अजोबा आणि नातू हे समीकरण फार जुनं आहे. ‘जुनं ते सोनं’ हे निश्चितच नातवास कळत असावं. आई वडिलांना कामाच्या व्यापामुळे कदाचित वेळ देता येत नसेल. पण नातवाचा वेळ अजोबासाठी व अजोबाचा वेळ नावासाठी नेहमीच राखीव असतो.
जेव्हा वय जसं जसं झुकायला लागतं, तेव्हा अजोबाचं बाप म्हणून महत्त्व संपतं. अजोबा होऊन नातवासाठी उरलेलं अख्ख आयुष्य बागडत असतं. वय मान-पान व अहंकार सोडून अजोबा बालपण स्वीकारत असतो. अजोबा आणि नातू हे मित्र बनून जातात. अजोबाची काठी, अजोबाचा चष्मा, अजोबाचा श्वास म्हणजे नातू. फिरायला जायचं अजोबा सोबत. कामात अडथळा निर्माण करणारं मुल व निकामी झालेले वडील कर्त्या पिढीचे अडथळे बनतात. त्यांच्याविषयी मुलांमध्ये त्याच्याविषयी अपसूक अनस्था निर्माण होत राहते.
बालपणापासूनचं आयुष्य घडवण्यासाठी बापाने घेतलेले सारे कष्ट विसरायला लागतात. अपंग बाप, बिमार आई-बाप आणि थकलेले आई-बाप आश्रमाकडे सुपूर्द केले जातात. नातवाची व अजोबाची गट्टी तुटल्या जाते. अविवेकी मुलगा बाईल विचारातून बायकोचा गुलाम बनतो.
क्षणात जन्मापासून आई – वडिलांशी असलेली घट्ट नात्याची नाळ एका मिनिटात तोडून टाकतो. आई- बाप आश्रमात जावून पोरकेपणाचे जीवन कंठत असतात. भुतकाळ आठवत सारे जीवनातील चांगल्या कर्माचे वाईट ओझे सहण करत. कोणताच गुन्हा न करताही विचाराचे ओझे घेऊन आई-वडील विकाराने पाछाडतात आणि आश्रमरूपी तुरूंगात कैदी बनून राहातात.
हे सारं बारकाईने नातू टिपत असतो. आजोबासारखा मित्र तुटतो. या बंदडोर संस्कृतीत अजोबासारखा दुसरा मित्र त्यास खेळण्यासाठी मुळीच नसतो व मिळत ही नाही. तो एकटा आजी-अजोबाच्या अठवणीने झुरत असतो.
एकदा शाळेत त्याच्या वर्गात ‘आपल्या आवडत्या व्यक्ती’ निबंध दिला जातो. तो अजोबावर भरभरून लिहितो. आणि तो सुंदर प्रभावी ठरतो. विचार करावयास प्रवृत्त करतो. नातवास प्रिय असलेला अजोबा वडिलास कसा अप्रिय होतो? हेच मुख्य गुपित आजपर्यंत कोणासही कळत कसे नाही? हा प्रश्न मुख्य प्रश्न बनून वैचारिक पातळीवर चर्चिला जातो. उकल कधीच होत नाही.
पुन्हा एकदा वर्गात सर्वांना एक सुंदर प्रतिकृती बनवून आणायला सांगितले जाते. कोणी मंदिर, कोणी ताजमहाल, कोणी किल्ला, कोणी शाळा अशा सुंदर प्रतिकृती बनवतात. हा नातू मात्र स्वकल्पित एक सुंदर स्वप्नातलं घर बनवतो. हा त्या कृतीत इतका मश्गुल असतो की शेवटच्या टप्प्यातील सजावटीत त्यास शाळेत जाण्यासाठी वेळ लक्षात येत नाही. त्यास शाळेत जाण्याची आठवण सुध्दा राहात नाही.
शाळेतून फोन येतो तुमचा मुलगा शाळेत आलेला नाही. आज प्रोजेक्टचा शेवटचा दिवस तो सादर ही केलेला नाही. आई वडील ऑफिसला कामावर जाता जाता मुलाला सोडण्यासाठी त्याच्या सोबत शाळेत जातात.
आई वडिल त्यास घाईघाईत शाळेत घेऊन जातात. गेल्या गेल्याच यांच्या प्रोजेक्टच्या सादरीकरणाचं अनाऊन्सिंग होतं.
आई वडीला विचार करतात, ‘कार्यालयात जाण्यासाठी वेळ झाला तरी चालेल पण मुलांचं सादरीकरण ऐकूनच जाऊ म्हणून दोघे थांबतात’. बनवलेल्या सुंदर प्रतिकृती तो सादर करत असतो. तो त्या कृतीस नाव देतो ‘सुंदर घराचं माझं स्वप्न’. हाॅल, किचन, ऑफिस अशी एक एक माहिती तो सांगत असतो. शेवटी एका सुंदर रुमचे माहिती व वैशिष्ट्ये सांगतो. त्या अत्याधुनिक रूम माझ्यासाठी नसून फक्त माझ्या आजी-अजोबासाठी असेल येवढे सांगतो. अन् त्याचं सुंदर सादरीकरण संपवतो.
परिक्षक त्यास प्रश्न विचारतात, तुझ्या बंगल्याच्या शेजारी वेगवेगळे हाॅल दाखवले आहेस. खुप झाडे आणि मोठे पटांगण हा विस्तृत भाग कशासाठी आहे? त्यावर त्या चौथीतल्या मुलाने उत्तर दिलं, ‘मी आणि माझे अजोबा खुप चांगले मित्र पण आजी-अजोबास वृध्दाश्रमात जावे लागले. मला घरी एकट्यास अजोबा नसल्याने खुप कंटाळवाणे वाटायला लागले. आजी – अजोबास घरी आणण्यासाठी मी ही वरची सुंदर रुम बनवली. बंगल्या शेजारच्या जागेत मी एक वृध्दाश्रम बनवणार आहे. त्यामुळे माझ्या आईव-डिलांना आजी-अजोबासारखे दुर जावे लागणार नाही. ते घराच्या शेजारी व जवळच माझ्या देखरेखीतच राहतील.’
कार्यक्रमातील सर्वांनी त्या छोट्याश्या मुलासाठी खुप टाळ्या वाजवल्या व तोंडभरून कौतुक केल. कामावर जाता जाता त्यास सोडावयास आलेले आई – वडिल खजिल झाले.
त्यांना त्यांच्या चुकीचा खुप पश्चाताप झाला. त्यांच्या डोळ्यातून अश्रूंचे महापूर वाहू लागले. मुलाच्या निर्विकार निर्मळ सात्विक भावनेने त्यांचे डोळे कायमचे उघडले.
आफिसात कामावर जावयाचे सोडून ते आई वडीलांना घरी आणण्यासाठी वृध्दाश्रमात गेले. आई वडिलांना माफी मागून त्यांना घरी घेऊन आले.
त्याचं बोलनं सहजच होतं पण आई वडीलांना व सर्वांना संदेश देणारं लहान मनाचं भावविश्व वाटलं. ते सर्वांना मनातून भावलं, मनातून हेलावलं. जे घडलं ते निर्मल आणि निर्विकार होतं. त्याच्या आई – वडिलांच्या कर्माची बोच त्यांना मान खाली घालायला लावणारी होती. अनेक प्रवचने ऐकून बोध झाला नसताना पण मुलाने झणझणीतणे आई – बापाचे डोळे उघडले होते. आजी अजोबापासून नातवास तोडणार्या सर्व आई-बापास हा बोध आत्मपरीक्षण करायला लावणारा होता हे निश्चितच..
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी किंवा तुमचे स्वतःचे लेखन मनाचेTalks वर प्रकाशित करण्याची इच्छा असल्यास येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.