ओट्स कुठल्याही प्रसंगासाठी सर्वोत्तम आणि निरोगी रहाण्यासाठी हेल्दी पर्याय असणाऱ्या ओटसच्या रेसिपी जाणून घ्या.
वाफाळत्या दुधातला चवदार बेरी नट्स आणि फळांनी सजलेला ओट्सचा नाश्ता म्हणजे एका उत्तम दिवसाची सुरवात.
ओट्स हे सर्वोत्तम सप्लिमेंट आहे. आरोग्य आणि चव या दोन्ही गोष्टी एकत्र हव्या असतील तर ओट्स हे एक उत्तम सुपरफूड आहे.
ओट्सच्या रेसिपी तयार करायला अतिशय सोप्या असतात. मधल्या वेळेच्या भुकेला उत्तम पर्याय.
पोटभर ब्रेकफास्टसाठी, संध्याकाळच्या हलक्या नाश्त्यासाठी आणि रात्रीच्या अगदी हलक्या मात्र पौष्टिक डिनर साठी ओट्सचा पर्याय आपण वापरू शकतो.
वजन कमी करण्यापासून ते हृदय निरोगी राहण्यापर्यंत ओट्सचे अनेक फायदे आहेत.
या ओट्सचे वेगवेगळ्या पध्दतीने पदार्थ तयार करता येऊ शकतात.
एकदा ओट्सच्या रेसिपी जाणून घेतल्या तर तुम्ही त्या पदार्थांच्या प्रेमातच पडाल यामध्ये शंका नाही.
चला तर मग उशीर कशाला जाणून घेऊया ओट्सच्या स्वादिष्ट रेसिपीज
1) ओट्स उपमा
एका उत्तम चवदार आणि आरोग्यदायी नाश्त्यासाठी ओट्सचा उपमा तुम्ही तयार करू शकता.
हा ब्रेकफास्ट तुम्हाला उत्साहीसुद्धा बनवेल त्याच बरोबर तुमचं पोषणही करेल.
स्वादिष्ट ओट्सच्या उपम्यासाठी साहित्य
1) दोन कप ओट्स,
2) बारीक चिरलेले कांदे,
3) हिरवे वाटाणे आणि गाजर,
4) बारीक चिरलेली भोपळी मिरची,
5) उडीद डाळ,
6) कढीपत्ता,
7) मोहरी,
8) किसलेले खोबरे
9) हळद,
10) चवीनुसार मीठ
11) हिरव्या मिरच्या
12)) कोथिंबीर सजवण्यासाठी.
आता वळूया ओट्स उपम्याच्या कृतीकडे.
तर एका पॅनमध्ये एक चमचा तेल गरम करून घ्या. त्यात ओट्स, हळद, थोडं मीठ आणि हिरव्या मिरच्या घाला.
ओट्स हलके तपकिरी होईपर्यंत म्हणजे साधारण 4 ते 5 मिनिटे भाजून घ्या.
थोडंसं पाणी घालून झाकून ठेवा. एक 5 ते 7 मिनिटे याला शिजू द्यायचं.
तोपर्यंत आपण दुसर्या पॅनमध्ये थोडं तेल आणि मोहरी घालून त्यात उडीद डाळ घालून सोनेरी होईपर्यंत भाजून घेऊया.
आता त्यात थोडासा कढीपत्ता, हळद, मीठ आणि कांदे घालून कांदे पारदर्शक होईपर्यंत शिजवून घ्यायचं
त्यात चिरलेलं गाजर, वाटाणे आणि सर्व भाज्या मिक्स करून चांगलं शिजू द्यायच़ं.
सगळ्या भाज्या शिजल्या की मग शेवटी त्यात भोपळी मिरची घालायची.
इकडे तोपर्यंत ओट्स चांगले शिजलेले दिसतील. आता त्यात भाज्या घाला. एक वाफ येऊ द्या.
झाला तुमचा ओट्सचा चविष्ट उपमा तयार.
किसलेले खोबरे आणि कोथिंबीर घालून तुम्ही हा उपमा मस्त सजवू शकता.
2) ओट्स इडली
तुम्हाला इडली आवडत असेल तर आता यापुढे ओट्सची इडली हा पौष्टिक पर्याय आवर्जून निवडा.
टेस्टी हेल्दी आणि करायला सोपी असणारी, झटपट होणारी ओट्सची इडली करायला आपल्याला साहित्य लागेल
1) भाजलेले ओट्स,
2) मीठ,
3) दही,
4) किसलेले गाजर,
5) मोहरी,
6) कढीपत्ता,
7) चना डाळ,
8) उडीद डाळ,
9) हिरव्या मिरच्या आणि थोडंसं तेल
सुरुवातीला ओट्स कढईत भाजून घ्या आणि नंतर त्याची बारीक पावडर तयार करा.
किसलेलं गाजर ओट्सच्या पावडरमध्ये घालून थोडं मीठ आणि दही घाला.
एका फ्राईंग पॅनमध्ये थोडंसं तेल गरम करून त्यात चणा डाळ, उडदाची डाळ, कढीपत्ता, मोहरी आणि हिरव्या मिरच्या टाका.
मिक्सरला बारीक करून घ्या.
हे मिश्रण ओट्स इडलीच्या पिठात घाला.
चांगले फेटून घ्या आणि ते एकसारखे होऊ द्या.
इडली पॅनला ग्रीस करा आणि ओट्सचं तयार इडली पीठ त्यात घाला. चांगले वाफवून घ्या.
नारळाची चटणी आणि सांबारसह ओट्सच्या गरमागरम इडल्यांचा आस्वाद घ्या.
3) ओट्स खीर
आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या खीरी वेगवेगळ्या प्रसंगी तयार केल्या जातात.
आरोग्याच्या दृष्टीने ओट्सची खीर पौष्टिक असते.
गोड पदार्थ ज्यांना आवडतात त्या व्यक्ती ओट्सची ही खीर ट्राय करु शकतात.
1) 1 कप ओट्स
2) 1/2 लिटर दूध,
3) ड्राय फ्रूट्स
4) फळं
5) साखर
खीर तयार करण्यासाठी ओट्स पॅनमध्ये चांगले भाजून घ्या.
दुसऱ्या एका पॅनमध्ये दूध गरम करून त्यात साखर घालून ढवळा.
दूध कोमट झालं की त्यात ओट्स मिक्स करून ढवळत राहा.
संपूर्ण मिश्रण घट्ट झाल्यावर त्यात ड्रायफ्रूट्स काजू, बदाम, पिस्ता, खजूर, घालू शकता.
ओट्सची ही खीर आणखी चवदार करण्यासाठी केळी, आंबा चिकू किंवा तुमच्या आवडीची फळं बारीक चिरून घालू शकता.
4) ओटमील कुकीज
तुम्ही जर खाण्याचे शौकीन असाल त्याचबरोबर आरोग्याविषयी जागरूक असाल तर ओटमील कुकीज हा तुमच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन आहे.
ओटमील कुकीज करण्यासाठी तुम्हाला लागणार आहे अगदी मोजकंच साहित्य.
1) 3 कप ओट्सची जाडसर पावडर
2) दालचिनी पावडर,
3) 2 अंडी,
4) 2 कप बटर,
5) एक कप ब्राऊन शुगर,
6) एक कप पांढरी साखर,
7) एक चमचा बेकिंग सोडा,
8) मीठ,
9) अर्धा कप मैदा,
10) एक कप बारीक पावडर केलेले ओट्स आणि व्हॅनिला अर्क.
ओटमील कुकीज तयार करण्यासाठी ,
बटर, पांढरी साखर, ब्राऊन शुगर, दालचिनी पावडर, व्हॅनिला अर्क एका भांड्यात घेऊन एकत्र फेटा.
एक एक अंडे हळूहळू फोडून फेटून घ्या.
मैदा, मीठ, बेकिंग सोडा आणि नंतर ओट्स सगळं एकत्र करून घ्या
गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्या
प्रत्येकी 2 इंच अंतर राखून कुकीज बेकिंग ट्रेवर ठेवा.
हा ट्रे प्रीहीटेड मायक्रोवेव्हमध्ये ठेवा आणि 170 डिग्री सेंटीग्रेडवर 8 ते 10 मिनिटे बेक करा.
तुमच्या खुसखुशीत ओटमील कुकीज तयार.
5) ओट्स केक
अहा! ओटसचा केकसुद्धा करता येतो? अशीच तुमची प्रतिक्रिया होती ना?
हो ओटसचा स्वादिष्ट केक तयार करता येतो .
1) 1 कप ओट्स,
2) दीड कप गरम पाणी,
3) एक कप ब्राऊन शुगर,
4) एक कप पांढरी साखर
5) 2 अंडी,
6) अर्धा कप लोणी,
7) बेकिंग सोडा एक चमचा,
8)ओट्स पीठ एक कप
9) मैदा अर्धा कप.
ओव्हन 170 डिग्री सेल्सियस प्रीहिट करा.
बेकिंग ट्रेला ग्रीस करून घ्या.
एका बाऊलमध्ये उकळते पाणी आणि ओट्स मिक्स करा
त्यात ओट्स भिजवा. लोणी, ब्राऊनशुगर आणि पांढरी साखर एकत्र करून घ्या.
हलक्या हाताने मिश्रणात एकावेळी एकच अंडं घाला.
दुसऱ्या भांड्यात बेकिंग सोडा, चिमूटभर मीठ, आणि मैदा एकत्र करून चांगले मिक्स करून घ्या.
आता काय करायचं ?
तर या मिश्रणाचा अर्धा भाग लोण्याच्या मिश्रणात घालून मग भिजवलेल्या ओट्समध्ये घालायचा
गुठळ्या होऊ नयेत याची काळजी घेत ढवळत रहायचं
चांगलं मिक्स झालं की उरलेले पीठ घालून चांगले तेही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं.
ग्रीस करून ठेवलेल्या ट्रेमध्ये हे पिठ घालून 30 ते 35 मिनिटे बेक करून घ्यायचं.
ओटमीलचाचा केक तुमच्यासाठी रेडी असेल.
तर अशा टेस्टी रेसपीज करून तुम्ही ओट्सचा जास्तीत जास्त वापर करुन आरोग्य जपू शकता.
बहुगुणी ओट्सचे आरोग्यासाठी फायदे
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.