दातांचा पिवळेपणा घालवण्याचे काही प्रभावी उपाय वाचा आजच्या लेखात.
काही लोक असे असतात की त्यांची ‘स्माईल’ आपल्याला खूप आवडते. त्यांचे हसणे खूप ऊर्जा देते. अनेक मुलींच्या नुसत्या सुहास्यामुळे प्रेमी घायाळ होतात. पण, असे हसणे कधी कधी ‘रडणे’ होते. त्याचे कारण म्हणजे आपल्या दातांचा पिवळेपणा.
दातांना पिवळेपणा येण्यामागे अनेक कारणे असू शकतात. यावर उपायही आहेत. घरगुती उपाय करून आपण दातांचा पिवळेपणा घालवू शकतो. पण, त्या आधी दातांच्या पिवळेपणाला जबाबदार कारणे काय आहेत, ते पाहुयात.
दातांना पिवळेपणा येण्याची कारणे– दातांचा पिवळेपणा येण्यामागे अनेक कारणे असू शकतात. जसे वारंवार चहा-कॉफी पिणे, पान खाणे, तंबाखू खाणे, गुटखा खाणे… आदि पदार्थांच्या खाण्याने दात पिवळे पडू शकतात.
याशिवाय, दातांची स्वच्छता न करणे हे ही कारण आहे. आपण गोड पदार्थ खातो, चॉकलेट खातो तेंव्हा दात घासत नाही. चूळ भरत नाही.
त्यामुळे पदार्थांचे कण दातात अडकतात. त्याचा पातळ थर त्यावर साठतो आणि मग दात पिवळे पडतात. दातांचा पिवळेपणा आपल्या व्यक्तिमत्वात अडथळा निर्माण करतो. त्यामुळे आपल्या हसण्यावर मर्यादा येतात.
दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी तुम्ही डेंटिस्टकडे जाता. त्यावेळी महागड्या औषधांची यादी ते तुमच्या हातावर ठेवतात.
बाजारात विविध नामांकित कंपन्यांच्या अनेक टूथपेस्ट उपलब्ध आहेत. तसेच, आयुर्वेदिक घटक असणार्या टूथपेस्टही आहेत. त्याही तुम्ही वापरता.
पण, त्याचा फायदा बर्याचदा होत नाही. पण, घरच्या घरी काही उपचार करून दातांचा पिवळेपणा कमी करता येतो, बरं का!
दातांच्या पिवळेपणाबद्दल बोलण्याआधी आपण ओरल हायजिन साठी भारतात जुन्या काळापासून वापरल्या जाणाऱ्या एका उपायांबद्दल बोलू.
याबद्दल पुढे काही शास्त्रीय अभ्यास सुद्धा झाले तेव्हा या कृतीला Oil Pulling असे नाव ठेवले गेले. ऑइल पुलिंग मुले तोंडातील बॅक्टेरिया आणि प्लाक कमी व्हायला मदत होते.
यासाठी कुठलेही तेल वापरता येते. पण मोहिरीचे तेल वापरले तर दात पांढरे शुभ्र करण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग होतो.
दातांचा पिवळेपणा घालवण्याचे काही उपाय आता बघा
1) बेकिंग सोडा- बेकिंग सोडा हा नैसर्गिक रित्त्या व्हाईटनिंग साठी वापरला जाणारा घटक आहे. कुठल्याही टूथपेस्ट सुद्धा मध्ये हा घटक वापरलेला असतो. बेकिंग सोडा दातांवर स्क्रब करून त्यावरील पिवळा थर काढण्या बरोबरच त्याच्या अल्कलाईन गुणधर्मांमुळे तोंडात बॅक्टेरियाची वाढ होण्यापासून प्रतिरोध करतो.
2) बेकिंग सोडा आणि स्ट्रॉबेरी- बेकिंग सोडा आणि स्ट्रॉबेरी हा दात पांढरे शुभ्र करण्याचा नैसर्गिक आणि घरगुती उपाय बऱ्याच सेलिब्रिटींकडून सुद्धा वापरला जातो. स्ट्रॉबेरी मध्ये असलेले मॅलिक ऍसिड दातांवरील पिवळा थर काढण्यासाठी तर बेकिंग सोडा स्क्रब चे काम करून त्याच्या नियमित वापराने काही काळानंतर दात पांढरे शुभ्र व्हायला मदत होते.
3) अननस- अननसामध्ये असणारे ब्रोमेलाईन नावाचे एक एन्झाईम दातांवरील डाग आणि पिवळा थर काढण्यासाठी परिणामकारक असते.
4) हळद आणि मोहरी तेल– हळद पावडर आणि मोहरीच्या तेलाचे मिश्रण दातांवर घासल्याने दाताचा पिवळेपणा कमी होतो. यासाठी अर्धा चमचा हळद पावडर आणि एक चमचा मोहरी तेल घेवून ते मिश्रण तयार करा.
हे मिश्रण हाताच्या बोटावर घ्या आणि त्याने दातांवर हलके घासा. असे सकाळी आणि संध्याकाळी करा. याने काही दिवसातच तुम्हाला फरक दिसायला लागेल.
5) मोहरी तेल आणि मीठ– मीठ आणि मोहरीच्या तेलाच्या मिश्रणाचाही फायदा दातांसाठी होतो.
यासाठी अर्धा चमचा मोहरी तेल घ्या. त्यात 2 चिमट मीठ टाका. याची पेस्ट बनवा.
ती हातांच्या बोटांवर किंवा टूथब्रशवर घ्या. त्याने दात घासा. यामुळे काही दिवसात दातांवरचा पिवळेपणा कमी होऊ लागेल.
6) मोहरी तेल- समुद्री मीठ-हळद पावडर एकत्रित पेस्ट– हळद पावडर, समुद्री मीठ आणि मोहरीच्या तेलाची एकत्रित पेस्ट बनवा. ती पेस्ट दातांवर दिवसातून 3 वेळा घासा.
यानेही दातांचा पिवळेपणा जाईल. ही पेस्ट तयार करून तुम्ही एका बाटलीत भरून ठेवू शकता आणि वापर करू शकता.
7) मोहरीचे तेल आणि सैंधव मीठ– सैंधव मीठ हे शुद्ध मीठ आहे. याचा वापर अनेक व्याधींमध्ये केला जातो.
अर्धा चमचा मोहरीचे तेल आणि चिमूटभर सैंधव मीठ यांचे मिश्रण तयार करा. ते 2 ते 3 मिनिटे दातांवर घासा. सैंधव मिठात आयोडीन नसते.
पण, जर तुम्ही मोहरीच्या तेलात आयोडीनयुक्त साधारण मिठाचा वापर करणार असाल तर, तयार मिश्रण 2 ते 3 तास उन्हामध्ये ठेवा. त्यामुळे मिठातील आयोडीन निघून जाईल. मगच, हे मिश्रण दातांवर वापरा.
8) मोहरीचे तेल– केवळ मोहरीच्या तेलाच्या वापराने दातांचा पिवळेपणा दूर होतो. यासाठी, मोहरीच्या तेलाचे काही थेंब तुमच्या एका हाताच्या तळव्यावर घ्या. दुसर्या हाताच्या बोटाने तेल घेऊन दातांवर चोळा. लेखाच्या सुरुवातीला उल्लेख केलेले, तोंडाच्या स्वच्छतेसाठी केले जाणारे ‘Oil Pulling’ सुद्धा याने केले जाते.
तुम्ही ब्रश करतांना सर्व दातांवर पेस्ट आणि ब्रश फिरवता तसेच बोटानेही मोहरीचे तेल हळूहळू दातांवर, हिरड्यांवर फिरवा. 2 ते 3 मिनिटे तेल तसेच दातावर राहुद्या. त्यानंतर कोमट पाण्याने चूळ भरा.
यामुळे हळूहळू तुमच्या दातांचा पिवळेपणा दूर होईल. अशा प्रकारे नियमित मोहरीच्या तेलाने दातांवर मसाज केल्यास दात स्वच्छ, शुभ्र होतील. हिरड्या मजबूत होतील. हिरड्यांवर सूज असेल तर ती कमी होईल.
तुम्ही मोहरीच्या तेलाचा विविध प्रकारे वापर करून तुमच्या दातांचा पिवळेपणा घालवू शकता. याचा वापर जरूर करून पहा, तुम्हाला फायदा होईल.
मित्रहो, तुमच्या व्यक्तिमत्वाचा महत्वाचा पैलू म्हणजे तुमचे ‘हास्य’. हसताना व्यक्ति छान दिसते. मात्र, दातच जर पिवळे असतील तर मात्र हसण्याला अर्थ न राहता आपण दोषाचे धनी होतो. या लेखात सांगितलेल्या घरगुती उपायांचा वापर करा आणि पिवळ्या दातांना पांढरेशुभ्र करा.
हसत रहा आणि इतरांनाही हसवत रहा. लक्षात ठेवा, तुमचे खळखळून हसणे हेच आनंदी असण्याची पावती आहे.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
Very nice as usual