खांदेदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी, थायरॉईड यांसारखे आजार असतील तर हे नक्की वाचा

आपल्या दैनंदिन जीवनात आपण वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांना भेटतो आणि वेगवेगळ्या प्रकारच्या परिस्थितींचा सामना करतो. यात होतं असं की, आपल्याही नकळत हे अनुभव आपल्यामध्ये काही भावना मागे ठेवतात.

आपल्याला जे काही अनुभव आले आहेत त्यामुळे उचंबळून आलेल्या भावनांचा संग्रह आपल्या शरीरात वेळोवेळी साठवला जातो, आणि आपल्याला कळतही नाही की, आपण किती दडपलेली आणि नकारात्मक ऊर्जा धरून ठेवली आहे.

घडून गेलेल्या अनुभवांच्या साचून राहिलेल्या भावना आणि ऊर्जा आपल्या शरीरात विविध दीर्घकालीन आजार, स्नायूंमधील ताण किंवा विविध आरोग्य समस्या निर्माण करू शकतात. बरेचदा तुम्ही असा अनुभव घेत असाल की, काही आजार झाला आहे पण डॉक्टरांनी तपासणी केल्यावर सर्व टेस्ट्स या निगेटिव्ह येतात. तेव्हा आजारांचे मूळ हे साचून राहिलेल्या भावनांमध्ये असू शकते. थायरॉईड, अर्थरायटीस, हायपरटेन्शन, डायबिटीस यांसारखे काही आजार हे Psychosomatic disorders आहेत ते याचमुळे.

स्नायूंमधली तणावाची मुख्य कारणे (What is the main cause of muscle tension)

आघात (Trauma): बालपणातील, किशोरावस्थेतील काही घटनांचे अनुभव, लैंगिक हिंसाचार, घरात सतत आई-वाडीलांमध्ये होणारी भांडणे सुद्धा मुलांच्या भावविश्वात उलथापालथ करतात.

अशा भावनांचा वेळीच योग्य प्रकारे निचरा केला गेला नाही तर त्या दिर्घकालीन भीती, तणाव, पोस्ट ट्रुमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर मध्ये रूपांतरित होऊ शकतात. यामुळे स्नायूंमधली ताण आणि या प्रकारचे विविध आजार वाढू शकतात.

मनो-शारीरिक ताण (Psychosomatic Stress): या प्रकारचा ताण आपल्या साचलेल्या भावना, जसे की चिंता, राग, निराशा किंवा दुःख, यांमुळे होतो. हे तणाव सहसा माणसाच्या विचारांमुळे आणि समाजातील विविध लोकांच्या संपर्कात आल्यानंतर येणाऱ्या अनुभवांमुळे निर्माण होतात.

तुमच्या सामाजिक आणि कौटुंबिक वातावरणानुसार बनलेल्या तुमच्या विचारांच्या आणि समजुतींच्या बऱ्या-बाईट परिणामांमुळे या साचलेल्या भावना काही आजारांचा उगम ठरू शकतात. कसे ते लेखात पुढे तुम्हाला वाचायला मिळेलच.

पूर्वग्रहामुळे तयार झालेली मानसिकता (Pre-conditioned Mindsets): परिस्थिती नुसार आपले विचार घडत जाणे हे लहानपणापासून सुरू होते आणि ते आपले पालक, शिक्षक, वडीलधारी मंडळी आणि समाज यांच्या आपल्यावरील प्रभावामुळे दृढ होतात.

बरेचदा तुम्ही पूर्वग्रहदूषित किंवा चुकीच्या विचारांना घेऊन जीवनात पुढे जात असतात कारण तुम्हाला योग्य वेळी या भावनांना व्यक्त करण्याची संधी मिळालेली नसते. राग, दुःख आणि भीती या भावना दडपल्या जातात या दडपलेल्या भावनांमुळे अनेक प्रकारच्या आरोग्यविषयक समस्यांचा आणि तणावाचा सामना करावा लागतो.

चुकीची जीवनशैली आणि वाईट सवयी (Unhealthy Lifestyle and Habits): अस्थिर जीवनशैली आणि वाईट सवयी, जसे की अनियमित झोप, चुकीचे बसणे आणि असमतोल आहार, व्यसने या गोष्टींमुळे स्नायूतील ताण आणि थकवा वाढण्याची शक्यता असते.

दडपून राहिलेल्या भावनांमुळे होणारे ७ प्रकारचे दुखणे (Muscle Tension Caused by Stuck Emotions)

१. मानेचे दुखणे (Neck Pain) – मानेतील ताण सहसा व्यक्तीच्या भीतीमुळे आणि अडकलेल्या भावनांमुळे होतो. जर तुम्हाला तुमच्या प्रामाणिक मतांना, विचारांना निर्भयपणे व्यक्त करण्यास कठीण जात असेल, किंवा चिंता करण्याची काहीशी सवयच होऊन गेली असेल आणि इतरांवर विश्वास ठेवणे कठीण जात असेल, तर या भावना मानेच्या भागातील स्नायू दुखण्याचे कारण ठरू शकतात.

२. खांदेदुखी (Shoulder Pain) – मोठ्या प्रमाणात जबाबदऱ्यांचे ओझे दीर्घकाळ पेलावे लागणे हे कालांतराने हात आणि खांद्याच्या स्नायूंमधली ताणाचे, वेदनांचे कारण ठरू शकतात. यासाठी कामाशी संबंधित जवाबदऱ्यांचे नियोजन योग्य पद्धतीने करता येणे गरजेचे झाले आहे.

३. पाठीच्या वरच्या भागातील दुखणे (Upper Back Pain) – पाठीच्या वरच्या भागातील स्नायूंमधली ताण सहसा दुःख, शोक किंवा वियोग या भावनांचा निचरा योग्य पद्धतीने न झाल्याने येतो. हा भाग हृदयाच्या जवळ असल्यामुळे, तो प्रेमभंग किंवा तीव्र दु:ख यांसारख्या भावनांशी खोलवर जोडलेला असतो.

४. पाठीच्या खालच्या भागातील दुखणे (Lower Back pain) – पाठीच्या खालच्या भागातील तीव्र वेदना या स्वतःबद्दलच्या घृणास्पद किंवा अपराधीपणाच्या भावनांमुळे निर्माण होऊ शकतात. आत्मसन्मानाची कमतरता असल्यामुळे या भावना वाढत जातात, आणि या भावना पाठीच्या खालच्या (Lower Back) भागात साठवल्या जातात, ज्यामुळे त्या भागात स्नायूंमध्ये ताण आणि जडपणा निर्माण होतो. आणि लोअर बॅक मध्ये तीव्र वेदना होऊ शकतात.

५. पोटातील दुखणे (Abdominal Pain) – काही भावना आणि भावनांना योग्य प्रकारे हाताळले नाही, तर पोटातील ताण म्हणजेच पोटदुखी होऊ शकते. एखाद्याबद्दल किंवा एखाद्या विशिष्ट परिस्थितीबद्दल तुमच्या खऱ्या भावना दडपणे किंवा दुर्लक्षित करणे या भावना तुमच्या पोटाच्या भागात साठल्या जातात, ज्यामुळे मुरडा येणे वगैरे त्रास होतात.

६. मांड्यांच्या आतील भागातील दुखणे (Inner Thigh Pain) – असुरक्षिततेच्या भावनेचा परिणाम हा मांड्यांच्या आतल्या भागातील स्नायूंमध्ये जडत्त्व येऊन मांड्या दुखण्या मध्ये होऊ शकतो. जर तुम्ही खूप नर्व्हस असाल आणि तुमच्या जवळच्या लोकांवर तुमचा विश्वास नसेल, तर हा आजार तुम्हाला त्रास दायक ठरू शकतो.

दडपलेल्या भावनांचा निचरा कसा करावा?

श्वसनाचे व्यायाम यामध्ये प्राणायाम विशेषतः भस्त्रिका, स्ट्रेचिंग, योग किंवा डीप रिलॅक्सेशन मसाज, योग निद्रा नियमितपणे करणे हे स्नायूतील ताण, वेदना किंवा आघातामुळ दडपलेल्या भावनांचा निचरा करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.

योगशास्त्रात मानवी शरीरातील सात उर्जाचक्रांबद्दल सांगितलेले आहे. योगाभ्यास करून हि उर्जाचक्रे संतुलित केल्याने सुद्धा साठलेल्या भावनांना वाट करून दिली जाऊ शकते.

शरीरातील सात उर्जाचक्रे आणि त्यांची कार्ये समजून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

तुम्ही तुमच्या भोवतालची परिस्थिती तर बदलू शकत नाही. म्हणून यासाठी भावनांचे नियोजन करता येणे हे महत्त्वाचे ठरते.

Manachetalks

लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।