जॉब सोडल्यानंतर किंवा रिटायरमेंटनंतर किती दिवसांनी PF चे पैसे काढावेत? समजून घ्या योग्य वेळ
नोकरी सोडल्यानंर PF अकाउंट मधून लगेच Provident Fund मधून म्हणजेच भविष्य निर्वाह निधीतून पैसे काढणं हा निर्णय शहाणपणाचा ठरत नाही.
कारण रिटायरमेंट नंतर तीन वर्षे PF वर व्याज मिळत असतं.
त्यामुळं PF च्या जुन्या अकाउंट वरून नव्या अकाउंटमध्ये पैसे ट्रांन्सफर करता येतात.
Provident Funds मध्ये, नोकरी करणाऱ्या लोकांची आयुष्य भराची पुंजी जमा असते.
रिटायरमेंट नंतर भक्कम आर्थिक पाठिंबा म्हणून याकडं बघता येतं.
पण आताच्या काळात वारंवार नोकरी बदलली जाते, आणि नोकरी बदलली की लोक लगेच PF चे पैसे अकाउंट मधून काढून घेतात.
पण लक्षात घ्या लवकर पैसे काढून घेतले तर तुम्हांला मिळणारा पैसा कमी असतो.
त्यामुळं अगदीच गरज असेल तरच पैसे काढावेत.
प्रायव्हेट कंपनीत नोकरी करणारे लोक जेंव्हा नोकरी बदलतात तेंव्हा लगेचच Provident Funds चे पैसे काढून घेतात.
पण हा चुकीचा निर्णय आहे. तुम्ही नोकरी जरी सोडली तरी P F चं व्याज तोपर्यंत तुम्हांला मिळतं जोपर्यंत तुमचं अकाउंट निष्क्रिय होत नाही.
जेंव्हा तुम्ही नव्या कंपनीत काम सुरु करता तेंव्हा तिथं तुम्ही P F चे पैसे ट्रान्सफर करु शकता.
Provident Funds चे पैसे नव्या अकाउंट मध्ये ट्रान्सफर करण्यासाठी काहीही प्रॉब्लेम येत नाही, आणि पेंन्शन योजनेत ही काही अडचण येत नाही.
त्याचबरोबर तुम्ही रिटायरमेंट घेतली आणि PF मधले पैसे काढले नाहीत तर त्यावर तीन वर्षे व्याज मिळत राहतं. तीन वर्षानंतर PF अकाउंट बंद होतं.
वयाच्या 58 वर्षानंतर रिटायरमेंट असते. त्यानंतर PF चे सगळे पैसे काढता येतात.
नोकरी सोडल्यानंतर एक महिन्याने 75% पैसे मिळू शकतात.
10 वर्षापेक्षा कमी नोकरी झाली असेल तर पेन्शनचे सगळे पैसे तुम्हांला मिळतात.
तर मित्रांनो Provident Funds ही तुमची कष्टाची, हक्काची पुंजी असते तिचा पुर्ण वापर करा.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.