आई-बाबा मारतील म्हणून किती मुलं वाईट गोष्टींपासून परावृत्त झाली आहेत?
मला माझ्या आईवडिलांची ज्या कारणासाठी भीती वाटायची त्या गोष्टी मी त्यांच्यापासून लपवण्याचा प्रयत्न करायची.
एकदा, आईने मला विश्वासात घेतलं आणि समजावून सांगितलं. माझं म्हणणं तिला पटतंय असं सांगितलं पण दुसरी बाजू समोर ठेवली आणि विचार कर म्हणाली. तिथून पुढे तिने तीच स्ट्रॅटेजि ठेवली. चुकल्यानंतर कडक शिक्षा मला कधीच झाली नाही.
पण विचार करण्याची, चूक सुधारण्याची संधी मात्र मिळाली. त्यामुळे मी परफेक्शनिस्ट झाले नाही, पण इतरांना स्विकारायला आणि माफ करायला शिकले. आईचं म्हणणं पटत गेलं. खोटं बोलणं, लपवाछपवी ह्याला आमच्या नात्यात स्थानच उरलं नाही. आईने मला धाकात ठेवलं नाही म्हणून मी खूप चुका केल्या, पण आईने स्वीकारलं म्हणूनच त्या सुधारू शकले.
पालकत्वाचा चा विचार करताना आणि मुलांना कसं घडवावं हे ठरवताना आपल्या वागण्याचा थोडासा विचार करायला हवा. मुलं तुमचा उपदेश ऐकून घडत नाहीत, तुमचं वागणं पाहून घडतात.
वसुधा देशपांडे-कोरडे
माईंड मास्टर कौन्सेलर्स, पुणे
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.