स्वार्थाने भरलेल्या या जगात
मी का शोधत होते आसरा,
हे माझे मलाच कळले नाही….
विना ताला, सुरांचं जीवन
विरान वाळवंटच असत,
हे माझे मलाच कळले नाही…
बेधुंद आणि बेफाम होऊन आपण एका
पत्थर दिलावर प्रेम करतोय,
हे माझे मलाच कळले नाही…
नावाड्या जरी नाव चालवितो
तरी किनारा आपणच शोधायचा असतो,
हे माझे मलाच कळले नाही…
उगाच फिरतो आपण चांगल्या
माणसांच्या शोधात
आपणचं चांगले होऊ शकतो,
हे माझे मलाच कळले नाही…
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
माझी कविता पहिल्यांदाच इथे प्रसिद्ध झाल्यानंतर औरंगाबादच्या उद्योगमित्र मासिकात कविता पुन्हा प्रकाशित झाली .. धन्यवाद मनाचे Talks खूप आनंद होत आहे.
अभिनंदन विजयमाला .. आणि पुढच्या लेखनासाठी शुभेच्छा.
मनापासून धन्यवाद… नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.