आयसिस च्या अत्याचारातून स्वतःची सुटका करून अन्यायाला वाचा फोडणारी नादिया मुराद

आज जागतिक महिला दिनानिमित्त सगळीकडे स्त्री चा जागर होत असताना आजही जगाच्या एका भागात स्त्री ला वस्तू म्हणून वापरलं जातं. अश्याच पुरुषी अत्याचाराला बळी पडलेल्या पण त्यातून पुढे येऊन स्त्री ला आपलं स्थान, मानसन्मान मिळण्यासाठी चळवळ उभारणाऱ्या एका स्त्री ची गोष्ट माझ्या समोर आली. ती वाचून कुठेतरी मी सुन्न झालो. आजच्या दिवशी स्त्री ला माणूस म्हणून समजून घेण्याचा माझा हा छोटा प्रयत्न.

२०१८ सालचा ‘नोबेल’ शांती पुरस्काराची मानकरी ठरलेल्या ‘नादिया मुराद’ हिचं आत्मचरित्र असणारं “द लास्ट गर्ल” गेल्या महिन्यात मागवलं होतं. नादियाच्या प्रवासाची पुसटशी कल्पना मला होती. म्हणून जेव्हा “द लास्ट गर्ल” हातात आलं, तेव्हा ते कधी एकदा वाचतो असं मला झालं होतं. इराकच्या एका छोट्याशा खेड्यात राहणारी एक मुलगी, तिचं कुटुंब, गरिबीत असूनसुद्धा जे आहे त्यात समाधान मानून जगण्याचा प्रवास जेव्हा, पुस्तक वाचताना, सुरु झाला तेव्हा कुठेतरी भारतातील एखाद्या खेड्याचंच वर्णन वाचत आहोत असा मला भास झाला.

आपल्या स्वप्नात स्वच्छंद जगणाऱ्या अल्लड मुलीच्या आयुष्यात पुढे काय वाढून ठेवलं आहे ह्याची कल्पना न नादिया ला होती न तिच्या कुटुंबियांना! गेल्या २०-२५ वर्षात इराकच्या राजकारणात सद्दाम हुसेनचा झालेला शह, त्यातून झालेला इसीस (ISIS) चा उदय हे सगळचं कुठेतरी अस्वस्थ करणारं. सद्दामच्या पडावानंतर अमेरिकेने इराकच्या राजकीय स्थितीला वाऱ्यावर सोडून काढलेला पाय हा इसीसच्या कडवट मुस्लीम धोरणांना बळ देणारा होता. त्यातून सुरु झालेली एक राजवट ज्यात स्त्रीचं स्थान हे एका वस्तूसारखं होतं. इसीसने बनवलेले कायदे कोणत्या देवाच्या आणि धर्माच्या कक्षेत बसतं होते हे त्यांचं त्यांना माहिती; पण एक होतं की मुस्लीम नसणाऱ्या इतर कोणत्याही धर्मासाठी ते कायदे म्हणजे मृत्यूला आमंत्रण! स्त्रीसाठी तर मृत्यूलाही लाज वाटेल इतके क्रूर अत्याचार.. त्या अत्याचारांनी माणुसकीला काळिमा फासलाच अन् माणुसकीचं अस्तित्वच संपवून टाकलं!!!

ह्या पुस्तकातून नादिया मुराद आपल्याला जाणवते अनेक रंगातून! कधी अल्लड मुलगी बनून, कधी हताश झालेली, जीवनाला हरलेली आणि कंटाळलेली एक असहाय स्त्री ! तर कधी दुर्गा बनून आपल्यावर अत्याचार करणाऱ्या त्या अमानुष लोकांना योग्य ती शिक्षा देण्याची मानसिकता ठेवणारी स्त्री म्हणून…पण सगळ्याच वेळी हरते ती माणुसकी आणि लाज वाटते ती पुरुष असण्याची. लिंगाचा आत्मभिमान बाळगणारा पुरुष इतक्या खालच्या स्तराला जाऊन स्त्री ला वागणूक देऊ शकतो हे बघून कुठेतरी मन विषण्ण झालं. (लिंगाची खाज) आपली वासना शमवण्यासाठी (भागवण्यासाठी) आणि तृप्तता करण्यासाठी फक्त आणि फक्त शरीर जेव्हा समोर दिसतं मग ते कसंही असो पण माझी भूक भागवली पाहिजे, हा विकृत अट्टाहास माणुसकीला काळिमा फासतो. आपल्याला काही झालं तरी त्याने न समोरच्याला काही फरक पडतो न त्याच्या संवेदना कधी जाग्या होतात!!!

‘स्त्री’ वस्तू असल्यासारखी बाजारात बसवून विकली जाते. तिचा लिलाव होतो. ती माणूस नसते तर फक्त आणि फक्त लिंगाची भूक भागवणारं एक यंत्र असते. तिला काय वाटते, ती शुद्धीत आहे की नाही ह्याने पण काही फरक पडत नसतो. फक्त आणि फक्त ओरबाडायचं हेच माहित असलेला पुरुष कोणत्या धर्माचं प्रतिनिधित्व करतो हे मला तरी कळलेलं नाही. एका ठिकाणी नादिया सांगते,

At some point, there was rape and nothing else. This becomes your normal day. You don’t know who is going to open the door next to attack you, just that it will happen and that tomorrow might be worse. You stop thinking about escaping or seeing your family again. Your past life becomes a distant memory, like a dream. Your body doesn’t belong to you, & there’s no energy to talk or to fight or to think about the world outside. There is only rape and the numbness that comes with accepting that this is now your life.

स्त्री इतकी असहाय्य होते की कोण शरीराला स्पर्श करत आहे, कोण बलात्कार करून करून निघून जातं आहे, ह्याने काहीच फरक पडत नाही. कारण रोज तेच घडत असतं. डोळ्यातून निघणारे अश्रू सुद्धा गोठले जातात कारण त्या संवेदनांचा पण कधीच बलात्कार झालेला असतो. आपण एक वस्तू होतो. ज्याची खरेदी कधी, कोण, कशी करेल आणि ज्याची विक्री कोण, कधी, कोणाला करेल ह्यातलं काहीच आपल्या हातात नसतं. हातात असतं ते म्हणजे फक्त सहन करायचं. जो समोर येईल, जो अंगावर घेईल. फक्त आणि फक्त त्याच्या लिंगाची भूक भागवायची.

Being thought once as a slave, having your humanity and dignity taken from you, was bad enough, and I couldn’t stand the thought of being passed from militant to militant, moved from house to house, and maybe even transported across the border into ISIS-held Syria, like an object at the market, like a sack of flour in the back of truck.

इसीसने मुस्लिम नसणाऱ्या स्त्रियांवर अत्याचार करण्यासाठी “सबया” ह्या उक्तीचा वापर सुरु केला. स्त्रीला गुलाम बनवून तिच्यावर बलात्कार ते तिचा अमानुष छळ करण्याचा अधिकार पुरुषाला दिला. स्त्रीला त्या विरुद्ध एक अवाक्षर ही बोलू न देण्याची सक्ती करणारा हा कायदा म्हणजे स्त्रीला खेळणं म्हणून वापरण्याची दिलेली संधी. ह्यामुळे सत्ता मिळालेल्या इसीस च्या राजवटीखालील नादियासह पूर्ण याझिदी समाजातील कित्येक स्त्रियांचा ज्या पद्धतीने छळ केला गेला त्याची कहाणी शब्दात व्यक्त करताना लेखणीही थरथरते.

याझिदी लोकांवर आणि मुख्यत्वे याझिदी स्त्रियांवर झालेले अत्याचार हे नुसते बलात्कारापुरते मर्यादित नाहीत तर माणुसकीच्या सगळ्या पातळ्यांना काळिमा फासणारे आहेत. इसीस ने अक्षरशः कोणताही मुलाहिजा न बाळगता मुलं/मुली, तरुण/ म्हातारे स्त्री- पुरुष अशा सर्वांचा रक्तरंजित नरसंहार इराकमध्ये केला आहे. नादियाच्या मते माझ्यासकट सगळ्याच याझिदी लोकांनी आपलं कुटुंब, आपलं घर, आपले नातेवाईक, आपली पूर्ण पिढी ह्या नर संहारात गमावली आहे. ह्याच इसीसचं समर्थन करणारे आणि साथ देणाऱ्यांसोबत हे मूग गिळून गप्पपणे बघणारे तितकेच दोषी आहेत!!!

नादिया मुराद आणि तिचा हा प्रवास मला पूर्ण निशब्द करून गेला. तिने जे भोगलं आहे ते वाचताना अक्षरशः अंगावर काटा आला. तिच्या मनाची, शरीराची काय अवस्था झाली असेल असा विचार जरी केला तरी मी पुस्तक वाचताना अनेकदा बिथरलो. हे सगळं कुठेतरी जगाच्या एका भागात घडत असताना त्याचवेळी भारतासारख्या देशात ह्या गोष्टीचा मागमूसही नाही. इकडे आम्ही देवळात प्रवेश घेण्यावरून राजकरण करत बसलो आहोत. त्यामुळे नक्की स्त्रीवर झालेल्या अत्याचाराला वाट फोडायची असेल आणि स्त्री समानता, पुरुषांची स्त्री कडे वस्तू म्हणून बघण्याची मानसिकता वगैरे गोष्टी समजून घ्यायच्या असतील तर नादिया चं “द लास्ट गर्ल” वाचायला हवं. नादिया चा प्रवास हा केवळ स्त्रीसाठी प्रेरणा देणारा नाही तर प्रत्येक पुरुषाला आपल्या अंतरंगात डोकावून बघायला लावणारा आहे. माझ्या विचारांना, माझ्या लेखणीला ह्या पुस्तकाने नि:शब्द केलं आहे. हे पुस्तक वाचून संपवताना,

“नादिया, खरंच तू ती “लास्ट गर्ल” असावीस ही एकच इच्छा.”

नादिया मुराद चे आत्मचरित्र ‘द लास्ट गर्ल’ (या पुस्तकाचा मराठी अनुवाद झालेला नाही)


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।