भारतीयांना अवकाशात नेणारी भारतीय “स्त्री” डॉक्टर व्ही. आर. ललिथतंबिका – (गगनयान)

१५ ऑगस्ट २०१८ ला लाल किल्यावरुन पंतप्रधानांनी २०२२ पर्यंत भारतीयांना भारतीय रॉकेट च्या साह्याने भारतातून अवकाशात नेण्याच उद्दिष्ठ ठेवलं आहे. “गगनयान” मोहिमेतून २०२२ पर्यंत भारतीय अवकाशात उड्डाण करतील. अमेरिका, रशिया आणि चीन नंतर स्वतःच्या तंत्रज्ञानाने अवकाशात माणसाला पाठवणारा भारत जगातील चौथा देश असेल व इतक्या महत्वाच्या आणि महत्वकांक्षी मोहिमेची जबाबदारी एका भारतीय स्त्री च्या खांद्यावर देण्यात आली आहे त्याचं नाव आहे “डॉक्टर व्ही. आर. ललिथतंबिका”. डॉक्टर व्ही. आर. ललिथतंबिका ह्यांच्या नेतृत्वाखाली भारतातून भारतीयांना घेऊन भारतीय रॉकेट अवकाशात उड्डाण भरेल तेव्हा भारतीय स्त्री ने चूल आणि मुल ह्यापलीकडे जाऊन अवकाशात झेंडे लावले असतील.

गगनयान

अनेक नटींची नावे आणि त्यांचा जीवनपट अगदी तोंडपाठ असणाऱ्या भारतीयांना डॉक्टर व्ही. आर. ललिथतंबिका कोण आहेत? हे माहिती नाही ही आपली खरी शोकांतिका आहे. डॉक्टर व्ही. आर. ललिथतंबिका ह्यांनी इस्रो मधलं आपलं करियर विक्रम साराभाई स्पेस सेंटर इकडे सुरु केलं. कंट्रोल इंजिनिअरींग मध्ये मास्टर डिग्री असणाऱ्या डॉक्टर व्ही. आर. ललिथतंबिका गेल्या ३० वर्षापासून इस्रो मध्ये कार्यरत आहेत. इस्रो च्या रॉकेट डिझाईन टीम च्या अध्यक्ष असून एडवांस स्पेस लॉन्चिंग मध्ये त्यांनी विशेष प्राविण्य मिळवलेलं आहे. इस्रो च्या विश्वविक्रमी अश्या १०४ उपग्रह प्रक्षेपणात त्यांची भूमिका महत्वाची होती. जी.एस.ए.एल.व्ही. मार्क ३ मधल्या डिजिटल ऑटो पायलट च्या निर्मिती मध्ये त्यांची भूमिका निर्णायक राहिली आहे.

डॉक्टर व्ही. आर. ललिथतंबिका ह्यांना त्यांच्या कार्यासाठी अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. ज्यात स्पेस गोल्ड मेडल २००१, मेरीट पुरस्कार, २०१३ इस्रो चा परफॉर्मन्स एक्सलंस पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. इतके पुरस्कार मिळून सुद्धा डॉक्टर व्ही. आर. ललिथतंबिका ह्या स्वभावाने अतिशय नम्र आणि मृदू आहेत. आपलं घर, संसार सांभाळून अडचणीच्या अनेक काळातून आणि यश- अपयशाचा सामना करत इस्रो चं नाव भारतात नव्हे तर जगात उंचवण्यात महत्वाची भूमिका राहिलेली आहे. इस्रो मधील त्यांचा अनुभव त्यांच्याच शब्दात.

It is extremely satisfactory to work in ISRO because everyone here is allowed to voice their opinion, be it a junior or senior. Each of our missions is an example of the successful execution of teamwork.

इस्रो चा अवकाश मोहिमेंचा इतिहास हा खूप यशस्वी राहिला आहे. अमेरिका, चीन, रशिया ह्यांना जे जमलं नाही ते भारताच्या इस्रो ने १००% यशासह करून दाखवलेलं आहे आणि ते ही अतिशय कमी खर्चात. आपल्या पहिल्याच प्रयत्नात चंद्र आणि मंगळ मोहीम यशस्वी करून इस्रो ने जगात आपल्याबद्दल एक अढळ स्थान निर्माण केलं आहे. भारताची गगनयान मोहीम ही तब्बल १०,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाची असताना अश्या एका मोहिमेचं सारथ्य करण्याची जबाबदारी एका भारतीय स्त्री वर आहे ह्याचा एक भारतीय म्हणून सगळ्यांना अभिमान असला पाहिजे. स्त्री च्या समान संधीबद्दल ओरड करणाऱ्या सगळ्यांनी डॉक्टर व्ही. आर. ललिथतंबिका ह्याचं उदाहरण समोर ठेवावं.

गगनयान
५ ते ७ दिवस अवकाशात राहणाऱ्या गगनयानचा प्रवास कसा असणार आहे याची माहिती या चित्रात मिळेल.

नुकत्याच रशिया सोबत झालेल्या करारामध्ये रशियाने भारताला गगनयान मोहिमेसाठी पूर्ण सहकार्य करण्याचा करार केला आहे. भारताची इस्रो आणि रशियाची रॉसकॉसमॉस ह्या दोन राष्ट्रीय संस्थामध्ये एकमेकांसाठी सहकार्य करण्याचा हा करार आहे. त्यानुसार भारतीय अंतराळवीरांना अवकाशात जाण्यासाठी लागणारं सर्व प्रशिक्षण रशिया युरी गागरीन ट्रेनिंग सेंटर मध्ये देणार आहे. हे ट्रेनिंग सेंटर जगातील अंतराळवीरांना प्रशिक्षण देण्यामध्ये सर्वोत्तम मानलं जाते. तसेच इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मध्ये भारतीयांना नेण्याचं आश्वासनही रशियाने दिलं आहे. ह्या आधी फ्रांस ने भारताला ह्या मोहिमेसाठी तंत्रज्ञानातील पूर्ण सहकार्य देण्याचं आधीच जाहीर केलं आहे. रशिया, फ्रांस तसेच अमेरिका ह्या तिन्ही देशांनी भारताच्या अवकाश प्रवेशासाठी आपलं तंत्रज्ञान देण्याचं मान्य करणे हे इस्रो च्या अभियंते, वैज्ञानिक आणि त्यामागे असलेल्या त्यांच्या परिश्रमाच फलित आहे.

इस्रो च्या आजवर झालेल्या सगळ्या मोहिमांपेक्षा “गगनयान” मोहीम ही सगळ्यात कठीण असणार आहे. ह्या मोहिमेत भारतातून ३ स्त्री / पुरुष २०२२ ला भारताच्या भूमीवरून अवकाशात साधारण ५-७ दिवस पृथ्वीची परिक्रमा करणार आहेत. त्या सर्वांना अवकाशात पृथ्वीच्या कक्षेत स्थापन करणं तसेच तिकडे त्या कालावधीत जीवनावश्यक सर्व गोष्टींची पूर्तता करणं आणि सर्वांना सुखरूप पुन्हा भारताच्या भूमीवर घेऊन येणं हे खूप कठीण असणार आहे. ह्या सगळ्यात कठीण आणि महत्वकांक्षी मोहिमेची धुरा एका भारतीय स्त्री च्या खांद्यावर टाकताना इस्रो ने नारी शक्तीचा केलेला हा सगळ्यात मोठा सन्मान आहे. डॉक्टर व्ही. आर. ललिथतंबिका आपल्या कौशल्याने ही मोहीम यशस्वी करताना भारताचं नाव सर्वदूर नेतीलच पण त्याही पेक्षा एकेकाळी चूल आणि मुल ह्यात अडकलेल्या स्त्रीचं अवकाशात उडण्याचं स्वप्न पूर्ण करतील ह्यात शंका नाही. अश्या ह्या भारतीयांना अवकाशात नेणाऱ्या भारतीय स्त्री ला माझा सलाम आणि खूप खूप शुभेच्छा.

वाचण्यासारखे आणखी काही…

कल्पनांना वास्तवात बदलवणारा जादुगर – आर्किटेक्ट बी. व्ही. दोषी
भाग्यासी काय उणे रे… (Wright Brothers Story)
चार्ली चाप्लीन – प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट!

मनाचेTalks च्या लेखांबद्दल वाचकांच्या प्रतिक्रिया….


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।