पुणेकर मराठी मुलगी ‘नेहा नारखेडेने’ अमेरिकेत रोवला यशाचा झेंडा

२४ जूनला अमेरिकेत एक सनसनाटी घटना घडली. कॅलिफोर्नियातील ‘कॉन्फ्लूएन्ट’ नावाची कंपनी तेथील नॅस्डॅक ह्या शेअर बाजारात दाखल झाली. कंपनीचा १ शेअर ३६ डॉलरला ओपन केला गेला. पहिल्याच दिवशी ह्या आयपीओ द्वारे ८२८ मिलियन डॉलर म्हणजेच ८२८ दशलक्ष डॉलर इतकी संपत्ती उभी राहिली.

हा एक विक्रमच म्हणावा लागेल. पदार्पणातच एखाद्या कंपनीने इतके यश मिळवणे अगदी कौतुकास्पद आहे.

महत्वाचे म्हणजे ह्या यशाचा झेंडा अमेरिकेत रोवणारी मुलगी आहे पुण्याची ‘नेहा नारखेडे’.

कॉन्फ्लूएन्ट कंपनीची सहसंस्थापक असणारी नेहा नारखेडे एक मराठमोळी मुलगी आहे. एका साध्या मध्यमवर्गीय कुटुंबातील असणारी पुण्याची नेहा शिक्षणासाठी अमेरिकेला गेली आणि तिने हे उत्तुंग यश मिळवले.

आज आपण तिची यशोगाथा जाणून घेऊया.

शिक्षणासाठी पुण्याहून अमेरिकेला 

अगदी ८ व्या वर्षापासून कम्प्युटर हाताळायला शिकलेल्या नेहाने तंत्रज्ञान क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्याचे ठरवले. २००६ मध्ये पदवी प्राप्त करून कम्प्युटर सायन्स मधील पदव्युत्तर पदवी मिळवण्यासाठी तिने अमेरिकेतील जॉर्जिया युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेतला.

लिंक्डइन कंपनीमध्ये निवड

युनिव्हर्सिटीमधील चमकदार कामगिरीमुळे तिची आधी ओरॅकल आणि नंतर लिंक्डइन ह्या कंपनीमध्ये निवड झाली. तेथे काम करताना लिंक्डइन वर प्रचंड प्रमाणात येणारे मेसेज, नेटवर्क रिक्वेस्ट आणि प्रोफाइल व्यूज मॅनेज करताना हे काम सोपं व्हावं ह्यादृष्टीने तिने एक सॉफ्टवेअर डेव्हलप केले.

त्याच कंपनीत काम करणारे सहकारी जय क्रेप्स आणि जून राव ह्यांच्या मदतीने नेहाने क्लाऊड तंत्रज्ञानावर आधारित एक टेक्निकल प्रणाली विकसित केली.

कॉन्फ्लुएन्ट कंपनी स्थापन केली 

इतरही मोठ्या कंपन्याना ह्या सॉफ्टवेअरची गरज भासू शकते असे वाटल्यामुळे त्यांनी ओपन सोर्स सॉफ्टवेअर डेव्हलप केले. त्यातून पुढे २०१४ मध्ये त्या तिघांनी मिळून कॉन्फ्लूएन्ट नावाची कंपनी स्थापन केली.

नेहा त्या कंपनीची चीफ टेक्नॉलजी ऑफिसर आहे.

फॉर्ब्सच्या यादीत समावेश 

२०१९ मध्ये फोर्ब्सने प्रसारित केलेल्या ‘अमेरिकेतील स्वकर्तृत्वावर श्रीमंत झालेल्या महिला’ ह्या यादीत नेहाच्या नावाचा समावेश केला गेला होता. तेव्हा नेहा लक्षाधीश होती. आता कंपनी शेअर बाजारात देखील उतरल्यामुळे नेहा अब्जाधीश होण्याच्या वाटेवर आहे.

मुलींना प्रेरणा 

एरवी पुरूषांचे वर्चस्व मानले जाणाऱ्या तंत्रज्ञान क्षेत्रात एव्हढे उत्तुंग यश मिळवणारी नेहा हे भारतातील मुली व महिला ह्यांच्यापुढे एक आदर्श व्यक्तिमत्व आहे. तिच्याकडून प्रेरणा घेऊन शिकून अनेक मुली पुढे येऊ शकतात.

यशाचे श्रेय वडिलांना 

नेहा तिच्या यशाचे श्रेय शिक्षण आणि मेहनतीबरोबरच तिच्या वडिलांना देखील देते. तिच्या वडिलांनी तिला लहानपणापासून खूप पुस्तके वाचायला लावली. यशस्वी झालेल्या स्त्रियांच्या गोष्टी सांगितल्या.

त्यामुळे नकळत नेहाच्या मनात आपणही काहीतरी करून दाखवावे असे विचार येत गेले. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, पोलिस ऑफिसर किरण बेदी ह्या यशस्वी आणि कर्तृत्ववान महिलांचा तिच्या मनावर खूपच प्रभाव आहे.

नेहा सांगते, “काणाडोळा करायला शिका” 

पुरुषी वर्चस्व असणाऱ्या क्षेत्रात पुढे जायचे असेल तर महिलांनी होणाऱ्या टीकेकडे आणि मिळणाऱ्या टोमण्यांकडे कानाडोळा करायला शिकले पाहिजे, असे नेहा सांगते.

आपल्या प्रगतीआड येणाऱ्या गोष्टी दूर करत पुढे जाता आले पाहिजे. तसेच स्वतःच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास स्त्रियांनी ठेवला पाहिजे असे ती सांगते.

अशी ही कर्तृत्ववान महिला नेहा नारखेडे अमेरिकेत मराठीचे, पुण्याचे, भारताचे नाव आपल्या कामगिरीने गाजवते आहे. तिला ह्यापुढेही असेच आणखी यश मिळवण्यासाठी शुभेच्छा देऊया.

मनाचे श्लोक

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।