चहा विकून पत्नीसोबत जगभ्रमंती, वाचा या तीन प्रवासप्रेमींच्या गोष्टी

प्रवास, प्रवास म्हणजे असतं तरी काय? एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचं इप्सित साध्य करणं!!

बस इतकंच, कि आणखी काही? पण कुणा कुणासाठी हा प्रवास म्हणजे एक चित्रपटच असतो. आणि त्या चित्रपटाचा दिग्दर्शक असतो साक्षात ईश्वर किंवा नियती, डेस्टिनी….

कधी कधी आपल्या आयुष्यातसुद्धा एखादा प्रवास असा घडतो जो जगण्याचा अर्थच बदलवून टाकतो. आज मी तुम्हाला अशा काही लोकांबद्दल सांगणारा आहे ज्यांचं पॅशनच आहे प्रवास करणं. आणि त्यांच्या या आवडीतून त्यांनी दाखवून दिलं कि कुठलंच स्वप्न सत्यात उतरवणं अशक्य नसतं.

१) बघा १७ देशांची सफर करून आलेलं हे चहा विकणारं जोडपं कसं आपलं स्वप्नं जगलं

आता मला सांगा किती वेळा तुम्ही तुमची प्रवासाची इच्छा खर्च परवडत नाही म्हणून आवर्ती घेतली??

“बरेचदा”….. बरोबर ना!!!

विजयन सांगतात, “माझी बायको लग्नाआधी एर्नाकुलमच्या बाहेरही कधी गेली नव्हती. पण या काही वर्षात आम्ही यू. के., ऑस्ट्रेलिया, जर्मनी, फ्रांस, इजिप्त, इटली, सिंगापूर अश्या १७ देशांचा प्रवास केला.”

हि गोष्ट आहे एका अश्या माणसाची ज्याला लहानपणापासूनच भटकायची आणि वेगवेगळे ठिकाणं पाहायची अनुभवायची आवड होती. ६५ वर्षांचे विजयन रोज सकाळी ची पत्नी मोहोना बरोबर आपल्या छोट्याश्या दुकानात जातात. चहा, इडली चा नाश्ता मिळण्याचे ठिकाणं म्हणून त्यांचं दुकान लोकांच्या आवडीचं.

मोहोना आणि विजयनचा कित्तेक वर्षांपासूनचा एकच नियम आहे. मोहोना रोजच्या आलेल्या पैशातून ३०० रुपये बाजूला काढून ठेवते. आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही, आपलं प्रवासाचं स्वप्नं त्यांनी खरंच पूर्ण केलं हा एक नियम पळून.

मोहोना आणि विजयनने घरच्या सर्व जवाबदाऱ्या पाळताना, अडचणी आल्या तरी न डगमगता आपल्या स्वप्नाला उराशी बाळगून ठेवलं. आणि आज हा प्रवास म्हणजे त्यांच्या आयुष्याचा मौल्यवान ठेवा ठरला.

कठीण परिस्थितीत प्रवासाचं स्वप्नं

२) ४९ देश, ३५ इंटर्नशिप, ७ खंड…. हि ऎका मार्कची गोष्ट

तुम्हाला वाटत असेल ना, कि देश विदेश फिरणं हा तोंडाचा खेळ नाही… चिक्कार पैसे लागतात त्याला.

हि गोष्ट आहे एका ट्रॅव्हल ब्लॉगरची. आपलं लिखाण हेच त्याच भांडवल जगाच्या भ्रमंतीसाठी. जगातल्या १०० टॉपच्या इन्फ्लुएन्शिअल ट्रॅव्हल बागर्स मधला एक आहे मार्क. त्याच्या लिखाणाच्या छंदाला त्याने त्याचं प्रोफेशन बनवलं आणि त्यातून त्याने त्याचा प्रवासाचा दुसरा छंद जोपासला.

वयाच्या २७ व्य्या वर्षीपर्यंत ३५ वेगवेगळ्या संस्थांबरोबर काम करून त्याने तब्ब्ल ४९ देश पाहिलेत तेही फक्त एक वर्ष आठ महिन्यात. आणि अर्थातच त्याच्यासाठी खर्च करत होत्या या ३५ वेगवेगळ्या संस्था.

आता त्याने हे कसं शक्य केलं हा प्रश्न आपल्याला पडणं साहजिकच आहे.

आधीच त्याला जाणीव होती कि असा प्रवास करणं आपल्याला आर्थिकदृष्ट्या झेपणारं नाही. तेव्हा त्याने त्याचं स्किल वापरून एक व्हिडीओ केला कि तो प्रवास करून काही जाहिराती करू शकतो. म्हणजे ट्रॅव्हल ब्लॉगिंग करू शकतो.

या प्रवासाच्या अनुभवाबद्दल बोलताना मार्क सांगतो कि या भटकंतीत तो ब्राझीलच्या स्लम एरियात सुद्धा झोपला आणि लास व्हेगासच्या फाईव्ह स्टार हॉटेल मध्येसुद्धा राहिला. स्वस्तातलं रोडसाईड खाणं सुद्धा खाल्लं आणि महागाचे डिनर सुद्धा घेतले. एवढंच नाही तर एखाद्या घरातल्या आईच्या हातचं जेवण सुद्धा जेवलो. एकंदरीत हा प्रवास म्हणजे त्याच्यासाठी अफलातून अनुभव ठरला.

कठीण परिस्थितीत प्रवासाचं स्वप्नं

३) स्वतःला ब्रेस्ट कॅन्सर असताना कॅन्सरच्या अवेअरनेस साठी ३०००० किलोमीटर भ्रमंती करणारी कॅप्टन रितू बियानी

डेन्टल सायन्सचा शिक्षण पूर्ण केल्यानंतर रितुने इंडियन आर्मी जॉईन केली. १९९२ साली कॅप्टन पदापर्यंत पोहोचून रितुने इंडियन आर्मी मधील आपल्या सेवेतून निवृत्ती घेतली. त्यानंतर रितुने आपले डेन्टल क्लिनिक चालवून गर्यारोहण, पॅराग्लायडिंग, स्कायडायव्हिंग करत आपल्या आयुष्यात रोमांच तर भरलाच पण इतरांना सुद्धा प्रेरणा देणारी तिची हि कहाणी.

रितू ४० वर्षांची असताना तिला स्तनांच्या कॅन्सरचे निदान झाले. आणि तिच्या आयुष्याला एक वेगळेच वळण मिळाले. पाच वर्षात दोन सर्जरी, सतत अँटिबायोटिक्सचा मारा, सहा केमोथेरपीचे सायकल्स याने कोणाचीही जगण्याची जगण्याची उमेद संपून जाईल. पण यातूनसुद्धा उभं राहणं आणि इतरांना बळ देणं हे रितूचं ध्येय होतं.

२००० साली केमोथेरपीने रितूच्या डोक्यावरचे केस गेलेले होते. तेव्हा आपल्या डेन्टल क्लिनिकमध्ये एका पेशण्टवर उपचार करत असताना त्या पेशन्टला जेव्हा रितूच्या कँसरबद्दल समजले तेव्हा त्या पेशन्टने आपल्यालासुद्धा संसर्ग लागेल असे वाटून चक्क तिच्याकडून उपचार करून घ्यायला नकार दिला. तेव्हा रितुने कॅन्सरच्या जनजागृती साठी प्रवास करण्याचा निर्णय घेतला.

पुढे तिने भारतातल्या २६ राज्यांमध्ये कॅन्सर अवेअरनेसच्या कार्यशाळा घेतल्या.

कठीण परिस्थितीत प्रवासाचं स्वप्नं

हे तीनही आपल्याला बरंच काही शिकवून जाता. विजयनच्या भटकंतीच्या गोष्टीत त्याची बेताची आर्थिक स्थिती अडथळा ठरत नाही, तर दुसरीकडे मार्क त्याचं कौशल्य वापरून भ्रमंती करतो आणि रितू आपल्या आजारात सुद्धा स्वतःहाला प्रवासातून नवी दिशा देत कॅन्सरसारख्या आजारासाठी जनजागृती करते. अशाच प्रवासाच्या तुमच्यापण काही कल्पना स्वप्नं असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि भटकंतीची आवड असणाऱ्या आपल्या मित्रपरिवाराला हा लेख शेअर करा. न जाणो या अविश्वसनीय गोष्टींनी एखाद्याच्या स्वप्नांना बळ येईल.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।