जाणून घ्या नशीब पालटवून टाकणाऱ्या सात युक्त्या 

आपण फारच कमनशिबी आहोत असे तुम्हाला वाटते का? आपण जे काही काम करू त्यात आपल्याला दैवाची साथ मिळत नाही, आपले नशीब आडवे येते अशी तुमची भावना आहे का?

जर असे असेल तर हा लेख तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. आज आम्ही तुम्हाला नशीब पालटवून टाकणाऱ्या सात युक्त्या सांगणार आहोत. त्यानंतर तुमचा नशिबाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून जाईल.

आपले नशीब सुधारण्यासाठी आपला नशिबाकडे बघण्याचा दृष्टिकोन, स्वतःवरील विश्वास आणि जीवनाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी यांची गरज असते.

हे सगळे नीट पटण्यासाठी लेख पूर्ण वाचा, पॉईंट्स चे हेडिंग वाचून, “हे तर मला कळते, यात काय नवीन!” असे करून नका. म्हणजे लेख संपेपर्यंत तुम्हाला एक अनमोल खजिना मिळाल्याचा अनुभव होईल.

चांगले नशीब म्हणजे केवळ भरपूर धनसंपत्ती, ऐशोआराम असे नसून चांगले सकारात्मक आयुष्य, आजूबाजूला भरपूर आनंदी माणसे असणे म्हणजे चांगले नशीब असते.

चला तर मग आपण त्या सात युक्त्या जाणून घेऊया

१. प्रयत्न करत रहा

“प्रयत्न करणाऱ्यालाच नशिबाची साथ मिळते“. जीवनामध्ये यश मिळवण्यासाठी सतत प्रयत्न करत राहा.

असे प्रयत्न करणाऱ्यांना वेळोवेळी चालून आलेल्या संधीचा लाभ घेता येतो. जर आपली आलेल्या संधीचा लाभ उठवण्यासाठी काहीच तयारी नसेल तर ती संधी वाया जाणार.

आणि आपण स्वतःला कमनशिबी ठरवणार. परंतु आपण जर सतत प्रयत्न करत राहिलो आणि आलेल्या संधीचा सकारात्मक दृष्टीने लाभ घेतला तर आपण नक्कीच यशस्वी होऊ शकू आणि स्वतःला नशीबवान समजू.

त्यासाठी सतत पुढाकार घेऊन प्रयत्न करत राहणे गरजेचे आहे.

२. चांगल्या माणसांच्या संपर्कात राहा 

असे म्हटले जाते की रूढार्थाने पैसा, दागदागिने, जमीनजुमला या संपत्तीपेक्षा देखील माणसाने जोडलेली खरी नाती, चांगली मित्रमंडळी यांची साथ हीच खरी संपत्ती असते.

तेच लोक नशीबवान समजले जातात ज्यांचा जनसंपर्क भरपूर मोठा असतो. त्यांचे सर्व नातेवाईक, मित्रमंडळी, नोकरी – व्यवसायातील सहकारी या सर्वांशी अतिशय चांगले संबंध असतात.

अशा लोकांशी चांगले संबंध असल्यामुळे अर्थातच गरजेच्या वेळी हे लोक त्यांना वेळेत मदत करतात. यालाच आपण नशिबाची साथ असे देखील म्हणू शकतो.

३. स्वतःच्या आतल्या आवाजावर विश्वास ठेवा.

बहुतेक वेळा आपण जे निर्णय घेत असतो ते योग्य आहेत किंवा नाही हे आपले मन आपल्याला सांगत असते.

नशीबवान लोक आपल्या मनाचे ऐकतात, आपल्या आतील आवाज आपल्या एखाद्या निर्णयाबद्दल तो योग्य आहे अथवा नाही हे सांगत असताना असे लोक त्यावर जरूर विश्वास ठेवतात.

जेव्हा जेव्हा एखादा निर्णय योग्य आहे की नाही अशी शंका तुमच्या मनात येईल तेव्हा पाच मिनिटे शांत बसा सर्व परिस्थितीचा नीट विचार करून तुमचे मन जो निर्णय घेईल तो ऐका.

इतर कोणीही दिलेल्या सल्ला पेक्षा स्वतःच्या मनाने दिलेला सल्ला जास्त प्रभावी आणि खरा असतो.

नंतर असा निर्णय योग्य ठरला की आपल्याला नशिबाची साथ होती हे आपल्या लक्षात येते.

४. संकटाच्या किंवा अडचणीच्या वेळी शांत राहायला शिका 

जेव्हा परिस्थिती आपल्या विरुद्ध असते आणि आपण अडचणीत अडकलेले असतो तेव्हा काळजी वाटणे, अस्वस्थता येणे अगदी सहाजिक आहे. आणि अशा वेळी मात्र जवळची वाटणारी मंडळी साथ देत नाहीत, याचाच याचाच अनुभव सगळे घेतात.

परंतु अशा वेळी अस्वस्थ होऊन चिडचिड करण्यापेक्षा प्रयत्नपूर्वक शांत राहायला शिका.

आपण तेव्हाच नशीबवान ठरू जेव्हा अडचणीच्या वेळी देखील शांत राहून आपण उपलब्ध असणाऱ्या संधीचा लाभ घेऊ शकू.

एखादे अपयश जरी आले असेल तरी त्याचा आपल्यातील चुका सुधारण्यासाठी उपयोग करून घेऊन पुढे येऊ शकणाऱ्या नव्या संधीचा लाभ घ्या. त्यामुळे तुम्ही खरे नशीबवान ठरणार आहात.

५. जुन्या पद्धतींना कवटाळून न बसता आधुनिकीकरणाचा स्वीकार करा 

आपल्या अवतीभवतीचे जग झपाट्याने बदलते आहे. अशावेळी जुन्या संकल्पनांना किंवा जुन्या कार्यप्रणालीला चिकटून न राहता समोर दिसणाऱ्या आधुनिक संधींचा लाभ जरूर घ्या.

नोकरी किंवा व्यवसायात यश मिळवण्यासाठी नवनवीन कल्पना आणि त्या राबवण्याच्या नव्या पद्धती यांची माहिती करून घेऊन त्या अमलात आणा.

जुन्या त्याच त्याच पद्धतींचा अवलंब करून मर्यादित यश मिळवण्यापेक्षा नव्या संधीचा वापर करून टक्केटोणपे खात का होईना जास्त यश मिळवण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी आपल्या मित्रमंडळींचा, सहकार्‍यांचा सल्ला जरूर घ्या. यामुळेच तुम्ही नशीबवान ठराल.

६. सतत सकारात्मक विचार करा

कोणतेही काम करत असताना मी हे काम नक्की पूर्ण करू शकेन, मला या कामात खूप यश मिळेल असाच सकारात्मक विचार करत रहा. सकारात्मक विचार करण्यामुळे काम करायला एक प्रकारचा उत्साह येतो तसेच काम पूर्ण करण्यासाठी वेगवेगळे मार्ग देखील सापडतात.

“माझ्या बाबतीत काही चांगले कधी घडतच नाही“ असा नकारात्मक विचार न करता उलट, “मी माझ्या बाबतीत सर्व काही चांगले घडवून दाखवीन“ असा आत्मविश्वासपूर्ण सकारात्मक विचार करा.

त्यामुळे यश मिळवण्यासाठी तुम्ही शंभर टक्के प्रयत्न करू शकाल आणि यश मिळाले की आपल्याला नशिबाची साथ मिळाली असेच तुम्हाला वाटेल.

७. सतत नवीन काहीतरी शिकत राहा

“माणूस हा आजन्म विद्यार्थी असतो“ असे म्हटले जाते. याचा अर्थ आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आपल्याला वेगवेगळ्या नव्या गोष्टी शिकण्याची संधी मिळत असते, ती संधी आपण जरूर साधली पाहिजे.

नवनव्या गोष्टी शिकून त्यांचा वापर करून आपल्या सध्याच्या कामात सुधारणा कशी करता येईल याकडे आपण लक्ष पुरवले पाहिजे.

असे केल्यामुळे आपल्यासमोर प्रगतीचे नवे मार्ग सतत खुलत राहतात. शाळा कॉलेजमधून घेण्याचे शिक्षण जरी पूर्ण झाले असले तरी त्या नंतर देखील आयुष्यभर आपण नव्या गोष्टी शिकू शकतो हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

अशा नवीन गोष्टींमुळे आयुष्यातील एकसुरीपणा, तोच तोच पणा निघून जातो आणि काम करण्यासाठी नवी ऊर्जा मिळते. तसेच हातातले काम झपाट्याने पूर्ण करून नवे काम शिकण्याची उत्सुकता वाढते. आपले नशीब पालटले असे आपल्याला वाटते.

तर मित्र मैत्रिणींनो, या आहेत अशा सात युक्त्या ज्यांचा वापर करू आपण आपले नशीब बदलू शकतो.

मी कमनशीबी आहे असे म्हणून सतत दैवाला दोष देण्यापेक्षा अशा पद्धतीच्या युक्त्या वापरून स्वतः प्रयत्न करून तुम्ही तुमचे नशीब घडवू शकता.

त्यामुळे तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल तर होतीलच, शिवाय तुमच्या आजूबाजूच्या लोकांच्या आयुष्यात देखील आनंद निर्माण होईल.

या बाबतीतले तुमचे विचार आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हा लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी शेअर करायला विसरू नका.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

1 thought on “जाणून घ्या नशीब पालटवून टाकणाऱ्या सात युक्त्या ”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।