खुप वर्षांपुर्वी मी रॉबर्ट शुलर ह्या अमेरीकेतल्या माणसाचं आत्मचरित्र वाचलं होतं. त्यांच्या लहानपणीची एक खुप इंट्रेस्टींग आणि ह्रदयस्पर्शी कहाणी आहे.
रॉबर्ट एक मेंढपाळ आणि शेतकर्याचा मुलगा होता…..
रॉबर्ट लहानपणी आपल्या शेतकरी वडीलांबरोबर रहायचे, त्यांची मक्याच्या कणसाची शेती होती, ते गरीब, पण खाऊन पिऊन सुखी वर्गात मोडणारं धार्मिक कुटुंब होतं, शेतामध्येच अत्यंत कष्टाने, काटकसरीने बनवलेलं त्यांचं छोटसं टुमदार, घर होतं.
त्यांचे वडील अशिक्षित होते, पण बायबल मधली वचनं त्यांना मुखोद्गध होती. पण जेवणाच्या टेबलवर प्रार्थना केल्याशिवाय घास घ्यायचा नाही, अशी घराची रीत, सगळे आनंदाने पाळत.
शेतातुन जेमतेम उत्पन्न मिळायचं, ते शहरात विकुन जे पैसे मिळत, त्यावर उदरनिर्वाह चालु असायचा, देवाचे आभार मानायचे, जे मिळेल त्यात आनंद मानायचा, असंच त्या खेड्यातल्या सगळ्यांचं जीवन होतं.
पण म्हणतात ना, सगळे दिवस सारखे नसतात, एकदा सगळ्या उत्तर अमेरीकेत दुष्काळ पडला, दोन तीन वर्ष पाऊसच पडेना, खाण्यापुरतंही शेतात पिकत नव्हतं, सगळे शेतकरी हैराण परेशान झाले होते.
रॉबर्टचे वडील साठ वर्षांचे होते, उंच, शिडशिडीत, शेतामध्ये राबणारे आणि कमी बोलणारे असं त्यांचं व्यक्तीमत्व होतं,
पावसाअभावी जगण्यामरण्याचा प्रश्न निर्माण झाला होता, अनेक लोक स्थलांतर करत होते, तेव्हा त्या दुष्काळाच्या भीषण संकटाची, लोक, दिवसभर, एकत्र येऊन, जमावाने चर्चा करत असतं, असा भीषण दुष्काळ शेकडो वर्षात पडला नाही, वगैरे, वगैरे,
रॉबर्टचे वडील कधीही त्या चर्चेत सामील झाले नाहीत, त्यांच्या शेतात एक दलदल असलेला, नापीक, जमिनीचा तुकडा होता, दुष्काळात तिथली ओल कमी झाली होती, पण कायम होती, त्यांनी तात्काळ गुडघ्यावर बसुन देवाचे आभार मानले, “माझं कुटुंबीय जगावं म्हणुन तु मार्ग खुला ठेवला आहेस”, “तु खरोखर दयाळु आहेस!”
त्यांनी त्या अर्ध्या एकरात जोमाने मक्याची पेरणी केली. सगळं गाव अचंब्यात पडलं, हा माणुस किती धीराचा आहे…..
अजुन परीक्षा पुढेच होणार होती, अखेर एक काळरात्र आली, त्या रात्री दुपारपासुनच सुसाट्याचे, तुफान वारे वाहत होते, रॉबर्टचा आवडता घोडा अंग चोरुन अंगणात उभा होता.
मधमाशा घोंघवतात तसा एक प्रचंड मोठ्ठा आवाज प्रत्येकाला ऐकु येत होता, नेमके काय होतेय, ते समजत नव्हते, एका भयानक संकटाची नांदी असल्यासारखे वातावरण भयाण झाले होते,
त्या संध्याकाळी रॉबर्टचे वडील आणि कुटुंबीय अस्वस्थ होवुन घराबाहेर थांबले होते, अचानक त्यांना दुरवर एक घोंघावणारे वादळ दिसले, वाळवंटातली गरम मातीचे कण एकत्र होवुन वादळावर स्वार झाली होती,
“अरे, देवा, हे तर चक्रवात वादळ आहे, सारे काही तहस नहस, उद्ध्वस्त करुन टाकेल,” क्षणाचाही विलंब न करता त्याच्या वडीलांनी कुटुंबियांना एकत्र केले, कार मध्ये बसवले आणि वादळाच्या विरुद्ध दिशेने, पहाडाकडे वेगाने निघाले.
तेरा किलोमीटर दुर जावुन, ते कड्याकपारीवर, आपल्या शेताकडे आणि घराकडे बघत उभे होते, वादळ हळुहळु त्यांच्या दिशेने आले, जणु एक काळा सोनेरी राक्षस आपल्याला कवेत घेतोय, असेच त्यांना काही क्षण वाटले, त्यांनी डोळे बंद केले, त्यांच्या नाकातोंडात पुर्ण माती गेली, पण डोंगराच्या माथ्यावर असल्यामुळे ते सुखरुप बचावले.
जीवाच्या आकांताने ते आपल्या घराकडे परत निघाले, रस्त्यात सगळे होत्याचे नव्हते झाले होते, घर, झोपड्या, शेतं, जनावरं, काही क्षणात, सगळे सगळे होत्याचे नव्हते झाले होते आपल्या घराजवळ गेल्यास त्यांना आपलं घरचं दिसेना, वादळाने संपुर्ण घर, उडुन गेलं होता…..
रॉबर्टचा लाड्का घोडा, त्याच्या पोटात एक चौदा फुटाचा खांब घुसुन मरुन पडला होता, सगळीकडे रडारड चालली होती, ते सुन्न दृष्य पाहुन हृदयात कालवा कालव होत होती…..
रॉबर्टच्या वडीलांच्या डोळ्यासमोर त्यांनी आयुष्यभर काडी काडी जमा करुन बांधलेले घरटे नष्ट झाले होते. त्यांच्या निळ्या डोळ्यातुन एक अश्रु ओघाळला आणि त्यांनी लगेच स्वतःचे नियंत्रण केले.
लोकांनी त्यांना सांगीतलं की त्यांच्या घराचा वरचा अर्धा भाग आणि छप्पर तिथुन अर्धा किलोमीटर दुर पड्ले आहे, त्यांनी तो पुन्हा खेचत खेचत आणला….
त्या संकटांनंतर खुप लोकांनी गाव सोडले, शहरात गेले, बर्याच जणांनी घरेच बांधली नाहीत. पण रॉबर्टच्या वडीलांनी, थोड्याच दिवसात, हिमतीने नवे घर पुन्हा उभे केले, यावेळी पहील्यापेक्षा सुंदर! ते जिद्दीने शेती करतच राहीले.
काही महीन्यात दिवस पालटले, खुप चांगला पाऊस पडला, मरताना रॉबर्टचे वडील गावातले एक सधन व्यक्ती होते.
त्या संकटांनंतर, अवघ्या काही वर्षात, त्यांनी एकशे सत्तावीस एकर जमीन खरेदी केली होती, इतके उत्पन्न त्यांनी शेतातुन कमवले.
माहीत नाही का बरं? पण ही गोष्ट मी पहील्यांदा वाचली तेव्हा मला खुप रडु आले, त्यानंतर, प्रत्येक वेळी, जेव्हा जेव्हा मी हे पुस्तक वाचलो, प्रत्येक वेळी मी रडलो, आणि आज हा लेख लिहतानाही माझ्या डोळ्यात पुन्हा अश्रु आहेत.
त्याच्या वडीलांनी रॉबर्टला इतके मोठे केले, की जगातला सर्वात मोठा चर्च क्रिस्टल कॅथेड्रल त्याने दिमाखात उभारलाय. तो संपुर्ण काचेचा आहे.
तुमची आमची संकटे रॉबर्टच्या वडीलांपेक्षा मोठी आहेत का? नाही ना!, तर मग आपण त्यांच्यावर सहज मात करु शकतो. फक्त स्वतःवर आणि देवावर अतुट विश्वास ठेवा!
तुमच्याही आयुष्यात काही प्रॉब्लेम्स असतील, आणि तुम्ही त्यांच्यावर यशस्वीपणे मात कशी केली, ते मला लिहुन पाठवा.
तुमच्या हिंमतीकडे बघुन संकटे तुमच्यापासुन दुर दुर पळुन जावो, अशा मनःपुर्वक शुभेच्छांसह,
आजची शुभ-सकाळ!
धन्यवाद!
वाचण्यासारखे आणखी काही…..
आयुष्याकडे बघण्याचा आनंदी दृष्टिकोण (Ways of Happier Life)
मनातलं जंगल…
उत्कृष्टतेचा ध्यास
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
माझा अतिशय आवडाता ग्रुप आहे