ता.क.- हि राजकारणाने प्रेरित होऊन केलेली पोस्ट नाही. वाचक माहितीसाठी हे वाचू शकता.
मुद्रा कर्ज घेण्याची पद्धत
मुद्रा कर्ज काढण्यासाठी अर्जदाराला प्रथम आपल्या व्यवसायाच्या परिघातील १० किलोमीटर असलेल्या आणि मुद्रा कर्ज योजनेत सहभागी असलेल्या बँकेत स्वतः भेट देऊन आपल्या व्यवसायाचा आराखडा, ओळख पत्र, निवासाचा दाखला, पासपोर्ट साईझ फोटो हे सारे मुद्रा कर्जाच्या अर्जाबरोबर जमा करणे बंधनकारक आहे. कागदपत्रांच्या पूर्ततेनंतर बँकेकडून व्यवसायाची आणि जमा केलेल्या दाखल्यांची (KYC) छाननी करून नियमात बसत असल्यास कर्ज मंजूर केले जाते. मुद्रा कर्जाचे तीन प्रकार मागील लेखात सांगितलेले आहेत.
मुद्रा – प्रमुख वैशिष्ट्ये
१) सूक्ष्म उद्योग विकास आणि पुनर्वित्त एजन्सी लि. Micro unit development & refinance agency ltd. (मुद्रा) या नावाने ओळखली जाणारी हि भारत सरकारची योजना छोट्या व्यवसायांच्या उभारणी आणि वृद्धीसाठी आहे, तर थेट वित्तीय संस्था नाही.
२) मुद्रा हे एक सामान्य व्यासपीठ आहे जेथे बँका, आरआरबी, एमएफआय, एनबीएफसीसारख्या वित्तीय संस्था सूक्ष्म व लघु उद्योगांची स्थापना करण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना मदत करू शकतात.
3) वित्त वर्ष 2016 च्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकाच्या बजेट दरम्यान, अर्थमंत्रालयाने घोषित केलेली
मुद्रा ही सरकारी योजना अर्थात प्रधान मंत्री मुद्रा योजनेअंतर्गत अर्जदार आपल्या लहान आणि लघु उद्योगांसाठी कर्जासाठी अर्ज करू शकतात.
४) मुद्रा केवळ कॉर्पोरेट नसलेल्या लहान व्यवसाय विभागांकरिता आर्थिक आधार प्रदान करेल. या विभागांत एकमेव मालक, पार्टनरशिप फर्म, उत्पादक, यंत्रसामग्री व्यवसाय असू शकतात.
मुद्रा आमचे ध्येय
५) मुद्रा उभारण्याचे मुख्य उद्दिष्ट हे गैर-कॉर्पोरेट लघु उद्योगांना आर्थिक मदत देणे हा आहे. भारत सरकारने सुरुवातीस आणि छोट्या व्यवसायांसाठी आर्थिक आणि तांत्रिक सहाय्य प्रदान करणार्या अनेक योजना आधीच सुरू केल्या आहेत. मुद्रा देशाच्या सूक्ष्म उद्योगांना समर्थन करण्याचा एक मार्ग आहे.
६) मुद्रा योजना प्रामुख्याने अन्न सेवा, कारागीर, विक्रेते आणि शहरी व ग्रामीण भागातील असंघटित क्षेत्रातील उद्योगांसाठी वरदान ठरणारी आहे.
कुठले व्यवसाय प्रामुख्याने मुद्रा कर्ज घेऊ शकतात.
अन्न सेवा युनिटस्, ट्रक ऑपरेटर, भाज्या व फळे विक्रेते, दुरूस्तीची दुकाने, फॅशन स्टोअर, कारागीर, लहान उद्योग, फूड प्रोसेसिंग युनिट्स, दुकानदार, सेवा क्षेत्र युनिट्स, केटरर्स , सुतारकाम, आरओ वॉटर प्युरिफायर यासारखे उद्योग मुद्रा योजनेसाठी पात्र आहेत.
मुद्रा कर्जासाठी पात्रता
प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत मुद्रा कर्ज घेण्याकरिता अर्जदाराला पात्रतेचे निकष पाळणे आवश्यक आहे. ते खालील प्रमाणे नियम आहेत:
अर्जदारास 18 वर्षे वयाचा एक भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे आणि दाखविण्यासाठी व्यवसाय योजना असणे आवश्यक आहे. व्यवसायाच्या योजनेमध्ये रचना, गुंतवणूक योजना, उत्पादनाचे स्वरूप, विपणन आणि भविष्यातील परिणाम हे सविस्तर देणे आवश्यक आहे.या योजनेत बिगर शेती उद्योगांचाच समावेश केलेला आहे.
वाचकांना काही शंका असल्यास लेखाखाली अभिप्राय स्वागतार्ह आहेत. तसेच मनाचेTalks च्या फेसबुक पेजवर सुद्धा आपले शंकासमाधान केले जाईल.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
thanks chetan 🙂
तरूण श्रेणी मधे कर्ज पाहिजे