मुलांना आपली कामं हाताने करायला लावण्याची योग्य वेळ कोणती?

“आई मला हाताने करायचंय, करू दे नं वं..”

चार वर्षांचा मुलगा TV पाहत बसलेला असतो. आई एकेक घास करत त्याच्या तोंडात कोंबते. तिला हवं तेवढं त्याने खाल्लं कि मग म्हणते, “मी भरवल्याशिवाय खातंच नाहीस तू.”

सहा वर्षांचा मुलगा शाळेसाठी तयार होत असतो. म्हणजे आई त्याला दात घासून देते, बाथरूममध्ये नेऊन आंघोळ घालते. कपडे चढवते, सॉक्स-बूट घालून देते आणि नंतर त्याची bag आपल्या पाठीवर घालून त्याला वर्गापर्यंत पोहोचवते.

एका जुनियर केजीतल्या मुलाची वही एकदा पहिली. अगदी व्यवस्थित आडव्या- उभ्या रेषा काढलेल्या होत्या (standing lines- sleeping lines). मी म्हटलं, “हुशार हं मुलगा..” तर आई म्हणाली, “अहो कसचं. बसतच नाही तो. बसला तरी सरळ रेष येतंच नाही त्याला. वेड्या-वाकड्याच जातात. वही पूर्ण व्हायला नको का? मीच देते काढून त्याला.”

एकदा एक आई सांगत होती, “सात वाजता van येते, मी पावणेसातला उठवते तिला. मग अज्जिबात त्रास देत नाही ती. मग पटपट आवरून होतं दहाव्या मिनिटाला. लवकर उठवलं ना तर सगळं तिलाच करायचं असतं. मग खेळत-खेळत उशीर लागतो.”

बरेचदा मुलं मोठी झाली कि आईवडील सांगत येतात, ‘अहो कोणत्या गोष्टीसाठी initiative घेतच नाही. सतत मागे लागावं लागतं. नाही आली ना एखादी गोष्ट तर सोडून देते/देतो सरळ, प्रयत्नच करत नाही.’

मुलांच्या वाढी दरम्यान जरा मागे जा. एक काळ असा आठवेल जेंव्हा, मूल म्हणत होतं, ‘आई मला हाताने करायचंय करू दे नं वं…’ आणि तुम्ही त्याचा हात धरून, ‘थांब, नाही जमणार तुला आत्ता. मोठा झाल्यावर कर हं…’ असं म्हणाला होतात.

असंही आठवेल कि त्या वयांत मुलाने ह्या गोष्टींसाठी खूप त्रास दिलेला असतो. ताट हातात घेऊन तुम्ही मागे पळता मुलं पुढे, कपडे घालताना तुम्ही दाबून मुलाला थांबवता, मुलं थांबत नाहीत, कारण त्यांना हाताने करायचं होतं.

तीच वेळ नव्हती का त्यांना शिकवण्याची. नसतं जमलं तेंव्हा पण प्रयत्न तर केला असता. प्रयत्न केल्यावर जमतं हे तरी समजलं असतं. समजतं.

मुले मोठी होतात तसं एकच शिकतात, “आईने केल्याशिवाय करायचं नाही.” त्यांच्यापेक्षा आपल्याला नक्कीच चांगलं येत असतं. पण त्यांनी केल्याशिवाय त्यांना येणारही नसतं. हे करू देणं, मेहनत घेणं त्यांना त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठी तयार करतं.

ज्यात स्पर्धेला आणि क्षमतेला महत्व असतं. आत्ता कमावलेला विश्वास त्यांना पुढे वापरायचा असतो.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

1 thought on “मुलांना आपली कामं हाताने करायला लावण्याची योग्य वेळ कोणती?”

  1. मुलांना आपली कामं हाताने करायला लावण्याची योग्य वेळ कोणती? ते सांगितलंच नाही. नेमकं कोणतं वय ?

    Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।