पांडवलेण्यात सुमारे ३० दगडात कोरलेल्या प्राचीन गुहा बघायला मिळतात. मुख्यतः जैन आणि बौद्ध भिक्कू यांच्या वास्तव्यासाठी इ.स.पू. १९ व्या शतकात या लेण्यांचे निर्माण करण्यात आले होते.
प्रत्येक गुहा ही स्वर्गीय निवासस्थानासारखी वाटते. साधारण २० मिनिटांचे ट्रेकिंग करून गेल्यांनतर नजरेस पडणारे सौंदर्य हे असीम शांतता देऊन जाते. जरी याला ट्रेकिंग म्हटले आहे तरी येथे बांधीव जिने असल्याने चढून जाणे अगदीच सोपे होते. पांडव लेणी महाराष्ट्रातील नाशिकमध्ये दक्षिणेस स्थित आहे. या गुहांना “विहार” म्हटले जाते. तुम्हा वाचकांना या सुंदर कलाकृतीची छोटीशी झलक म्हणून यात काही फोटोज देत आहोत.
या गुहा जितक्या सुंदर आणि सुबक डिझाईन केलेल्या आहेत तितकेच त्या काळचे स्थापत्यशास्त्रसुद्धा किती विकसित होते याचा नमुना या लेण्यांची पाणीपुरवठा योजना बघून सहज येतो. यामध्ये पाण्याच्या टाक्यासुद्धा कुशलतेने कोरलेल्या आहेत. या गूढ वाटणाऱ्या गुहा, सुंदर कोरीवकाम केलेले हे स्तूप बघून, हे काम करतांना कारागिरांच्या भावनासुद्धा नक्कीच सुंदर असतील.
१००० वर्षांपूर्वी कोरली गेलेली हि लेणी म्हणजे भारतातील प्राचीन स्थापत्यशात्र आणि संस्कृतीच्या इतिहासातील दागिनाच!!
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
Khupch chhan thikan.