आकर्षणाचा सिद्धांत वापरुन, आपल्या सर्वांना फटाफट यशस्वी व्हायचे असते, पण जादुची कांडी फिरवावी आणि आपल्याला हवे आहे ते मिळावे, असे होत नाही.
बहुतांशी स्वप्नपुर्ती ची, यशप्राप्ती ची प्रक्रिया ही नियमबद्ध आहे.
‘बीज पेरले की रोप उगवते’, ह्या नियमाप्रमाणे आपल्या मध्ये असलेले काही गुण फुलवले की आयुष्याचा कल्पवृक्ष आपोआप फळे देऊ लागतो. यशप्राप्तीसाठी ह्या नऊ गोष्टी आपल्याकडे असणे आवश्यक आहे.
आपल्याला ज्या विषयात कार्य करावयाचे आहे, त्या विषयाचे सखोल ज्ञान
तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करत असा, विज्ञानात असा किंवा कलेमध्ये असा, सॉफ्टवेअर कंपनीत असा किंवा किराणा दुकानाचे मालक असा, डॉक्टर असा किंवा राजकारणी, नौकरी करत असाल किंवा संस्थेचे मालक, आपण ज्या क्षेत्रात काम करतो, त्यात मास्टर असणे तुम्हाला यशाकडे घेऊन जाईल.
आपल्या क्षेत्रात तज्ञ होण्यासाठी आपलं आपल्या कामावर निःस्सीम प्रेम असायला हवं, नवनवीन पुस्तकं वाचुन, आपल्या प्रोफेशनमध्ये, जगात काय चाललं आहे, हे नियमितपणे जाणुन घेत राहीलं पाहिजे, अपडेट राहीलं पाहीजे.
आपल्या क्षेत्रातले रोल मॉडेल निश्चित करुन घ्यावेत, त्यांच्या पावलावर पावले टाकुन रोजची वाटचाल करावी.
मी व्यवसायाने आर्किटेक्ट आहे, ली-कार्बुजियर नावाचा जगप्रसिद्ध आर्किटेक्ट होता, त्यालाच मी प्रेरणास्त्रोत मानले, मी त्याच्या चरित्राची पारायणे केली, त्याला डोळ्यासमोर ठेवुन आपणही असे भव्य दिव्य आयुष्य जगावे असे मनोमन पक्के ठरवुन टाकले.
तो फक्त आर्किटेक्ट नव्ह्ता, तो आर्किटेक्चरचा प्रोफेसर होता, मीही कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणुन जॉईन झालो, तो एक चांगला लेखक होता, मी ही लेख लिहणं, सुरु केलं, तो चित्रकार होता, मी ही चित्र काढु लागलो. त्याला भटकंती आवडायची, मी ही आवर्जुन नव्यानव्या जागी भेटी द्यायला सुरु केली. एका महान आर्किटेक्टची नुसती कॉपी करायला सुरुवात केली आणि आयुष्य बदलुन गेलं.
ज्ञानाला व्यवसायात वापरायचे कसब
काही माणसांजवळ ज्ञान तर खुप असतं, पण त्याला व्यवहारात वापरुन, त्याचा वापर करुन, ज्ञानाचं पैशात रुपांतर करण्याची जादु त्यांनी शिकलेली नसते.
असं म्हणतात की एडीसनने शोध लावण्याच्या काही वर्षापुर्वीच, एका शास्त्रज्ञाने विजेचा शोध लावला होता. पण वीजेचा वापर करुन पैसे कमवण्याची एडीसनला अवगत असलेली कला त्याला अवगत नव्हती. तो आपल्या रिसर्चला नफ्यामध्ये बदलवु शकला नाही.
वीजेचं तंत्रज्ञान समजल्यावर एडीसनने मात्र तात्काळ कृती केली. त्याने जनरल इलेक्ट्रीक कंपनी स्थापन केली. वीज उत्पादन करणारा कारखाना उभारला, आणि खोऱ्याने पैसे ओढले.
ज्ञानाचे पैशामध्ये रुपांतर करण्यासाठी, ‘रॉबर्ट कियोसॉकी’ आपल्या एका पुस्तकात विक्रीकलेचं महत्व समजावतो, व्यवसायाच्या सुरुवातीच्या काही वर्षात, ग्राहक कधी स्वतःहुन आपल्याकडे चालत येत नाही, आणि मागेल तेवढे पैसे स्वखुशीने देत नाही. त्यासाठी स्वतःचा ब्रॅंड बनवुन ओळख ठसवावी लागते. मार्केटिंग करावी लागते.
आशावाद
यशाच्या वाटचालीमध्ये प्रॉब्लेम तर येणारच! अडचणींसमोर हातपाय गाळुन हतबल न होता, निग्रहाने उभं राहीलं की प्रवास सुखाचा होतो.
ज्याचे मन नकारात्मक विचारांनी भरलेले असते, त्याला कोणत्याही कामात संकटेच दिसतात. हातातले काम टाकुन पळुन जाणे म्हणजे शुरपणा नाही.
अमेरिकेत बोस्टनमध्ये इलियास होवे नावाचा युवक होता, त्याची आई शिवणकाम करायची, त्यावेळी हाताने सुई दोरा घेऊन शिंपी कपडे शिवायचे, होवेला आपल्या आईचे श्रम बघुन त्रास व्हायचा, त्याच्या मनात विचार आला, एखादे यंत्र बनवुन हे काम सोपे करता येईल.
अनेक लोकांनी, होवेच्या जवळच्या मित्रांनी त्याला वेड्यात काढले, पण होवेने आशा सोडली नाही, त्याने मशिनरी बनवणारा वर्कशॉप जॉईन केला, अनेक प्रयोग केले. जगातले पहिले शिवणयंत्र बनवण्याचा मान इलियास होवेला जातो.
आशावादी राहील्यानं हवं ते मिळवता येतं, हे होवेनं जगाला दाखवुन दिलं.
जबरद्स्त आत्मविश्वास
स्वतःला क्षुद्र म्हणवुन घेणारा, मोठ्या जागी कसा पोहचणार? स्वतःला तुच्छ लेखणे, म्हणजे मनाने आत्महत्या करण्यासारखे आहे.
यशस्वी वीरांचे सर्वजण स्वागत करतात. मोठे मोठे डोंगर भुईसपाट करु शकणारी शक्ती फक्त माणसाच्या बोटातच आहे, पर्यायाने मेंदुत आहे.
काम करण्याची इच्छा माणसाला दुर्दम्य शक्ती देते. निश्चित ध्येय माणसाला आत्मविश्वासु बनवतं. निश्चयामुळे सारे संकल्प प्रत्यक्षात उतरतात.
निश्चयामुळेच समुद्रात भरकटलेल्या कोलंबसला धीर दिला. नेपोलीयनला आल्प्स पर्वत पार करण्याची शक्ती दिली.
आत्मविश्वासु माणसं, कुशल सारथ्यासारखं आपल्या घोड्यांवर, म्हणजे परिस्थितीवर काबु मिळवतात. त्यांच्या व्यक्तिमत्वातला विजयश्रीयुक्त भाव, त्यांची प्रथमदर्शनी छाप, ह्यांनीच ते अर्धी अधिक बाजी जिंकतात.
तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा, आपल्या सामर्थ्यावर भरवसा ठेवा, शंकाच्या चक्रव्युहात अडकु नका. ज्यांच्याजवळ प्रचंड आत्मविश्वास असतो त्याने अर्धी लढाई सुरु होण्यापुर्वीच जिंकलेली असते.
रोज आरशासमोर उभा राहुन एका यशस्वी व्यक्तीचे प्रतिबिंब पहा. महीन्याभरात क्रांतीकारक बदल होतात.
आपल्या अंतःकरणात ईश्वराचा निवास असतो, आत्म्यामध्ये शक्ती, सत्ता आणि प्रगती यांचे अमुल्य भांडार असते. ज्याला ती गवसते, सावलीप्रमाणे यश त्याच्या मागे मागे चालत जाते.
नवनिर्मितीची क्षमता
आपल्या प्रगतीचं गणित, ‘एक आणि एक अकरा’ असावं असं वाटत असेल, तर इनोव्हेटीव्ह बना, आतापर्यंत कोणी केली नाही अशा पद्धतीने जगाला नवीन आणि उत्कृष अशी सेवा द्या. मग बघा, पैशाचा ओघ कसा सुरु होतो.
कोणत्याही दोन क्षेत्रांना एकमेकांशी जोडणं, म्हणजे नाविन्य!
जगात करोडो टॅक्सी ड्रायव्हर होते, पण ओला-उबेर वाल्यांनी टॅक्सीला सॉफ्टवेअर जोडलं, व्यवसायाचा ताबा स्वत;कडे घेतला.
स्टीव्ह जॉब्जने मॅकेंटॉश कॉम्पुटर, आयपॅड, आयफोन्स बनवले, टेक्नॉलॉजी आणि मनोरंजन ह्या दोघांना एकत्र जोडलं, एप्पलने जगभर धुमाकुळ घातला.
मॅक्डोनाल्डमध्ये चवदार पदार्थ आणि प्लिझंट वातावरण मिळतं, म्हणुन लोक जातात.
व्यवसाय त्याचाच भरभराटीला येतो, जो इतरांपेक्षा वेगळं काहीतरी करतो.
ध्येयावर एकाग्रचित्त
यशाचं एक अतिशय इंट्रेस्टींग समीकरण आहे.
यश = एकाग्रता X वेळ
म्हणजे एकाग्रता आणि वेळ हे एकमेकांच्या व्यस्त प्रमाणात लागतात.
उदा. जर एखादं काम करताना आपण पाच दहा मिनीटाला मोबाईल बघतो, टी. व्ही बघतो, इतर टाईमपास करतो, तर ते काम व्हायला तीन तास लागतात. एकग्र चित्ताने, विचलित न होता सलगपणे ते काम केल्यास एक दोन तासात काम होऊ शकते.
क्रिकेट खेळताना पाव सेकंदही लक्ष विचलित झाल्यास दांडी उडते, झेल सूटतात, सामन्याचे निर्णय बदलतात. रोजच्या आयूष्यातही एकाग्रता तितकीच महत्वाची आहे. रोजच्या रुटीनमध्ये फालतु वेळ खाणाऱ्या गोष्टींना फाटा द्यावा.
ऑफीसवर्क करताना एक गोष्ट मी ऑब्झर्व्ह केली.
ज्या ज्या दिवशी मी रुटीन बनवतो, त्या त्या प्रत्येक दिवशी, कामाच्या बाबतीत, मी खुप चांगलं परफॉर्म करतो.
ज्या दिवशी मी दिवसाचे प्लानिंग करत नाही, त्या दिवसाचा फक्त मी पंचवीस टक्केच भागच चांगला वापरतो.
रोजचे वेळापत्रक बनवल्याने जबदस्त फोकस डेव्हलप होतो.
आपल्या कार्याला उपयोगी पडणारे साथीदार
“गाव करील ते राव करील काय?”
एकटा माणुस प्रत्येक काम करुन खुप मोठे यश प्राप्त करु शकत नाही. त्यासाठी टिम बांधावी लागते. माणसं ओळखावी लागतात, त्यांना घडवावं लागतं, तयार करावं लागतं, स्वातंत्र द्यावं लागतं, काम करवुन घ्यावं लागतं आणि सर्वात महत्वाचं, मनापासुन त्यांच्यावर प्रेम करावं लागतं.
गीतेमध्ये कृष्ण भगवान सांगतात, “संघ शक्ती कलियुगे!”
कलियुगामध्ये तोच टिकेल जो संघ बनवण्यात यशस्वी होईल.
शिवाजी महारांजांनी एक हजार सैन्यापासुन स्वराज्य उभारणीची सुरुवात केली, ते गेले तेव्हा स्वराज्यात एक लाख सैन्य होते. साथीदर कसे निवडावेत? कसे जोडावेत? कसे टिकवावेत? हे त्यांना माहित होते, त्यामुळे त्यांना इतके नेत्रदिपक यश मिळाले. ते इतिहासात अजरामर झाले.
आजकाल आपण पाहतो, मुसलमानांची ताकत त्यांच्या युनिटीमध्ये आहे. धर्माच्या नावावर ते लगेच एक होतात.
मारवाडी, सिंधी, गुजराती, जैन लोकं आपला समाजबांधव आर्थिक अडचणीत आल्यास लगेच मदतीचा हात देतात, बिनव्याजी कर्ज देतात. जे एकत्र राहतात, त्यांची प्रगती जास्त होते.
आपणही प्रत्येकाने आपापल्या आजुबाजुच्या माणसांची, ग्राहकांची, आपल्या सहकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची मदत केली पाहीजे, त्यांच्याशी मैत्रीचा संबंध जोडला पाहीजे. त्यांच्यावरच आपला यशाचा डोलारा उभा राहणार आहे.
साथीदारांशी सुसंवाद
एडीसनने अथक परिश्रमाने पहिला बल्ब बनवला, त्याच्या ऑफीसमध्ये, प्रचंड जल्लोष झाला, नंतर एडीसनने आपल्या सेवकाला तो बल्ब प्रयोगशाळेतुन स्टोअर रुममध्ये न्यायला सांगितले, उत्साहाच्या भरात, सेवकच्या हातुन बल्ब निसटला, आणि फुटला.
वातावरण स्तब्ध झाले. प्रत्येक जण संतापला.
एडीसन एका शब्दानेही रागावला नाही. नंतर एकदा त्याला विचारले गेले, पहिला बल्ब फुटला तेव्हा तुम्ही सेवकाला एकही वाक्य रागावला नाहीत.
“मला हे माहीत आहे की, बल्ब पुन्हा बनवता येऊ शकतो, पण माणसाचं मन पुन्हा जोडता येत नाही.”
नेतृत्व गुण
जगातला प्रत्येक महान माणुस आधी एक उत्कृष्ट नेता बनला, मग तो यशस्वी झाला.
कृष्ण जन्मतः लोकांचा स्वघोषित नेता बनले होते, इंद्रपुजा बंद करुन त्यांनी गोवर्धनपुजा सुरु केली. कंसाचा त्याच्याच प्रजेसमोर वध केला, कुरुक्षेत्रावर पांडवाचे नेतृत्व केले.
राम जिथे गेले तिथे त्यांनी नेतृत्व केले. एका शब्दावर जीव देणारी आणि जीव घेणारी माणसं तयार केली.
नेपोलियन बोनापार्ट्पासुन, अब्राहम लिंकनपर्यंत आणि जेआरडी टाटापासुन महेंद्रसिंग धोनीपर्यंत प्रत्येकाने आपापल्या नेतृत्वक्षमतेच्या बळावर यश मिळवले.
नेता बनण्यासाठी निवडणुका लढवण्याची गरज नाही.
कळत नकळत, आपल्या प्रत्येकाला दररोज नेतृत्व करण्याची संधी मिळते, आपल्या स्वतःचं, आपल्या कूटूंबाचं, आपल्या ऑफीसचं, आपल्या किटी ग्रुपचं, आपल्या मित्रमंडळीचं, आपल्या नातेवाईकांचं, वेगवेगळ्या संघटनांचं!…..
जो जितकी जास्त जबाबदारी घेतो, तो तितकं प्रभावी नेतृत्व करतो.
ही नऊ सुत्रे वापरुन, आपल्या सर्वांचं आयुष्य यशाने उजळुन जावे, ह्या प्रार्थनेसह, मनःपुर्वक आभार!
धन्यवाद आणि शुभेच्छा!
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
You are good
Thanks for your information
Khup khup abhari ahe khup chan mahiti
Deta apan mi nehmi aple lekh wachat
Asto ani tyanusrar swtla badlnyacha
Prytna karat asto
धन्यवाद निलेश 👍
I like yours blogs;and I try Chang my life..
धन्यवाद
Khupach chhan
इतका सुंदर, अप्रतिम,अफलातून लेख लिहिल्याबद्दल आपले मन:पूर्वक शतदा आभार सर. Law of Attraction What’s up Course केव्हा सुरु होणार? त्याबद्दल आवश्य कळवा. धन्यवाद.
Very Nice information Life change thoughts
Nice information, Motivational, inspiring!!!
संकट काळात असे लेख वाचुन नक्किच आत्मविश्वास वाढ होण्यास मदत होते.
धन्यवाद !
Khup Chan Mahiti Dili Ahe. Thanks.