ऑस्टिओपोरोसिस एक गंभीर आजार

 

शरीराला आधार देणारा भक्कम अवयव म्हणजे शरीरातील हाडे.

कल्पना करा की आपले शरीर जर नुसता मांस आणि स्नायूंचा गोळा असता तर…!!!! ना शरीराला काही आकार असता ना कोणतीही हालचाल करणे सहज शक्य झाले असते.

कदाचित हाडांअभावी आपणही रेंगाळत एका जागेवरून दुसरीकडे फिरलो असतो. या अस्थी म्हणजे हाडांचे आरोग्य धोक्यात आणणारा आजार म्हणजे ऑस्टिओपोरोसिस.

या लेखातून आम्ही तुम्हाला ऑस्टिओपोरोसिसची कारणे व त्यापासून बचाव करण्याचे उपाय  सांगणार आहोत.

ऑस्टिओपोरोसिस म्हणजे काय?

ही एक गंभीर अशी वैद्यकीय समस्या असून, यात हाडे ठिसूळ होतात व अस्थिभंग म्हणजेच फ्रॅक्चर होण्याचा धोका संभवतो.

जागतिक ऑस्टिओपोरोसिस दिवस

लोकांना हाडांच्या आजाराबद्दल शिक्षित करण्यासाठी IOF अर्थात International Osteoporosis Foundation ही संस्था कार्यरत आहे.

या संस्थेद्वारे ‘जागतिक ऑस्टिओपोरोसिस दिन’ म्हणून 20 ऑक्टोबर हा दिवस घोषित केला आहे.

युनायटेड किंग्डम मध्ये या दिवसाची सुरुवात झाली. युरोपियन कमिशनच्या पाठिंब्याने, जागतिक ऑस्टिओपोरोसिस दिन 20 ऑक्टोबर 1996 रोजी प्रथम घोषित झाला.

यापूर्वी हा रोग विशेष गंभीर स्वरूपाचा मानला जात नव्हता.

९० च्या दशकाच्या उत्तरार्धात UNच्या जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जागतिक ऑस्टिओपोरोसिस दिनाचे कार्यक्रम IOF सह प्रायोजित केले.

तेव्हापासून IOF ने जगभरातील जागरूकता वाढवणाऱ्या कार्यक्रमांना प्रायोजित करण्याचे नेतृत्व हाती घेतले आहे.

ऑस्टिओपोरोसिसची कारणे

१) कॅल्शियमची कमतरता

आयुष्यभर कमी प्रमाणात कॅल्शियम शरीरात गेले असेल तर ऑस्टिओपोरोसिसचा धोका संभवतो.

चुकीचा आहार. अतिशय कमी वजन या कारणांमुळे हाडे कमजोर होतात.
जठर व आतड्यांच्या शस्त्रक्रियेमुळे जर यातील काही भाग काढून टाकला असेल तर कॅल्शियम कमी प्रमाणात शोषले जाते व ऑस्टिओपोरोसिस होऊ शकतो.

वाढत्या वयाबरोबर याचा धोका सुद्धा वाढतो.

नैसर्गिकरीत्या पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना अधिक धोका संभवतो.

उंची कमी असल्यास ऑस्टिओपोरोसिस होण्याची शक्यता वाढते.

इतर कोणत्याही आजारांमध्ये स्टिरॉइड्स युक्त औषधे घेतल्यास हाडे ठिसूळ होण्याची शक्यता जास्त असते.

आशिया खंडातील लोकांना ऑस्टिओपोरोसिस अधिक प्रमाणात झालेला दिसतो.

चुकीच्या जीवनशैलीमुळे उदा. दारु किंवा तंबाखूचे सेवन व्यायामाचा अभाव हार्मोन्स मधील बदलांमुळे होणारा ऑस्टिओपोरोसिस.

हा विशेषत: स्त्रियांच्या मेनॉपॉज काळात दिसून येतो.

ऑस्टिओपोरोसिस मुळे हाडांना कोणता धोका असतो?

हाडे मोडणे विशेषत: कमरेचे हाड किंवा पाठीचा कणा, मणके यांचे फ्रॅक्चर खूपच धोकादायक असते. यामुळे गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया कराव्या लागतात.

किंवा कायमचे अपंगत्व येऊ शकते. बहुतेक वेळा पडण्याचे निमित्त होते व हाडे मोडतात.

पण काही वेळा ऑस्टिओपोरोसिसमुळे हाडांचा ठिसूळपणा एवढा वाढतो की आपोआपच हाड मोडते किंवा वाकते.

यामुळे उंची न वाढणे, पाठीला कुबड येणे किंवा मणके फ्रॅक्चर होणे असे दुष्परिणाम होतात. अती गंभीर प्रकारामध्ये तर साधे शिंकणे किंवा खोकणे या कारणांमुळे देखील बरगड्या फ्रॅक्चर होऊ शकतात.

ऑस्टिओपोरोसिस टाळण्याचे उपाय

१. योग्य प्रमाणात कॅल्शियमचा पुरवठा

१८ ते ५० वयोगटातील व्यक्तींना दररोज १००० मिग्रॅ कॅल्शियमची गरज असते परंतु वयाच्या पन्नाशी नंतर हीच गरज १२०० मिग्रॅ प्रतिदिन एवढी वाढते. त्यामुळे भरपूर कॅल्शियम युक्त आहार घ्यावा. यात खालील पदार्थांचा समावेश होतो.

  • लो फॅट असलेले दुग्धजन्य पदार्थ
  • हिरव्या पालेभाज्या
  • सोयाबीन
  • मोड आलेली कडधान्ये
  • संत्री
  • मासे विशेषतः रावस , तारले, पेडवे या प्रकारचे मासे
  • अंडी
  • अंजीर, बदाम याप्रकारचा सुकामेवा

२. व्हिटॅमिन डी युक्त आहार घेणे

व्हिटॅमिन डी मुळे शरीराची कॅल्शियम शोषून घेण्याची क्षमता वाढते.

तसेच हाडांना बळकटी येते. सूर्यप्रकाशातून व्हिटॅमिन डी मिळते. पण सतत घरात रहाणाऱ्या व्यक्ती, स्वच्छ सूर्यप्रकाश मिळत नाही असे प्रदेश किंवा कायमच सनस्क्रीन लावून सूर्यप्रकाशाचा त्वचेशी संपर्क टाळणाऱ्या व्यक्तींमधे हाडे ठिसूळ होतात व अस्थिभंग होण्याची शक्यता वाढते.

आहारातील कॉड लिव्हर ऑईल, फिश ऑइल मधून व्हिटॅमिन डी मिळते.
आपल्या शरीराला 600 IU एवढे व्हिटॅमिन डी दर दिवशी गरजेचे असते पण वयाच्या सत्तर वर्षांनंतर हीच गरज वाढून 800IU एवढी होते.

आजारपणामुळे अजिबातच घराबाहेर पडू न शकणाऱ्या व्यक्तींना इंजेक्शन, पावडर अथवा टॉनिक स्वरूपात व्हिटॅमिन डी घेणे आवश्यक होऊन जाते.

३. नियमितपणे व्यायाम करणे आवश्यक

व्यायाम केल्याने हाडे मजबूत होतात तसेच हाडांची झीज होण्याची प्रक्रिया लांबवली जाते. बालपणापासूनच व्यायाम करण्याची सवय असेल तर तरुणपणी हाडांना चांगल्या प्रकारे बळकटी येते.

त्याचप्रमाणे नियमितपणे व्यायाम करण्याची सवय ठेवली की त्याचा फायदा शरीराला दीर्घ काळ पर्यंत होतो.

व्यायाम प्रकार निवडताना शक्ती वाढवणारे, तोल सांभाळणारे तसेच वजन नियंत्रणात ठेवणारे व्यायाम यांचा योग्य समन्वय साधला पाहिजे.

स्नायू व हाडे मजबूत करणारे व्यायाम हे मुख्यतः दंड व पाठीच्या वरच्या भागातील मणक्यांचे आरोग्य राखण्यासाठी उपयुक्त आहेत.

पायाची हाडे, कंबर, पाठीच्या कण्याचा खालचा भाग मजबूत होण्यासाठी धावणे, चालणे, जॉगिंग, सायकलिंग, दोरीउड्या मारणे, जिने चढणे असे व्यायाम प्रकार उपयोगी आहेत.

तर शरीराचा तोल सांभाळणारी योगासने जसे ताडासन, वृक्षासन यामुळे शरीर संतुलन चांगले राखले जाते आणि म्हातारपणी तोल जाऊन पडण्याचा धोका कमी होतो.

योग्य आहार व व्यायाम यांच्या सहाय्याने आपण हाडांचे आरोग्य चांगले राखू शकतो.

ऑस्टिओपोरोसिसची लक्षणे जागरूकतेने पहा

नियमितपणे तपासणी करून आवश्यक ती औषधे हाडांना बळकटी येण्यासाठी घ्यावीत. आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य त्या तपासण्या करून घ्याव्यात.

कंबरदुखी, सतत अंग दुखणे, साध्या पडण्यामुळे हाड मोडणे, लहान वयात योग्य प्रमाणात उंची न वाढणे, पाठीला पोक येणे, याशिवाय ज्यांच्या आईवडिलांना कमरेचे हाड मोडल्याचा त्रास झाला असेल अशा व्यक्तींनी आपल्याला असलेला ऑस्टिओपोरोसिसचा संभाव्य धोका लक्षात घेऊन योग्य ते निदान व उपचार वेळेत सुरू करावेत.

हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट्स करुन सांगा.

अधिकाधिक लोकांपर्यंत ही उपयुक्त माहिती पोहचवा. लेख आवडल्यास लाईक व शेअर करा.

Manachetalks

लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।