मनोविकार आणि शारीरिक विकार यांचा संबंध काय? त्यांचा सामना कसा कराल?

मन पाखरु पाखरु, कधी इथे, कधी तिथे,
कधी फुलाहुन कोवळं, कधी पर्वतही फिके!…

मित्रांनो, आपलं आयुष्य एका राजाच्या तालावर नाचतं, आणि ते म्हणजे आपलं मन! आपण प्रत्येकजण आपल्या मनाचे गुलाम असतो.

असं तुमच्यासोबत होतं का, की सगळं काही अगदी छान चाललेलं असतं आणि अचानक आपल्याला उदास उदास वाटु लागतं?

कधी अचानकच आपल्याला कुणाचाही, अगदी क्षुल्लक गोष्टीसाठी राग राग येऊ लागतो.

कधी अचानकच आपला मुड अगदीच चांगला बनतो, आणि कसल्याही अवघड परिस्थितीत आपण खोखो हसु लागतो.

कधी आपल्याला ह्या जगाबद्द्ल, इथल्या प्रत्येक माणसाबद्द्ल आपलेपणाची भावना वाटु लागते.

थोड्या दिवसात आपलं इथं कोणीही नाही, आपण अगदी एकटे एकटे आहोत, अशी फिलींग येते.

का? असं का होतं? याचं कारण आहे आपलं मन!

कारण मनाच्या प्रबळ शक्तीपुढे ज्याचं काही चालत नाही, तो प्रत्येकजण, सतत, कसल्या ना कसल्या विकारांचा सामना करत असतो.

विकार म्हणजे काय?

Any imbalance created in mind, body or soul, is called as Disease.

मन, शरीर किंवा आत्मा ह्यांच्यामध्ये कुठेही निर्माण झालेले असंतुलन म्हणजे विकार!

Disease = Dis + easy.

व्यवस्थित शरीरात आलेला, तयार झालेला अव्यवस्थितपणा म्हणजे रोग, व्याधी किंवा विकार!

विकारांचे चार प्रकार आहेत.

१) शारीरीक विकार

बाह्य आघातामुळे जेव्हा शरीरात चालणार्‍या, हजारो नैसर्गिक क्रियांमध्ये, एखाद्या भागात, कोणत्याही प्रकारचा बिघाड, किंवा अडथळा तयार होतो, त्याला म्हणतात, शारिरीक विकार!

उदा. अपघात होणे, जखम होणे, मुका मार लागणे, बाहेरील तापमानामुळे शरीर प्रभावित होणे, व्हायरल इन्फेक्शन, दुषित पाणी पिल्यामुळे वगैरे वगैरे.

हातपाय फ्रॅक्चर होणे, सर्दी, काविळ, ताप, अपेंडीक्स हे काही शारीरीक विकार आहेत.

यावर उपचार घ्यायला आपण डॉक्टरकडे जातो, औषधौपचारांनी हे बरे होतात.

२) मानसिक विकार 

मनामध्ये बिघाड होवुन झालेल्या विकारांना मानसिक विकार असे म्हणतात.

मानसिक विकार होण्याची कारणे तीन

जर एखादा माणुस सतत काळजी, चिंता, भीती, ईर्ष्या, स्पर्धा करत असेल, सतत कुठल्या ना कुठल्या दडपणाखाली दबलेला असेल, त्याला मानसिक विकार होतात.

एखाद्याच्या आयुष्यात एखादी दुर्दैवी आणि वाईट घटना घडली असेल, (उदा. प्रेमभंग, प्रिय व्यक्तीचा मृत्यु, बिझनेसध्ये प्रचंड लॉस) नेहमी तेच तेच आठवत राहील्यास, मानसिक विकार घेरतात.

एखादा माणुस वारंवार एखाद्या विकाराबद्द्ल विचार करत असेल, (उदा. मला झोप लागत नाही) अशा तीव्र आणि वारंवार विचारांमुळे बाह्यमन बिघडतं, डिस्टर्ब होतं आणि मानसिक विकार बळावतो.

हे काही मानसिक विकार आहेत, जसे की

कारण नसताना भीती वाटणे, चिंता, काळजी, नैराश्य, एकाग्रता कमी होणे.

स्मरणशक्ती कमी होणे, एकटेच राहणे, स्वतःशीच बडबडणे.

हातापायांची विशिष्ठ हालचाल करणे, एकच कृती वारंवार करणे.

भुक लागत नाही किंवा अतिखाणे, झोप न लागणे,

सेक्स पावर कमी होणे.

३) मनो-शारीरीक विकार

मानसिक विकारांवर उपचार न घेतल्यामुळे, शरीरावर झालेल्या वाईट परिणामांना, ‘मनो-शारिरीक’ (psycho somatic diseases) विकार असे म्हणतात.

मन आणि शरीर एकमेकांशी वेल कनेक्टेड आहेत. मनाचा शरीरावर आणि शरीराचा मनावर प्रभाव आणि परिणाम होत असतो.

मनात दाबुन ठेवलेल्या मानसिक विकारांमुळे, मानसिक ताणतणावांमुळे, निरोगी शरीरामध्ये अनेक व्याधी आणि रोग तयार होतात.

सततच्या मानसिक तणावामूळे, मेंदुमध्ये असलेले न्युरोट्रान्समीटर डिस्टर्ब होतात. मेंदु, ह्र्दय, पोट, किडनी, मज्जासंस्था यापैकी कमकुवत भागावर तणावाचा परिणाम होतो. क्रमाक्रमाने तिथले ऑर्गन्स डॅमेज होतात.

उदा. तणावाचा परिणाम किडनीवर झाला की किडनी फेल होते. हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेज, पॅरॅलिसीस यांचं मुख्य कारण तणाव आहे. तणावामुळे रक्तामध्ये स्ट्रेस हार्मोन तयार होतात. रक्तवाहिन्या ब्लॉक करतात.

1) WHO (World health organization) ने जाहीर केलेल्या रिसर्च नुसार, माणसाच्या एकुण विकारांपैकी ऐंशी ते नव्वद टक्के विकार हे मनो शारीरीक विकार आहेत, मानसिक कारणांमुळे तयार झालेले विकार आहेत.

2) या विकारांवर औषधौपचार पुर्णपणे रोगांना बरे करु शकत नाहीत, रोगाचे प्रमाण वाढु नये म्हणुन ते काम करतात, पण औषधे रोगाला मुळापासुन बरे करु शकत नाहीत.

उदा. – बीपी, शुगरच्या गोळ्या आणि इंजक्शने आयुष्यभर चालु ठेवावे लागतात, कारण त्या असलेल्या रोगाला नियंत्रणात ठेवतील, पण मुळातुन बरे करु शकत नाहीत. बीपी, डायबेटीज कधीही पुर्णपणे शरीरातुन जात नाहीत.

असे का होते?

कारण रोग झालेला असतो मनाला आणि उपचार केला जातो, मेंदुवर! रोगावर दिले जाणारे प्रत्येक औषध हे मेंदुवर काम करते.

उदा. नैराश्य असलेल्या व्यक्तीला झोप लागत नाही म्हणुन त्याने झोपेच्या गोळ्या घेतल्या, गोळ्यांचा प्रभाव संपला की त्याला पुन्हा विचार येतात, विचारांमुळे पुन्हा तणाव येतो, मग पुन्हा गोळ्या.

चक्र सुरु राहते. रोग काही बरा होत नाही, आणि तो माणुस गोळ्यांचा गुलाम बनुन राहतो. तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार घेणे हे ही मानसिक आजरात अत्यंत गरजेचे आहे. पण त्याच बरोबर

मानसिक विकार बरे करण्यासाठी स्व-संमोहन, चक्रा बॅलन्सिंग, ध्यान ह्या काही प्रभावी पद्धती आहेत. 

४) आत्मिक विकार

हा विकार मेडीकल डिक्शनरी मध्ये दिसणार नाही.

आपल्या आत्म्यामध्ये, वलयामध्ये, चक्रांमध्ये झालेल्या बिघाडांना आत्मिक विकार म्हणतात.

मागच्या जन्मीच्या तीव्र दुःखद धक्क्यांमुळे, घटनांमुळेही (past life impressions) आत्मिक विकार होवु शकतात.

वारंवार एकच प्रकारचे स्वप्न पडणे.

पाण्याची, प्रवासाची, उंचीची, गर्दीची भीती वाटणे.

वारंवार आत्महत्या करायचे विचार येणे.

सतत धडपड करुनही यश न मिळणे.

एकामगोमाग एक कटकटी सुरु राहणे.

अतिवासना हे काही आत्मिक विकार आहेत.

आता सर्वात महत्वाचे,

मानसिक आणि आत्मिक विकारांवर मात करता येऊ शकते का?

  • हो! नक्कीच!

त्यासाठी आधी मनाची आणि शरीराची क्रमवार रचना समजावुन घेऊ.

बाह्यमन > अंतर्मन > मेंदु > शरीर

सर्वात आधी आहे बाह्यमन, त्यानंतर बाह्यमन अंतर्मनामध्ये विचार पाठवतं, अंतर्मन तो विचार मेंदुला पाठवतं, आणि सर्वात शेवटी मेंदु शरीराला आज्ञा देतो आणि ती कृती घडवुन आणतं!

उदा. आपण आईस्क्रीमच्या दुकानात जातो.

आपण तिथे एखाद्याला एखादं आकर्षक संडेज खाताना बघतो, किंवा त्याचं चित्र बघतो, (बाह्यमन)

नंतर आपल्याला ते खाण्याची तीव्र इच्छा होते, (अंतर्मन)

आपण रेटस चेक करतो, (मेंदु)

महाग असुनही आपण ते ऑर्डर करतो, (शरीर)

अगदी असंच, कुठल्याही विचाराची आणि कृतीची सुरुवात होते ती बाह्यमनापासुन!

सर्वात आधी आहे बाह्यमन, हे तर्क वापरतं, ह्याला बरंवाईट कळतं.

अंतर्मन शरीरातील सर्व क्रिया सुरळीत पार पाडत असतं, श्वास, रक्ताभिसरण, हृदयाचे ठोके, पचन, चयापचय! हे बाह्यमनाच्या नियंत्रणात नसतं!

बाह्यमन झोपतं, अंतर्मन कधीही झोपत नाही.

बाह्यमनाला सुचना देऊन, डयरेक्ट शरीरावर नियंत्रण करता येत नाही, मात्र बाह्यमनाला झोपवुन अंतर्मनाला सुचना देऊन शरीरावर नियंत्रण करता येतं.

जसं की – संमोहन केल्यावर, नाडीचे ठोके वाढवता येतात, बॉडी टेंपरेचर कमी किंवा जास्त करता येते, थंडी किंवा गर्मीचा अनुभव देता येतो. हसवता येते, रडवता येते, पळवता येते, उड्या मारायला लावु शकतो.

बाह्यमनाला विचार करता येतो, तसा अंतर्मनाला विचार करता येत नाही, त्याला खरं खोटं काहीच कळत नाही.

दिलेली आज्ञा ते निमुटपणे पाळतं.

अंतर्मनात प्रवेश करुन नियमितपणे आज्ञा देत राहील्यास आपण मानसिक आणि आत्मिक विकारांना पळवुन लावु शकतो.

निर्भेळ आनंदी जीवन जगु शकतो.

विश्वास, प्रार्थना, श्रद्धा, अफर्मेशन्स, व्हिज्वलायजेशन, स्व-संमोहन आणि ध्यान ही सात सुत्रे आपल्याला, मानसिक, आत्मिक विकारांमधुन मुक्त करुन आनंदाच्या शिखराकडे, नक्की घेऊन जातील.

आपल्या सर्वांना आपल्या अंतर्मनाचे सामर्थ्य कळावे, ही ह्र्द्यपुर्वक प्रार्थना!

कित्येक वर्षांच्या रिसर्च आणि माझे स्वतःचे अनुभव यांच्यावर आधारीत हा लेख मी लिहिला आहे.

तेव्हा लेख आवडल्यास लाईक करा,

ह्यातील मुद्द्यांशी तुम्ही सहमत आहात का?

नसल्यास का नाही? तुमच्या कडे असलेली ह्या विषयावरची वेगळी माहिती किंवा अनुभव मला कमेंटबॉक्स मध्ये लिहुन कळवा.

मला वाचायला नक्की आवडेल.

आपल्या मित्रांना हा लेख वाचुन फायदा होईल असा विश्वास असल्यास त्यांनाही शेअर करा.

शुभेच्छा, आभार, आणि मनःपुर्वक धन्यवाद!

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

2 thoughts on “मनोविकार आणि शारीरिक विकार यांचा संबंध काय? त्यांचा सामना कसा कराल?”

  1. अंतर्मन आणि बाह्यमन यांच्यात सांगड घालत असतांना आत्मिक विकार हा शब्द मला खटकला,का कुणास ठाऊक?
    विज्ञानाच्या भाषेत मेंदूमध्ये होणारी electrochemical reaction म्हणजे आपले विचार आहेत.

    Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।