मानसिक स्वास्थाचे आश्चर्यकारक फायदे आहेत. तुमच्या मनाशी आणि स्वतःशी बोलण्याच्या पद्धतीची काळजी घ्या.
नकारात्मक बोलण्यामुळं स्वतः ला कमकुवत होऊ देऊ नका.
आयुष्य दर दिवशी नवं असतं. त्याबरोबर तुम्हीही बदलू शकता. चांगले बदल घडवू शकता.
हे जरी खरं असलं तरी बरेच जण आपल्या इच्छेविरुद्ध निराशेच्या गर्तेत अडकतात.
का? कारण तुम्ही शोधत असलेले बदल अनिश्चितता निर्माण करतात आणि जेव्हा काही गोष्टींच्या बाबतीत तुमच्या मनात अनिश्चितता असते तेंव्हा आयुष्यात पुढं जाणं कठीण होऊ शकतं.
अशावेळी एखाद्या सुपर हिरोची कल्पना करून तुम्ही स्वतःला प्रेरणा देण्याचा प्रयत्न करता.
पण अशा काल्पनिक गोष्टी फार काळ काम करत नाहीत.
आता एक सांगा तुम्ही तुमच्या जीवनात कोणता सकारात्मक बदल घडवून आणण्याचा कधी प्रयत्न केला आहे,? जिद्दीने संघर्ष केला आहे?
खरं सांगू नेमकं घडतं काय? तर तुमच्या अपेक्षेप्रमाणे तुमची प्रगती होत नाही हे लक्षात आलं की तुम्ही कल्पनेत रमता.
पण त्याचा चांगला परिमाण होण्याऐवजी तुम्ही खचत जाता.
बाकीच्या सगळ्यांचं आयुष्य सुरळीत आहे आणि तुमच्याच आयुष्यात अडथळे आहेत असं तुम्हांला वाटायला लागतं.
मग तुम्ही विचार करता
“मी चांगली व्यक्ती नाही…”
“मी नापास झालो तर…”
“मी फक्त माझा वेळ वाया घालवत आहे…”
“आयुष्यात काही फरकच पडत नाही…”
“आजच्या ऐवजी मी उद्या काम करेन …”
असं आणि बरच काही, तुम्ही स्वतः ला सांगायला लागता. जे तुमच्या अंतर्मनात नकारात्मकतेची मुळं घट्ट रुजवत जातं.
मित्रांनो, खरंच तुम्ही असा विचार करायला लागला असाल, तर तुमचे विचार लवकरात लवकर बदला.
सकारात्मक गोष्टी तुमच्या मनाला सातत्यानं सांगा.
सकारात्मक, जाणीवपूर्वक केलेल्या सूचनाच तुमच्या आयुष्यात बदल घडवू शकतात.
आता ही एक छोटीशी गोष्ट करा…👇
👆 … म्हणजे कमेंट्स मध्ये सकारात्मक शब्द लिहा.
सकारात्मकता जाणीवपूर्वक आपल्या अंतर्मनात रुजविण्यासाठी ‘या’ १० गोष्टी लक्षात ठेवा.
१) स्वत:ला विद्यार्थी माना. कुणीही व्यक्ती जन्मापासून ज्ञानी नसते.
अनुभव घेत घेत परीपक्व होणारी व्यक्तीच यशस्वी होते.
त्यामुळे समोर आलेल्या कामातलं मला सगळं कळत असा दृष्टिकोन न ठेवता मी आणखी चांगलं, परफेक्ट करायला शिकेन असा विचार करा.
२) कुठल्याही ध्येयासाठी जीव तोडून पळणं थांबवा.
श्वास घ्या. तुम्ही जिथं आहात तिथला अनुभव घ्या.
तुम्ही या क्षणी जिथं असायला हवे होते तिथेच आहात. पुढचं प्रत्येक पाऊल आणि अनुभव गरजेचा आहे.
३) तुमच्या आयुष्यात आलेल्या निराशेचा वापर प्रेरणा म्हणून करा. सजग रहा.
तुमच्या जीवनातल्या घडणाऱ्या गोष्टींना कशाप्रकारे प्रतिसाद द्यायचा, त्यावर तुमचं नियंत्रण असतं, हे लक्षात ठेवा.
४) तुम्ही ज्या परिस्थितीत आहात त्याला तुम्ही कारणीभूत नाही.
त्यामुळे निराशा किंवा भीतीला तुमचं भविष्य ठरवू देऊ नका.
५) तुमच्या प्रगतीची इतरांशी तुलना करू नका.
तुम्ही आता जे पाऊल उचलणार आहात त्यावर लक्ष केंद्रित करा आणि ते काम सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न करा. इतरांशी तुलना करू नका.
६) प्रयत्न करत राहा. संयम ठेवा.
आजकाल प्रत्येक गोष्टीत झटपट परिणाम हवे असतात.
तुम्ही मात्र प्रयत्न, संयम आणि चिकाटी या गुणांचा अवलंब केला पाहिजे.
७) संयम हा आत्मविश्वास, स्वीकृती, शांतता आणि तुमच्या स्वतःच्या क्षमतेवरील विश्वासाची खरी अभिव्यक्ती आहे.
ते सामर्थ्याचे लक्षण आहे. संयम राखण्याचा सराव करा.
८) अडथळ्यांना घाबरू नका
तुम्हाला जीवनातील येणाऱ्या अडथळ्यांशी सामना करावा लागतोय ना?
लक्षात ठेवा काहीही न करून कंटाळा येण्यापेक्षा खूप प्रयत्न करताना आणि शिकताना थकून जाणं हे खूप चांगलं आहे.
९) तुमचा संघर्ष तुमच्या उत्तम आयुष्यासाठी महत्त्वाचा भाग आहे.
तुम्हाला हवी असलेली एखादी गोष्ट नाकारली जाण्याचा अर्थ असा होतो की तुम्हाला हवी असलेली गोष्ट तुम्हांला मिळणार आहे.
१०) बदलांना सामोरं जाण्याचं धाडस ठेवा
जसं एकाचं पात्राची कथा म्हणजे कादंबरी नव्हे, त्या कादंबरीत वेगवेगळे भाग असतात, वेगवेगळी पात्र असतात , वाईटातून चांगलं घडत असतं.
त्याप्रमाणे तुमच्या आयुष्यात वेगवेगळे अध्याय घडत असतात.
चांगले बदल घडण्याची शक्यता ही असतेच.
त्यामुळं पुढं पुढं जात रहा. आयुष्यातले मोठे बदल हळूहळू, छोट्या छोट्या टप्प्यात होतात.
मित्रांनो, जेंव्हा तुमच्या जीवनात महत्त्वपूर्ण बदल घडवून आणण्याची वेळ येते जसं की नवी नोकरी, नवा व्यवसाय, नवे नातेसंबंध, किंवा इतर कोणतीही वैयक्तिक प्रगती ज्याला वेळ लागतो.
अशा वेळी संयम ठेवा. जाणीवपूर्वक चांगला विचार करा.
हे बदल घडवणं किंवा पचवणं सोपं नसेल. तुम्हाला संघर्ष करावा लागेल.
पण या लेखात सांगितलेले दहा विचार आत्मसात केले तर, तुमच्या आयुष्यात घडणारे बदल येणाऱ्या अडचणी तुम्हाला कठीण वाटणार नाहीत.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.