भारतीय जेवण आणि आयुर्वेद यामध्ये तुपाला फार महत्व आहे. गायीच्या तूपा सारखे म्हशीचे तूप सुद्धा आरोग्यासाठी फायदेशीर असते. प्रमाणापेक्षा जास्त बारीक असलेल्या व्यक्तींना नेहमी तुपाचे गोळे खाण्यास सांगीतले जाते.
आपण सर्वानीच लहानपणी जंगलात जाणाऱ्या आजीची गोष्ट ऐकली असेल. ती वाघाला म्हणते मी लेकीकडे जाते आणि तूप रोटी खाऊन आणि लठ्ठ लुट्ठ होऊन येते. याचाच अर्थ असा कि तूप हे वजनवाढीस उपयुक्त आहे.
तुपामध्ये व्हिटॅमिन ए , डी आणि ई हे जीवनसत्वे असल्याने शरीरातील हाडं बळकट होतात. आणि सांधेदुखीचा त्रास कमी होतो. त्याचबरोबर तुपामध्ये असलेल्या अँटिऑक्सिडेंट्समुळे रोग प्रतिकारक शक्तीही वाढते.
आजच्या या लेखामध्ये आपण म्हशीच्या दुधापासून बनविलेल्या तुपाचे फायदे आणि तोटे जाणून घेणार आहोत.
म्हशीचे तूप आहारामध्ये समाविष्ट केल्याने होणारे फायदे
सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे म्हशीच्या तूपामध्ये अनेक प्रकारचे जीवनसत्व आहेत ज्यामुळे आरोग्य चांगले राहून हृदय रोग, मधुमेह यांसारख्या आजारापासून आपल्याला संरक्षण मिळते. तुपामध्ये असलेल्या अँटिऑक्सिडेंटमुळे दृष्टी शाबूत राहण्यास मदत होते. याशिवाय म्हशीच्या तूपाचा नियमित वापर केल्याने शरीराला बरेच फायदे होतात. ते असे-
१. रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
म्हशीच्या तूपामध्ये एक विशिष्ट प्रकारचे ऍसिड असते त्यामुळे शारीरामध्ये रक्ताचे प्रमाण वाढण्यास मदत होऊन कुठल्याही रोगाचा प्रतिकार करण्याची शक्ती वाढते.
२. रातांधळेपणा नष्ट होतो.
आपण कदाचित ऐकले असेल कि उतारवयात आलेल्या बऱ्याच लोकांना रात्रीच्या वेळी दिसत नाही किंवा फार कमी दिसतं. म्हशीच्या तुपामध्ये असलेल्या व्हिटॅमिन ए मुळे हि समस्या दूर होऊ शकते. व्हिटॅमिन ए मध्ये एपीथेलीअल टीशुझ असतात ज्यामुळे डोळ्यांची बुबुळ सुरक्षित राहून दृष्टी दीर्घ काळ कार्यरत राहते.
३. यकृत निरोगी ठेवते.
शरीरात व्हिटॅमिन ई च्या कमतरतेमुळे यकृताशी संबंधित अनेक आजार होऊ शकतात. म्हशीच्या तुपामध्ये भरपूर फॅट्स असतात. त्यामुळेच शरीरामध्ये असलेली विटामिन ई ची कमतरता भरून निघण्यास मदत होऊन यकृत निरोगी राहते.
४. फ्रॅक्चरचा धोका कमी असतो.
आपण कुठे पडलो किंवा एखादा अपघात झाला आणि शरीरातील अवयव फ्रॅक्चर झाला तर ? आपल्याला कल्पनेनेच भीती वाटते. पण म्हशीच्या तूपाचे नियमित सेवन केले तर हि भीती कमी होऊन फ्रॅक्चरचा धोका कमी होतो. याचे कारण म्हशीच्या तुपामध्ये असलेले व्हिटॅमिन के. व्हिटॅमिन के मुळे जखमेतून येणारा रक्तप्रवाह थांबतो आणि हाडांचे दुःख
५. हृदय विकार, मधुमेह, कॅन्सर सारख्या आजारांपासून संरक्षण मिळते.
हल्ली हाडांचे डॉक्टर व्हिटॅमिन डी ची टेस्ट करायला सांगतात. शरीरामध्ये व्हिटॅमिन डी कमतरता असल्यास लहान वयातच पायदुखी सुरु होते. शरीरामध्ये कॅल्शिअम आणि फॉस्फोरोस यांचे प्रमाण संतुलित ठेवून व्हिटॅमिन डी ची गरज म्हशीच्या तूपामुळे पूर्ण होते. आणि त्यामुळे शरीरातील हाडांच्या समस्यांसोबतच हृदय विकार , मधुमेह आणि कॅन्सर सारखे गंभीर आजार बळावत नाहीत.
६. वाढलेले वजन कमी करण्यास उपयुक्त
ऐकून जरा आश्चर्य वाटेल. पण असे संशोधनात सिद्ध झाले आहे की , म्हशीच्या तुपामध्ये असलेल्या विशिष्ट प्रकारच्या द्रव्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. शरीरावर वाढलेली अतिरिक्त चरबी म्हशीच्या तुपाच्या नियमित सेवनाने कमी होऊ शकते.
म्हशीचे तूप अति प्रमाणात वापरयास होणारे नुकसान
कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो. तसेच, म्हशीचे तूप खूप जास्त प्रमाणात वापरले तर ते आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.
- गरोदर महिलांना आणि लहान मुलांना म्हशीच्या तुपाच्या अतिसेवनाने अपचनाचा त्रास संभवतो.
- म्हशीचे दूध पचायला जड असते त्यामुळे त्याच्यापासून बनवलेले तूप देखील योग्य प्रमाणात सेवन केले नाही तर त्याचा पचनक्रियेवर नकारात्मक परिणाम होतो.
- तसेच, म्हशीच्या तुपामध्ये फॅट्सचे प्रमाण जास्त असल्याने शरीरातील कॅलरीज आणि कोलेस्टेरॉल वाढून वजन कमी होण्याऐवजी वाढू लागते. आणि त्यामुळे हृदय विकाराचा धोका संभवतो.
१ ते ३ वर्षा पर्यंतच्या मुलांना अनेकदा दुधामध्ये किंवा पाण्यामध्ये तूप घालून पाजण्यास सांगतले जाते. त्यामुळे कधी कधी त्यांना पोट साफ होण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच असे प्रयोग करावेत.
आपण गरम वरण भात आणि पुरणपोळीवर नेहमीच तुपाच्या धारा सोडून ताव मारतो. पण त्याच म्हशीच्या तुपाचे योग्य प्रमाणात आणि नियमित सेवन केले तर हाडांचे वय टिकून राहून आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. त्यामुळे आहारामध्ये म्हशीच्या तुपाचा समावेश अत्यावश्यक आहे.
तळटीप : पोट साफ नसताना तोंडाला फोड येतात. तेव्हा त्यावर तूप लावल्यास वेदना कमी होऊन फोड निघून जातात. त्याचप्रमाणे हिवाळ्यात उललेल्या ओठांवर तूप लावले तर ओठ फाटत नाहीत आणि त्यावरील त्वचेचे आवरण मऊ राहते.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.