने त्या दोघांना आपल्या सोंडेने उचलुन अलगद आपल्या डोक्यावर बसवले, आणि रुबाबात जंगलाचा फेरफटका मारायला निघाला. जग मात्र त्यांच्या अनोख्या मैत्रीकडे थक्क होवुन बघतच राहीले.

गोष्ट संपली,

धन्यवाद!….


मित्रांनो, ससा हे भितीचं प्रतिक आणि हत्ती म्हणजे अजस्त्र शक्ती!

ही गोष्ट आपल्याही आयुष्यात घडते.

ससा हे आपलं कमजोर, डरपोक, भित्रं मन आणि हत्ती म्हणजे शक्तिशाली अंतर्मन!

कोणी त्याला ‘देव’ म्हणतात, कोणी त्याला ‘शुद्ध चैतन्य’ असं नाव दिलयं!

“ते कुठेच नाही आणि तरीही ते सगळीकडे व्यापलेलं आहे”, असं म्हणे!

पण काहीही असलं तरी ती जगातली सर्वात शक्तिशाली गोष्ट आहे, हे नक्की!

त्याच्याशी संवाद साधल्यास मोठीमोठी अशक्य कामे, भव्यदिव्य स्वप्ने, सहज शक्य होतात.

आपली आपल्या अंतर्मनाशी मैत्री झाल्यास जगातली कोणतीही ताकत, कसलाच विचार आपल्याला छळु शकत नाही.

चला, एक महिना परिश्रम करुन आपल्या अंतर्मनाला, स्वप्नांच्या मेजवानीला बोलवुया.

आपल्या चिमुकल्या हातांनी हत्तीसाठी मेजवानीचा बेत आखुया! ….. महिनाभर कितीही परिश्रम केले तरी त्याचे पोट भरणार नाहीच….

पण आपल्या प्रामाणिक प्रयत्नांनी त्याचं मन जिंकुन घेऊ, हे मात्र नक्की!……

तुमच्या आत लपलेली स्वप्ने आणि आयुष्याचा खरा अर्थ शोधण्यासाठी आजपासुन सुरु होणारा माझा एक महिन्याचा व्हॉटसएप कोर्स नक्की जॉईन करा.

  • तीस दिवस, तीस नवे लेख!
  • मनमोकळा संवाद!
  • सहभागी झालेल्या, प्रत्येकाच्या अडचणींवर स्वतंत्र लेख लिहुन मार्गदर्शन!
  • निखळ मैत्री!
  • खळखळुन हसवणारे किस्से आणि जोक्स!
  • शेवटचे काही दिवस अडीचशे लोकांच्या पब्लिक व्हॉट्सएप ग्रुपमध्ये सहभाग!
  • पंकज कोटलवारच्या आवाजात रेकॉर्ड केलेल्या कविता, गाणी आणि गंमतीजंमती!
  • फीस – तीनशे रुपये.
  • पती-पत्नी दोघांमध्ये एकच रजिस्ट्रेशन चालेल.

कोर्ससाठी अभिप्रायातून सम्पर्क साधावा…

मनःपुर्वक आभार!..धन्यवाद!….


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।