इवल्याशा वादळाने
ढासळावे का डोंगराने?
येतात कैक, जातात कैक
असतो स्थिर तो संयमाने
जगावे आपण ही त्या सम
तमा सोडूनी वादळाची
येईल वादळ, खेटेल तुफान
आपण का डगमगावे
वेली सम स्थिर असावे रोवूनी पाय
नजर ठेवूनी गगनी अन्
सांगावे वादळास ठणकावून
“कर हवे तेवढे वार…
मानणार ना तरी कधी मी हार..”
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.