कोणाशी बरोबरी न करता स्वतः मधलं बेस्ट व्हर्जन विकसित करण्यासाठी हे वाचा

कसलीही बरोबरी करणे म्हणजे आपल्या आनंदावर विरजण टाकण्यासारखे आहे.. म्हणून अशी आंनदावर विरजण घालणारी तुलना करायची नाही, आपल्यातलं उत्तम व्हर्जन बाहेर काढणारी तुलना कशी करायची हे सांगणारा एक्सक्लुझिव्ह लेख महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसासाठी

अण्णा आणि नाना बालपणापासूनचे दोस्त.. दोघेही वयाची सत्तरी पार केलेले..

पण खरे तर त्यांना दोस्त म्हणणे म्हणजे जरा चुकीचेच..

आयुष्यभर एकमेकांना पाण्यात पाहिले..

आत्ताही सतत एकमेकांच्या घराची, बँक बॅलन्सची, मुलांच्या नोकऱ्यांची, सुनांच्या शिक्षणाची, नातवंडांच्या शाळेची बरोबरी चालू असते..

रिटायर्डमेंट नंतरही जीवाला शांतता नाही.. किती ती तगमग..??!!

अनेकांशी अशी बरोबरी करत स्वतःची किंमत ठरवणारे जसे असतात तसेच तुमची बरोबरी दुसऱ्यांशी करून तुमची किंमत ठरवणारेही असतात..

आयुष्यात केवढ्या चांगल्या चांगल्या स्पर्धा असतात.. त्यात यश संपादन करणे सोडून कुठून निर्माण होत असेल ही लोकांची किंमत ठरवण्याची विचित्र कॉम्पिटिशन..??

ह्याला जबाबदार कधी आपण स्वतः, कधी पालक, कधी आप्तेष्ट तर कधी समाज असतो.. बघा पटतंय का..!!

लहानपणी पालक सहजपणे बोलून जातात.. “बघ तो पिंट्या किती चांगले मार्क मिळवतो..” आणि तू..? नुसता दगड.. झाले.. आपली किंमत, पिंट्याच्या समोर दगडाची…

शाळेतल्या शिक्षिका म्हणून जातात, “रमेशला कळाले पण तुला कळत का नाही..?? अभ्यास न करता फक्त चित्र रंगवून तू रंगारी बनणार काय..?”

(थोडक्यात काय तर अभ्यासात रस नसेल आणि तुम्हाला कितीही उत्कृष्ट कला येत असतील तरी, तुमची किंमत मार्केट मध्ये शून्य..

मोठे होऊन पैसा कमावण्यास ना-लायक..!!)

कधी आप्तेष्ट येऊन खिजवून जातात.. आमच्या सोनीला परदेशातले स्थळ मिळाले.. तुमची कन्या इथेच का पार्ल्यातून अंधेरीत..??

(म्हणजे जणू काही भारतातले स्थळ म्हणजे काही किंमतच नाही..)

कधी ऑफिसातल्या मित्राला प्रोमोशन मिळाले तर आपणही स्वतःला कमी समजतो.. असे वाटते आपण काहीही करू शकणार नाही.. आपल्याला कोण किंमत देतो..??

असे सतत कोणाशी बरोबरी करत राहिले तर आपल्यातले फक्त दुर्गुणच दिसतात.. न्यूनगंड वाढतो..

कित्येक जण आपल्या कोशात जातात.. डिप्रेशनच्या अंधाऱ्या गुहेत हरवून जातात..

पण खरंच का स्वतःचे गुण पारखायला दुसऱ्यांशी तुलना करायला हवी..??

‘तुलना’ केल्याशिवाय खरे तर आपले आयुष्य पुढे जाऊ शकत नाही असे आपल्याला कायम वाटते.. पण हे खरे नाही..

कोणाशीही तुलना न करता आपले आयुष्य खूप सुंदर होऊ शकते.

आणि ही बरोबरी/ तुलना कशी टाळायला हवी हे शास्त्र शिकायला हवे..

तुलना कशी आणि कोणाबरोबर होतेय ह्यावर आपले यश आणि हारही अवलंबून असते..

कोणी दुःखाच्या गर्तेत जातो तर कोणी तुलनात्मक आयुष्यातून शिकून यशाचे शिखर पार करतो..

मात्र तुलना स्वतःची किंमत ठरवायला नसावी.. किंवा तुलना हव्यासापोटी नसावी..

मग कशासाठी तुलना करणे का टाळले पाहिजे..?? तुलना करायचीच तर स्वतःच्या व्यक्तिमत्वाला उंचीवर नेणारी हवी..

नाहीतर ह्या बरोबरीचा आपल्याला खूप त्रासच होतो..

कसलीही बरोबरी करणे म्हणजे आपल्या आनंदावर विरजण टाकण्यासारखे आहे.. कसे ते जाणून घेऊ:

१. बरोबरी The Best शी:

प्रत्येक गोष्टीत ‘The Best’ असतेच..

सहसा आपण ज्या क्षेत्रात चांगले काम करू शकतो.. आपण त्याच क्षेत्रातील ‘The best’ ची कॉपी करू पहातो..

जसे मला लिखाणाची अवघड आहे तर मी स्वतःला पु. लं. देशपांडे किंवा व. पु. काळे ह्यांच्या पंक्तीत कसे बसता येईल ते पाहणार.. हो की नाही..??

ही तुलना नैसर्गिक आहे.. पण ही अगदीच चुकीची देखील आहे..

जर आपण लेखक असू तर आपली स्वतःची वेगळी शैली असणार, हो ना..??

मग आपल्याच जुन्या लेखांबरोबर आपल्या नवीन लेखांची बरोबरी का होऊ शकत नाही..??

आपले काम जास्त प्रगल्भ कसे होईल यासाठी प्रयत्न जरूर करा.. मात्र कोणाशी तुलना करण्यापेक्षा स्वतःशीच तुलना करा..

२. दुसऱ्यांच्या स्वप्नांच्या मागे पळणे:

विराट कोहलीला आयुष्यात काय कमवायचे आहे..?? मी पण तसेच वागणार तसेच आयुष्य जगणार..

त्याची स्वप्न तीच माझी स्वप्न..

खरंच का तुमचे आयुष्य विराट कोहलीच्या आयुष्यासारखे बनणार आहे..??

त्याची जी स्वप्न आहेत तो त्या दिशेने काम करतो.. पण तुम्हाला पण तेच का हवे आहे आयुष्यात..??

आता विराट कोहली हे फक्त उदाहरण झाले. या ठिकाणी बरोबरी करण्यासाठी तुमचा सहकारी, शेजारी असं कोणीही असू शकतं.

म्हणजे दुसऱ्याने जे केले तेच मी करणार.. स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व असे विसरून कसे चालेल..??

तुम्ही दुसरा विराट कोहली बनलात तरी तुम्हाला डुप्लिकेट म्हटले जाईल. कारण ओरिजिनल ते ओरिजिनलच.

मग कशाला हवी आहे ही तुलना..?? तुम्हाला जे खरंच आवडते ते करा..

ती स्वप्ने जगा, त्या स्वप्नांची पूर्ती करा.. जमली नाही जमली तरी तुमची किंमत कमी होत नसते हे लक्षात ठेवा..

३. तुलना ही कधीच संपत नाही:

‘तुलना’ हा असा हावरट राक्षस आहे जो आपल्यातला सगळा आनंद खाऊन ढेकरही देत नाही..

हे म्हणजे रेड्याला पळवायला समोर लावलेले लाल कापड आहे.. आपण तुलना करत करत पळत राहतो मात्र तुलना संपूर्ण संपून आपण कुठेही थांबतच नाही..

लहानपणी तुलना करत शिक्षण पूर्ण करतो.. कोणाशी शॉपिंग/श्रीमंती मध्ये तुलना करत आयुष्यात गरजेचे नसतानाही खूप काही खरेदी करून बसतो..

सतत जे दुसऱ्याकडे आहे ते आपल्याकडे असावे म्हणूनच झटतो.. ह्यात आपण आयुष्य जगायचे सुद्धा विसरतो..

मार्क, कॉलेज, प्रोमोशन, घर, गाडी, मुलांच्या शाळा, मुलाची करिअर, फिरायचे ठिकाण, इन्व्हेस्टमेंट सगळे सगळे दुसऱ्याचे कॉपी करतो.. (आता हे तुलना न करण्याचं कसब काही जणांना जमलेलं असतं, आणि तेच सर्वांना जमवण्यासाठी हा लेख.)

मग ह्यात आपले असे काय उरते..?? आणि इतके कष्ट घेऊन आनंदही मिळत नाही तो निराळा..

त्यामुळे तुम्ही थांबा..!!
तुलना करायचे थांबवा..!!

१. तुलना करायची तर स्वतःच्या ‘जुना मी’ शी करा.. स्वतःला उत्तोरोत्तर अपडेट करा..

ज्ञानी माणसांच्या ज्ञानाशी तुलना जरूर करा.. आणि तुमच्या ज्ञानात भर घाला..

तुमचे आयुष्यात कामी येणारे स्किल्स डेव्हलप करा..

२. तुम्ही जुने आणि तुम्ही आत्ताचे ह्यात काहीच फरक नसेल तर तुमची वाढ खुंटलीये हे जाणून घ्या..

त्यामुळे स्वतःला स्वतःचेच बेस्ट व्हर्जन बनवण्याच्या मागे नक्की धावा.. कष्ट घ्या स्वतःला सुधारण्यामध्ये तेही कोणाशी तुलना न करता..

३. साधारण दर ३ महिन्यांनी तुमच्या मध्ये काही ना काही तरी सकारात्मक बदल झाला पाहिजे..

तुम्ही आयटी इंजिनिअर असाल तर नवीन टेक्नॉलॉजी शिकायला सुरुवात केली पाहिजे. तुम्ही कूक असाल तर नवीन डिश शोधली पाहिजे.

तुम्ही गायक असाल तर न जमणारा सूर पक्का करता आला पाहिजे. गृहिणी असाल तर एखादे अवघड कामाचे बेसिक फंडे समजून घेतले पाहिजेत..

असेच नवीन काही शिकत स्वतःला उत्तम बनवण्याच्या कधी न थांबणाऱ्या प्रवासाचे तिकीट काढा.. ज्यात तुलना फक्त आणि फक्त स्वतःशी असते..

मित्रांनो आपली प्रगती मग ती कितीही जलद असो वा संथ त्यावर स्वतःची किंमत ठरवा..

प्रगती होत आहे म्हणजे तुमची किंमत नक्कीच श्रेष्ठ होत आहे.. लक्षात ठेवा

‘तुलना’ नको कोणाशी
जी घाव घाली आनंदाच्या मुळाशी..
तुलना असावी स्वतःशी..
जी आत्मविश्वासाची नाळ जोडेल मनाशी..!!

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।