एखादे चांगले काम केल्यानंतर मिळणारी मनःशांती तुम्ही अनुभवली आहे का?
एखाद्याला मदत केल्यानंतर होणारा आनंद, वाटणारे समाधान अनुभवले आहे का?
तुम्ही आधी केलेल्या चांगल्या कामांची आठवण येऊन तुम्हाला उत्साही वाटते ना, अधिक चांगले काम करण्याची उर्मी मनात दाटून येते ना,
आम्हाला खात्री आहे की ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे होकारार्थी असणार आहेत आणि हयामागे अर्थातच शास्त्रीय कारणे आहेत.
माणसाने चांगली कामे करणे समाजाच्या हिताचे तर आहेच पण स्वतःलाही ते फायद्याचे कसे ठरते हे शास्त्रीयदृष्ट्या पाहणार आहोत.
१. चांगली कामे करण्यामुळे ताण/ स्ट्रेस दूर होतो
स्वयंस्फूर्तीने एखादे काम करण्यामुळे मनावरचा ताण दूर होतो. कोणा गरजू व्यक्तीला मदत केली की आपल्याला आपल्या चिंता विसरून जायला मदत होते.
एका सर्वे मध्ये केलेल्या अभ्यासात हे सिद्ध झाले आहे. अशा चांगल्या कामांमुळे उच्च रक्तदाब कमी होण्यास मदत होते. स्ट्रेस कमी झाल्यामुळे अर्थातच आपले जीवन आनंदी बनते.
२. चांगली कामे करण्यामुळे आयुष्य वाढते
होय, हे खरे आहे, हे केवळ म्हणायचे म्हणून म्हणलेले वाक्य नाही, तर शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासातून हे सिद्ध झाले आहे की चांगली कामे करण्यामुळे, उदारपणे गरजू व्यक्तींना दान करण्यामुळे आपले आयुष्य अधिक आनंदी बनते आणि वाढते.
जवळच्या मित्रांना, नातेवाईकांना छोट्या छोट्या कामांत मदत करण्यामुळे देखील आपल्या मनावरील ताण दूर होतो आणि पर्यायाने आपले आयुष्य वाढते.
३. चांगली कामे करण्यामुळे फ्रेश/उत्साही वाटते
एखादे चांगले काम केल्यानंतर जो उत्साह वाटतो तो खरंतर मेंदुतून स्त्रवल्या गेलेल्या एंडोरफीन ह्या केमिकल मुळे असतो.
एखादे चांगले काम केले की मेंदू उत्तेजित होतो आणि एंडोरफीन हे केमिकल निर्माण करतो.
त्यामुळे एक प्रकारची चांगली झिंग मनावर चढते आणि अतिशय उत्साही वाटते. आणखी चांगले काम करण्याची प्रेरणा मिळते.
४. चांगली कामे करण्यामुळे नोकरी/व्यवसायात देखील उत्साह वाढतो
एका सर्वे मध्ये असे आढळून आले आहे की वैयक्तिक आयुष्यात चांगली कामे करणारे लोक कामाच्या ठिकाणी देखील अधिक चांगल्या प्रकारे काम करू शकतात.
आपापल्या नोकरी, व्यवसायात ते अधिक एकाग्रतेने आणि आनंदाने काम करू शकतात.
५. चांगली कामे करण्यामुळे मानसिक आरोग्य सुधारते
रिसर्च नंतर असे आढळून आले आहे की चांगली कामे करणारे, परोपकारी लोक मानसिक दृष्ट्या जास्त सुदृढ आहेत.
इतरांसाठी चांगले काम केले की आपल्या मनाला मिळणाऱ्या शांततेमुळे मानसिक स्वास्थ्य टिकून राहण्यास मदत होते. नैराश्य टाळणे शक्य होते.
६. चांगली कामे करण्यामुळे वृत्ती आनंदी बनते
ज्या व्यक्ति इतरांसाठी चांगली कामे करत असतात, परोपकार करत असतात त्यांची चित्तवृत्ति अतिशय आनंदी आणि समाधानी असते.
ते सतत सगळीकडे आनंद पसरवत असतात. दुःख, नैराश्य ह्याचा त्यांना त्रास होत नाही.
७. चांगली कामे करण्यामुळे आणखी चांगली कामे करण्यासाठी प्रेरणा मिळते
मानसशास्त्राच्या अभ्यासकांनी हे सिद्ध केले आहे की एकदा का एखाद्या व्यक्तीला चांगले काम करण्यातला आनंद लक्षात आला की ती व्यक्ति वारंवार अशी चांगली कामे करण्यासाठी प्रेरित होते.
आपण आधी केलेल्या चांगल्या कामांच्या आठवणी माणसाला आनंदी बनवून आणखी चांगले काम करण्यासाठी प्रवृत्त करतात.
तर अशा प्रकारे हे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झाले आहे की चांगली कामे करण्यामुळे, परोपकार करण्यामुळे, इतरांना आवश्यक ती मदत करण्यामुळे केवळ त्या सर्व गरजूंनाच नव्हे तर आपल्यालाही शारीरिक मानसिक दृष्ट्या खूप फायदा होतो.
केवळ स्वतःचा विचार न करता समाजाच्या भल्याचा विचार केला असता समाजाची उन्नती तर होतेच परंतु स्वतःची देखील उन्नती साध्य करता येते. स्वस्थ आनंदी दीर्घायुष्य जगण्याची संधि प्राप्त होते.
तर मग मित्रांनो आजच नेहेमी चांगली कामे करण्याचा संकल्प करा आणि निरोगी आनंदी आयुष्य जगा.
बरं मग जाता जाता आत्ताच एक चांगलं काम करायचं… ते म्हणजे, हा लेख प्रत्येकाने ‘न चुकता’ शेअर करायचा…
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.