व. पु. म्हणतात तसे… माणसाला जन्माला घालण्या मागे त्याला छळावे एव्हढीच फक्त नियती ची इच्छा नसते, ती प्रत्येकाला काही ना काही देऊन पाठवते…. बाकी आपण मिळवायचे असते!
नियती किंवा destiny या शब्दाचा अर्थ काय असेल? हा शब्द खरंच गुढ आहे? का फक्त आपला समज?
प्रारब्ध, विधिलिखित, नियती हे सगळे समान अर्थी शब्द… मनुष्य जन्माला येताना प्रत्येक धर्मा मधील ईश्वर विधिलिखित लिहुन ठेवतो/ ठेवते असा समज किंवा श्रद्धा प्रत्येक धर्मात असते… आपल्याकडे पाचवीची पुजा याच श्रध्येचा भाग!
पण ही श्रद्धा थोडा वेळ बाजुला ठेऊन डोळस पणाने विचार केला तर त्या गूढ ह्या शब्दाचे कोडे थोडे सोपे होईल का?
जन्माने पहिला पांडव असुन, आईच्या एका चुकी मुळे जो एकशे एकावा कौरव झाला… सूतपुत्र म्हणुन हिणविला गेला…. याला त्याची नियती जबाबादर?
पण हाच कर्ण जेंव्हा सुतपुत्रा चा अंगराज झाला ते मात्र स्वतःच्या कर्तृत्वावर… असे का ?
ज्यू चा अपिरमित संहार करून हिटलर ने काय साधले? शेवट दारुण आत्महत्येत शेवट झाला… मग हे विधिलिखित होते का?
त्याचीच दुसरी बाजु एकेकाळी हाच हिटलर जर्मन जनतेच्या गळ्यातील ताईत होता… फ्युरर फ्युरर म्हणत जनता डोक्यावर घेत असताना नियती नेमके काय करीत होती?….
हिटलर स्वतः च्या आत्मचरित्रात स्वतः चा उल्लेख नियतीचे आवडतं अपत्य असा करतो!!! म्हणजे नक्की काय ?
पाकिस्तान ला ५५ कोटी देण्या करता ज्या महात्म्याने उपोषण केले, त्याच्या मृत्यु ची पाकिस्तान ने फक्त एका ओळीची दखल घेतली… याला त्या महात्म्याची नियती म्हणायचे का?
सुख अथवा यश “कर्तृत्वा” मुळे आणि दुःख किंवा अपयश “नियती” मुळे असं म्हणुन कसे चालेल ?
आपल्या आयुष्याला समांतर चालणारी गोष्ट म्हणजे जर का नियती असेल तर मग जसा आपल्या जवळचा माणुस एखाद्या महत्वाच्या क्षणी कसे वागु शकेल हे सांगु शकत नाही तसेच नियती बद्दल पण असेल ना?
एखादी गोष्ट चुकविण्या करता आपण जिवा चा आटापिटा करतो पण नेमकी तीच गोष्ट घडते… काय असेल कारण?
“A person often meets his destiny on the road he took to avoid it”
असे असेल तर मर्फीज law नियती ला पण लागु होतो का? “If anything can go wrong, it will go wrong”
मग हाच law “If anything can go right it will go right” असा पण असायला हवा ना?
नियती या शब्दाला उदासीनता का चिकटली असेल?
नियती या शब्दा मध्ये नकारार्थी भावना का दिसते?
इंग्लिश मध्ये म्हण आहे ना “Victory has a hundred fathers and defeat is an orphan”
अशा वेळेस नियती ला सॉफ्ट टार्गेट ठरवलं जातं का?
नीट विचार केला तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह नियती अशा दोन निरनिराळ्या नियती असणे स्वाभाविक आहे… पण आपण घडणाऱ्या गोष्टी चे खापर फोडायला कारण शोधत असतो… म्हणुनच कदाचित फक्त अशुभ नियती दिसत असेल….
मनुष्याच्या मनात असंख्य प्रश्न असतात… आपले विचार म्हणजे काय असते? नं कळत चाललेली प्रश्नोत्तरे……
आपलेच प्रश्न आणि आपलीच उत्तरे असतात, नीट शांत पणे बघितलं की ही प्रोसेस सहज लक्षात येऊ शकते…
हे होत असताना प्रत्येक प्रश्नाचे फक्त उत्तरच नाही तर स्वतः ला हवे तसे उत्तर आपणच देत असतो…. मग उत्तर मिळाले नाही की आहेच मग प्रारब्ध, नशीब आणि नियती…
व. पु. म्हणतात तसे… माणसाला जन्माला घालण्या मागे त्याला छळावे एव्हढीच फक्त नियती ची इच्छा नसते, ती प्रत्येकाला काही ना काही देऊन पाठवते…. बाकी आपण मिळवायचे असते!
मनाचेTalks च्या वाचकांच्या प्रतिक्रिया:
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी किंवा तुमचे स्वतःचे लेखन मनाचेTalks वर प्रकाशित करण्याची इच्छा असल्यास येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
खरं म्हणजे मला नियती शुभ्र दिसते…, अगदी पाण्यासारखी….
थोडक्यात काय तर…?
विहिरीचं पाणी पाटानं जाणं हे त्या पाण्याचं प्रारब्ध…,
ते पाणी ऊसाला जाणं नि ऊस गोड होणं काय…? नि तेच पाणी मिरचीला जाणं नि मिरची तिखट होणं काय…? नि अजुन कशाला जाऊन ते कडू होणं काय….?
यात पाण्याचा काय दोष ?
नियतीसुद्धा कदाचित याच मेणातली असावी….नाहीतर ती अशी कमजोरतेचा ओघळ घेउन जगलीच नसती ?
कमजोरीचं तिसरं नाव काय तर…..?
…… लुळीपांगळी…., बेबस.., लाचार रूप असलेली नियती. दुसरं काय……?
– संतोष कांबळे अर्जापूरकर.
अप्रतिम शब्दरचना