जाणून घ्या मोत्यांची शेती (pearl farming) या वेगळ्या व्यवसायाबद्दलची माहिती 

लेखाचे शीर्षक वाचून चकित झालात ना? ज्या मोत्यांची माळ स्त्रिया आवडीने घालतात त्यांची चक्क शेती करायची? आणि मुख्य म्हणजे ही शेती करण्यासाठी जास्त भांडवलाची गरज नाही.

सुरुवातीची गुंतवणूक फक्त पंचवीस हजार रुपये इतकी आहे आणि मिळणारा नफा मात्र सुमारे तीन लाख इतका असू शकतो. आहे की नाही फायद्याचा सौदा?

या व्यवसायाबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊया.

खरे म्हणजे बहुतेक सर्व व्यवसाय हे मोठ्या गुंतवणुकीतून सुरू होतात. परंतु मोत्यांची शेती हा असा एक व्यवसाय आहे ज्यात केवळ रुपये 25 हजार इतकी गुंतवणूक करून सुमारे तीन लाख इतका फायदा होऊ शकतो. त्याशिवाय या शेतीसाठी केंद्र सरकारकडून ५० टक्के सबसिडी मिळते.

आपल्याला या शेतीबद्दल फारशी माहिती नाही. परंतु आधुनिक काळात हा एक निराळा आणि भरपूर नफा कमवून देणारा व्यवसाय ठरला आहे.

मोत्यांची शेती करण्यासाठी काय आवश्यक आहे?

ही शेती करण्यासाठी अर्थातच एक मोठा तलाव आणि ज्यामध्ये मोती तयार होतात असे शिंपले (ऑयस्टर) यांची आवश्यकता असते. चांगल्या प्रतीचे ऑयस्टर मिळाले तर अर्थातच मोठी देखील चांगल्या प्रकारचे बनतात.

हा व्यवसाय करण्यासाठी कुशल प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण देखील दिले जाते तसेच केंद्र सरकार हा व्यवसाय करू इच्छिणार्‍या लोकांना ५० टक्के सबसिडी देऊन प्रोत्साहित करत आहे. दक्षिण भारत आणि बिहारमधील दरभंगा येथील ऑयस्टरची कॉलिटी अत्यंत उत्तम असते.

मोत्यांची शेती नक्की कशी करतात?

मोत्यांची शेती सुरू करण्याआधी त्या व्यावसायिकाने ही शेती करण्याचे संपूर्ण प्रशिक्षण घेणे अतिशय आवश्यक आहे. अनेक संस्था असे प्रशिक्षण विनामोबदला देत आहेत. कुशल प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण घेतल्यामुळे अतिशय उत्तम क्वालिटीचे मोती तयार करता येणे शक्य होते आणि अर्थातच त्यामुळे नफ्याची रक्कम वाढते.

मोत्यांच्या शेतीची सुरुवात करताना सरकारी केंद्रातून किंवा असे काम करणाऱ्या मच्छीमारांकडून चांगल्या प्रतीचे ऑयस्टर खरेदी करून ते आपल्या तलावात सोडावेत.

हे ऑयस्टर तलावातील पाण्यात दोन दिवस ठेवले जातात. त्यामुळे त्या शिंपल्यांचे कवच थोडे उघडले जाते. तसेच त्यातील मांसपेशी सैल होतात. मग त्या शिंपल्यामध्ये हव्या त्या आकाराचा मोत्याचा साचा टाकला जातो.

जेव्हा तो साचा शिंपल्यातील मांसपेशीला टोचतो तेव्हा मांसपेशीमधील द्रव साच्याचा आकार धारण करते आणि मोती तयार होतो. अशा पद्धतीने वेगवेगळे साचे वापरुन हव्या त्या आकाराचे मोती तयार करणे शक्य होते.

प्रत्येक ऑयस्टरमध्ये साधारणपणे दोन मोती तयार होतात. असे वेगवेगळ्या आकाराचे आणि उत्तम क्वालिटीचे मोती चांगल्या किमतीला विकले जातात. एक एकर तलावाच्या पाण्यात साधारणपणे पंचवीस हजार ऑयस्टर वापरून मोत्यांची शेती करता येते. त्यामुळे हा कमी गुंतवणुकीत भरपूर नफा कमवून देणारा व्यवसाय ठरतो. केंद्र सरकारकडून तसेच स्थानिक संस्थांकडून भरपूर मदत मिळत असल्यामुळे हा व्यवसाय करणे सोपे झाले आहे.

आर्थिक सवलत आणि कुशल प्रशिक्षण सहज उपलब्ध असल्यामुळे हा व्यवसाय करणाऱ्यांचे प्रमाण वाढते आहे. तुम्ही हा निराळा व्यवसाय करण्याबाबत विचार करा. तुमच्या नातेवाईक आणि मित्रमंडळींना देखील या व्यवसायाची माहिती द्या आणि या बाबतचे तुमचे अनुभव आम्हाला कळवायला विसरू नका.

Image Credit : Shivar News

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।