पावलांवर सूज आली आहे? कारणे आणि घरगुती उपाय जाणून घ्या या लेखात

शरीराच्या एखाद्या भागावर विशेषत: पावलांवर सूज येणे ही कॉमन गोष्ट आहे. परंतु असा त्रास वारंवार होत असेल तर मात्र त्यामागचे कारण शोधून काढून त्यावर उपचार करणे आवश्यक ठरते. कारण अशी वारंवार सूज येणे हे एखाद्या छुप्या आजारामुळे होत असण्याची शक्यता असते.

पावलांवर सूज येणे म्हणजे नक्की काय?

पावलांवर सूज आली की पावले भाजलेल्या बनपावसारखी टम्म फुगलेली दिसतात. तेथे बोट टेकवले असता खळगा पडून ते आज जाते आणि काढले की पाऊल पूर्ववत होते. आयुर्वेदात पावलांवर सूज येण्याचे कारण वात आणि कफ यांचे असंतुलन असे सांगितले आहे.

पावलांवर सूज येण्याची कारणे 

१. पाय मुरगळणे

२. खूप लांबवर चालत जाऊन येणे

३. बराच वेळ पाय अधांतरी लटकवून बसणे

४. खूप वेळ उभे राहणे किंवा खूप जास्त व्यायाम करणे

५. उच्च रक्तदाब

६. हृदय विकार

७. डीप व्हेन थ्रोंबोसिस

८. मूत्रपिंड अथवा किडनीचे काम योग्य रीतीने न होणे, युरिन इन्फेक्शन होणे

९. गरोदरपणा

१०. काही स्त्रियांमध्ये मासिक पाळीच्या आधी देखील पावलांवर सूज दिसून येते.

११. स्थूलपणा

पावलांवर सूज येऊ नये म्हणून काय करावे?

१. संतुलित आहार आणि योग्य जीवनशैली असावी.

२. जास्त प्रमाणात मिठाचे सेवन करू नये.

३. फायबर युक्त आहार घ्यावा

४. जंक फूड आणि प्रिझर्वेटिव्ह घातलेले पदार्थ खाऊ नयेत.

५. नियमितपणे प्राणायाम करावा.

पावलांवर सूज आली असेल तर करण्याचे घरगुती उपाय 

१. धने 

एक कप पाण्यात तीन चमचे आख्खे धने घालून ते पाणी उकळावे. पाणी उकळून अर्धा कप इतके झाले की ते गाळून घ्यावे. त्या पाण्यात एक चमचा मध घालून दिवसातून दोन वेळा सेवन करावे. पावलांवरची सूज कमी होते.

२. गरम पाणी 

एका टबमध्ये गरम पाणी घेऊन त्यात मीठ घालावे. अशा पाण्यात पाय बुडवून अर्धातास बसले असता पावलांवरची सूज कमी होण्यास मदत होते.

३. ऑलिव्ह ऑइल 

ऑलिव्ह ऑइल गरम करून त्यात लसणाच्या चिरलेल्या दोन-तीन पाकळ्या परताव्यात. तेल कोमट झाले की त्याने पावलांवर मालिश करावी. त्यामुळे पावलांचे दुखणे कमी होते तसेच सूजही कमी होण्यास मदत होते.

४. लिंबाचा रस 

लिंबाच्या रसाचे नियमित सेवन केल्यामुळे शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. एक ग्लास कोमट पाण्यात दोन चमचे लिंबाचा रस आणि एक चमचा मध घालून दररोज सेवन करावे.

५. आले 

एक कप पाण्यात आल्याचे चार पाच तुकडे उकळून गाळून ते पाणी प्यावे. अथवा चहामध्ये आले घालून त्याचे सेवन करावे. पावलांवरची सूज कमी होण्यास खूप मदत होते.

६. कॉन्ट्रास्ट हायड्रोथेरेपी 

पावलांवर सूज आली असता कॉन्ट्रास्ट हायड्रोथेरेपी खूप उपयोगी पडते. ही थेरपी करण्यासाठी दोन टब घ्यावेत. एका टबमध्ये गरम पाणी आणि एका टबमध्ये गार पाणी घ्यावे. गरम पाण्याच्या टबमध्ये चार ते पाच मिनिटे पाय बुडवून बसावे. त्यानंतर ताबडतोब गार पाण्याच्या टबमध्ये पाय बुडवावेत. एक मिनिट गार पाण्यात पाय ठेवून पुन्हा गरम पाण्यात बुडवावेत. ही प्रक्रिया १० ते १५ वेळा करावी. असे दररोज नियमितपणे करण्यामुळे पावलांवरची सूज कमी होण्यास खूप मदत होते.

तर हे आहेत पावलांवरची सूज कमी करण्याचे घरगुती उपाय. ह्या उपायांचा वापर अवश्य करा. परंतु ह्या उपायांनी आठवडाभरात फरक पडला नाही तर ते किडनी किंवा हृदयाशी संबंधित गंभीर आजाराचे लक्षण असू शकते. अशा वेळी वेळ न घालवता तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि त्याप्रमाणे उपचार करावेत.

Manachetalks

लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।